प्रेम आणि ताऱ्यांनी वेढलेल्या, एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्या दोन शेजाऱ्यांची एक जगावेगळी प्रेम कथा 'नेबर्स' २३ सप्टेंबर पासून सिनेमागृहात...



'कल्पना रोलिंग  पिक्चर्स प्रौडक्शन' निर्मित आणि  'मिठुवाला प्रौडक्शन्स' यांचे सादरीकरण असलेल्या 'नेबर्स ''  हा चित्रपट   २३ सप्टेंबर पासून  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  
 
निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एक रहस्यमय प्रेम कथा चित्रित करण्यात आली आहे. 

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जवादे, शैलेश दातार, नेहा बाम , अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  

दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची  महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे तसेच पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू  विशाल तळकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.