'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त स्टोरीटेल मराठीवर 'डॉ. वीणा देव' यांच्याशी दिलखुलास संवाद.
मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून मराठी वाचकांसाठी ज्ञानभांडार ठरणारी प्रख्यात साहित्यिक डॉ. वीणा देव यांची समग्र मुलाखत स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार आणि थिंक बॅंकचे विनायक पाचलग यांनी खास रसिक वाचकांसाठी घेतली आहे. या विशेष मुलाखतीत त्यांनी डॉ. देव यांना बोलतं करून अनेक दशकांचा इतिहास जागृत केला आहे. डॉ. वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केले. तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "आपण जसे लोकांकडे जेवायला जातो तसे मी साहित्यिकांकडे अप्पांसोबत जात असे. संजीवनी मराठे, महादेवशास्त्री जोशी, पद्मा गोळे, द. मा. मिरासदार यांच्याशी गोनीदांचं फार जवळचं नातं होतं, ही मंडळी साहित्यिक असूनही किती साधी होती हे