पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पत्रकार क्षेत्रातील नवी आणि सकारात्मक क्रांती घडवणारा माई मीडिया २४ - विधान परिषद उपसभापती नीलमताई गोर्हे.

इमेज
मुंबई दि.२९: मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात माई या राष्ट्रीय संघटने अंतर्गत ‘माई मीडिया २४’ या वेबपोर्टलचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते विधान भवनात संपन्न झाले. याप्रसंगी माई संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर , कोषाध्यक्ष  चेतन काशीकर, सचिव सचिन चिटणीस उपस्थित होते.   या उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यांनी सांगितले की, हा उपक्रम पत्रकार क्षेत्रातील नवी आणि सकारात्मक क्रांती घडवणारा असेल अस म्हणत शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या अध्यक्षा शीतल करदेकर या आजच्या काळातील रजनी आहेत असे शब्द उच्चारत त्यांचं कौतुक केलं. माई मीडिया २४ हा डिजिटल विश्वातील विश्वसनीय आणि सच्चा पत्रकारितेचे उन्मुक्त माध्यम आहे. जे राजकीय, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील घडामोडींचे त्वरित आणि योग्य वृत्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर राहणार आहे. तसेच सहकार तत्त्वावर काम करणारे पत्रकारितेचे हे पहिलेच डिजिटल माध्यम आहे असे त्यांनी सांगितले. उद्योगमंत्री उदयजी सामंत म्हण...

मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत प्रशांत दामले यांनी केली नव्या 'तिकिटालय' ॲपची घोषणा.

इमेज
मराठी सिनेमा,नाटक,गाण्यांचे-कवितांचे, संगीताचे कार्यक्रम, विनोदी प्रहसन अश्या विविध मराठी कार्यक्रमांवर मराठी प्रेक्षक  नेहमीच   प्रेम करीत आले आहेत.  मात्र या कार्यक्रमांची माहिती  त्यांच्यापर्यंत योग्यरीत्या पोहचतेच असं नाही. ही  माहिती  त्यांच्यापर्यंत सहजी पोहचावी आणि घर बसल्या त्यांच्या हक्काचं ‘तिकिट’ उपलब्ध व्हावं हा विचार करून नाटकं, चित्रपट, मैफिली, कॉमेडी शोज, सगळ्यांची तिकीट घेऊन मराठी मनोरंजनाचे ॲप ‘तिकिटालाय’ आलं आहे.        मराठी मनोरंजनाचे तिकीट काढणाऱ्या रसिकांना भरपूर  माहितीसह एखादं हक्काचं तिकीट बुकिंग ॲप हवं,  या जिद्दीने  प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेनमेंट प्रा. लि (PAC) अंतर्गत हे ‘तिकिटालाय’ॲप मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत सादर केलं आहे. मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते ‘महाराष्ट्रभूषण’ अशोक सराफ, ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ या मनोरंजनात्मक तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण...

जन्मऋणची विलक्षण कथा सांगण्यासाठी लेखिका, निर्माती दिग्दर्शक कांचन अधिकारी सज्ज.

इमेज
आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी 'जन्मऋण' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी करून 'आभाळमाया' या मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड त्यांनी बाजी मारली आहे.  मूल जन्माला येताना आई व मुलातील नाळ कापली जाते आणि तिथेच तो एक व्यक्ती म्हणून उदय पावतो. नाळ कापली तरी आई-बापाचं मुलांप्रतीचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. पण मुलं मोठी झाली की पालकांची संपत्ती,  मालमत्ता किती आहे याचा विचार करताना दिसतात. पालक मात्र यापासून अनभिज्ञ असतात. जेव्हा मुलांना पालकांच्या अस्तित्वापेक्षा त्यांच्या मालमत्तेचा मोह पडतो तेव्हा काय होतं? पालकांनी अशावेळी काय करावे? मुलांमध्ये होणारे बदल कसे ओळखावे? नातेसंबंधाक...

जळगाव मध्ये प्रथमच चित्रपट महोत्सवाचे आयोजन.

इमेज
जळगाव : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अंतर्गत असलेल्या चित्रपट कामगार आघाडीच्यावतीने जळगावात '*महोत्सव चित्रपटाचा- सन्मान कलाकारांचा*-२०२४'* या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार  आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असून नाट्यशास्त्र, ॲक्टिंग अकॅडमी आणि जनसंवाद व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थितांशी संवाद साधणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या वसंतस्मृती जिल्हा कार्यालयात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, चित्रपट आघाडीचे महानगर अध्यक्ष रोहीत चौधरी, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, प्रसिद्धी माध्यम समन्वयक मनोज भांडारकर, सांस्कृतिक आघाडीचे महानगर अध्यक्ष पवन खंबायत,  कार्यालय मंत्री प्रकाश पंडित आदी उपस्थित होते. श्री. दीक्षित पुढे बोलतांना म्हणाले की, चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश सरचिट...

रसिकांची अत्यंत ऋणी - ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे.

इमेज
रंगभूमी, मालिका, चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडत अभिनेत्री नयना आपटे यांनी  स्वतःचा वेगळा  चाहता वर्ग निर्माण केला. ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या रंगभूमीय कारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून  त्यांच्या 'प्रतिबिंब' या आगामी आत्म चरित्राचे डिजिटल मुखपृष्ठ आणि शांता आपटे यांच्या 'जाऊ मी सिनेमात'? आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक अशोक समेळ यांच्या हस्ते करण्यात आले . सवाईगंधर्व’आणि ‘संस्कृती सेवा न्यास’ यांच्या विद्यमाने मुलुंड येथील कालिदास नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास आनंद म्हसवेकर,  मकरंद कुंडले, मुकुंद मराठे ,मंगला खाडिलकर, नयना आपटे यांचे पती विश्वेश जोशी आदी अनेक मान्यवर उपस्थितीत  होते .  अनेक हृदय आठवणींना उजाळा देत नयना आपटे यांच्या अभ्यासू वृत्तीचे आणि मेहनतीचे कौतुक अनेक मान्यवरांनी याप्रसंगी केले.  रंगभूमी  जगणार्‍या कलावंत अशा शब्दांत  गौरव करत नयना आपटे यांच्या कडून आजच्या युवापिढीने प...

विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत - नितीन गडकरी.

इमेज
येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या 'तेरव' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा ट्रेलर लॉन्च संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर,अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धाताई तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आणि पत्रकार अजय बिवडे आवर्जून उपस्थित होते. विदर्भ मराठवाडा खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि 'कॉटन सॉईल तंत्र' या विषयावर या संदर्भात काम होणे गरजेचे आहे; पण श्याम पेठकर यांनी याआधी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या विषय अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडला होता आणि आता आगामी "तेरव" या चित्रपटातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटु...

९४ वर्षीय जेष्ठ समाजसेवक-कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार.

इमेज
माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्याने ते मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले दि.१६ जानेवारी, २०२४ चे परिपत्रक मागे घ्यावे तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी तातडीने मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री गृह व वित्त, कामगार मंत्री, कामगार, पणन, गृह विभागाचे अधिकारी यांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक आयोजित करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे प्रमुख माथाडी कामगार संघटनांचे नेते व कार्यकर्ते दि.२६ फेब्रुवारी सकाळी ९:०० वाजल्यापासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण आंदोलन करणार आहेत. .         जेष्ठ समाजसेवक - जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्य स्तरीय माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने हे आंदोलन करण्यात येणार असून, या कृती समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, गुलाब...

अजिंक्य - हृताचे झाले 'मन बावरे' 'कन्नी'मधील रोमँटिक गाणे प्रदर्शित .

इमेज
मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या 'कन्नी' चित्रपटातील रॅपसाँगनंतर आता या चित्रपटातील सुंदर असे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'मन बावरे' असे गाण्याचे बोल असून या प्रेमगीताला अभय जोधपूरकर आणि किर्ती किल्लेदार यांचे स्वर लाभले आहेत. तर अमर ढेंबरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल शेळके यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. प्रेमात असणाऱ्या प्रत्येकाच्या भावना दर्शवणारे हे गाणे आहे. या गाण्यात हृता आणि अजिंक्यमधील प्रेम फुलताना दिसत असून दोघांचे गोड रोमँटिक क्षण यात पाहायला मिळत आहेत.   या चित्रपटात ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्यासह शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी,चित्रपटाचे निर्माते आहेत.  दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, "प्रत्...

२९ मार्चला येणार 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' मातब्बर कलाकार येणार एकत्र .

इमेज
  ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर’चे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले असून यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले असून नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.   चित्रपटाचे नावच प्रचंड उत्सुकता वाढवणारे आहे. वि...

तरुणांच्या ‘जिव्हारी’ लागणारा चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर! .

इमेज
      देशात राहणाऱ्या प्रत्येक उभरत्या तरुणाचं परदेशात जाऊन आपलं नशीब अजमावून पहाण्याचं स्वप्न असतं. परदेशात राहणाऱ्या अशाच एका तरुणाची कथा ‘जिव्हारी’ या चित्रपटात अलौकिक मांडली गेली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाचा अद्वितीय अनुभव घेता येणार आहे. परदेशात जाऊन नोकरी करणारा महाराष्ट्रातला एक तरुण पुन्हा आपल्या मायदेशी परततो. आपल्या गावी परत आल्यानंतर पुन्हा परदेशाची वाट न धरता इथेच आपल्या उपजीविकेचं साधन शोधण्याचा निर्णय घेतो. जवळजवळ चौदा नोकऱ्या बदलून आई वडिलांवर भार झालेला हा तरुण आयुष्यात पुढे अशी एक गोष्ट करतो, जे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं आहे. ती आश्चर्याची गोष्ट काय असेल हे प्रमुख कलावंत निकिता सुरेश कांबळे, सुयोग सुदर्शन भोरे, ओंकारसिंग उदयसिंग राजपूत, नील राजुरीकर, मनीषा दामोदर मोरे या नवोदित कलाकारांच्या टवटवीत अभिनयाने 'जिव्हारी'ची गोष्ट कळणार आहे. चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन गणेश शंकर चव्हाण यांनी क...

'लॉकडाऊन लग्न'मध्ये अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता रमेश परदेशी दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत.

इमेज
         अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली असून, लॉकडाऊन लग्न हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कांगणे, अमोल कांगणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. चित्रपटातून कोरोना काळातल्या लग्नाची गोष्ट दाखवली जाणार आहे. उत्तम स्टारकास्टसह धमाल, मजेशीर आणि मनोरंजक असं कथानक या चित्रपटाची खासियत आहे.       रमेश परदेशी आणि प्रीतम कांगणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून त्यांच्या सक्षम अभिमनयाचं दर्शन घडवलं आहे. "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटात ते पहिल्यांदा़च भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. बहिणीच्या लग्नासाठी भाऊ किती कष्ट घेतो, बहिणीला चांगला नवरा मिळवून देण्यासाठी तो किती धडपड करतो, हे लग्न जुळवताना त्यालाच एक मुलगी आवडते, त़्या दरम्यान काय धमाल ...

आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' येणार १९ एप्रिलला .

इमेज
आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या'मायलेक' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या  भेटीला आले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर दिग्दर्शिका आहेत. तर या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत.  आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री...

‘ही अनोखी गाठ’मधील 'सखी माझे देहभान' गाणे प्रदर्शित.

इमेज
            झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'सखी माझे देहभान' असे बोल असणारे हे गाणे गौरी इंगवले हिच्यावर चित्रित झाले असून यानिमित्ताने गौरीचा नृत्याविष्कार पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे. वैभव जोशी यांचे भावपूर्ण बोल लाभलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचे संगीत लाभले आहे. सलमान अली आणि हितेश मोडक यांच्या गायकीने गाण्याला एक वेगळेच स्वरूप आले आहे.  या चित्रपटात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, सुहास जोशी, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी यांनी लिहिले आहेत. येत्या १ मार्च रोजी 'ही अनोखी गाठ' प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे.  या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, "अर्थपूर्ण बोल लाभलेल्या गाण्य...

‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित .

इमेज
              मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट लग्नसंस्थेवर भाष्य करणार आहे. तेही अतिशय मनोरंजक पद्धतीने. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.  लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्नकल्लोळ’मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत. यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत. त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल...

"भिशी मित्र मंडळ" चित्रपटात प्राजक्ता माळी सोबत झळकणार अभिनेत्री प्रिया बेर्डे.

इमेज
       आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून  "भिशी मित्र मंडळ" या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली असून त्यामध्ये आता अजुन एका    अभिनेत्रीची वर्णी लागली आहे आणि त्या अभिनेत्री म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे. अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच पुणे येथे सुरु होणार असून संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली ये सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत. फिल्मा स्त्र स्टूडियो हे या चित्रपटाचे वितरण करणार आहेत.   सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यानी आजवर अनेक चित्रपट,मालिकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप त्यांनी उमटवली आहे. भि...

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या 'संघर्षयोद्धा' चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण.

इमेज
मराठा समाज हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा समाज असल्यामुळे .मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या  मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे पूर्ण झाले असून आता हा चित्रपट येत्या २६ एप्रिल २०२४ला  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची   सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे "संघर्षयोद्धा" - मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे, तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली  आहे . या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, ...

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची मोठी घोषणा! रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपट "राजा शिवाजी"

इमेज
      छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा करत भारताच्या असामान्य योद्ध्याचा असाधारण असा जीवन प्रवास पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रकारे सादर केला जाणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्हीं भाषेमध्ये असणार आहे. या ऐतिहासिक कथेमधे बलाढ्य शक्तींविरुद्ध बंड करत स्वराज्य स्थापन करणारा असा असाधारण वीर योद्धा ते आदरणीय ‘राजा शिवाजी‘ यांचा अचंबित करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे.  या चित्रपटाच्यापाठी एक भक्कम टीम असणार असून त्यातील महत्वाचं नावं म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल हे या चित्रपटाची हिंदी आणि मराठी गाणी करणार आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन ह्या चित्रपटानिमीत्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. तसंच या भव्यदिव्य चित्रपटाच्या मागे जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे आणि मुंबई फिल्म कंपनीच्या जेनेलिया देशमुख असणार असून त्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.   ...

'अस्मय थिएटर्स'चे 'मास्टर माईंड' नाटक रंगभूमीवर...

इमेज
       मराठी रंगभूमीवर सध्या सस्पेन्स-थ्रिलर असे 'मास्टर माईंड' हे नाटक विशेष लक्ष वेधून घेत आहे. 'अस्मय थिएटर्स'चे निर्माते अजय विचारे यांनी हे नाटक अलीकडेच रंगभूमीवर आणले आहे. या निमित्ताने मराठी रंगभूमीला एक आश्वासक नाट्यनिर्माता लाभला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे, रसिकांच्या पसंतीस उतरलेली आस्ताद काळे व अदिती सारंगधर ही कलावंतांची जोडी या नाटकात भूमिका साकारत आहे. आतापर्यंत तीन नाटकात एकत्र दिसलेल्या या जोडीने, 'मास्टर माईंड' या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर हॅटट्रिक साधली आहे.         'मास्टर माईंड' हे नाटक प्रकाश बोर्डवेकर यांनी लिहिले असून, त्याची रंगावृत्ती सुरेश जयराम यांनी केली आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि अशोक पत्की यांचे संगीत या नाटकाला लाभले आहे. मंगल केंकरे यांनी नाटकासाठी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. अभय भावे व शरद रावराणे हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत. श्रीकांत तटकरे या नाटकाचे सूत्रधार आहेत. या नाटकातला खरा 'मास्टर म...

हो मी आहे खलनायक ! .'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३' मंचावर आला महाराष्टाचा बॅडमॅन !

इमेज
चित्रपट प्रदर्शित झाला की त्याच्या नायक नायकांची चर्चा शिगेला पोहोचते. हीरो हीरोइनच्या चाहत्यामध्ये वाढ होते . त्यांच्या स्टाईल्स फॉलो केल्या जातात. डायलॉग गाजतात. हे तर आपण नेहमीच पाहतो, पण चित्रपटाच्या नायक नायिकांचा जसा चाहता वर्ग असतो तसाच फॅन क्लब खलनायकांचा सुद्धा असतो. चित्रपटसृष्टीत खलनायकांची परंपरा अभिनयाने जपणारे अनेक दुष्ट कलाकार प्रेक्षकांची वाहवा मिळवत असतात. झी टॉकीजच्या *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* या पुरस्कार नामांकन यादीतील असेच कसलेले खलनायक प्रेक्षकांच्या पसंतीतून मिळणाऱ्या *'महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक'* या पुरस्काराकडे लक्ष लावून बसले होते. प्रेक्षकांनी आपल्या भरभरून मतांचा कौल देत *'महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक'* हा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना दिला आहे .  *झी टॉकीज तर्फे *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'* हा पुरस्कार सोहळा रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याच मंचावर *'महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक'* हा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे स्वीकारणार आहेत. प्...

"वस्त्रहरण" नाटकाच्या ४४ वर्षाच्या निमित्ताने, सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर होणार.

इमेज
मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत  असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले. १६ फेब्रुवारी १९८० साली कै. मच्छिंद्र कांबळी यांनी "वस्त्रहरण" या नाटकाचा पहिला प्रयोग केला.  व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या "वस्त्रहरण" या अजरामर कलाकृतीला आज १६ फेब्रुवारी रोजी ४४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर करणार असून लवकरच प्रयोग क्र. ५२५५ …. मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.

एक खोटारडी.. तर दुसरी कोण असेल?

इमेज
एकविरा म्युझिक प्रस्तुत 'विश्वामित्र' या अल्बममधील तीन गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'विश्वामित्र', 'तुझ्याविना' आणि `दूर दूर' या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील 'खोटारडी' हे तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध, संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. पुष्कर जोग, पूर्णिमा डे, चैत्राली घुले आणि अवधूत गुप्ते यांच्यावर चित्रित झालेले हे रेट्रो साँग नॉस्टॅल्जिक फील देतेय.  या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, " प्रेमात दुरावा आला की प्रत्येकाची नाती तुटतात. प्रेमात दुरावा येण्याची प्रत्येकाची करणे वेगवेगळी असतात. `खोटारडी`या गाण्यातूनही तुटलेल्या हृदयाची एक नवीन गोष्ट भेटीला येणार आहे. 'विश्वामित्र' अल्बममधील हे अखेरचे गाणे असून मला हृदय तुटलेला प्रत्येक जण  हे गाणे स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न करेल. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यावर प्रेम केले तसेच प्रेम या गाण्यावरही कर...

जीवांच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण 'अमलताश' चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित

इमेज
जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखवणाऱ्या 'अमलताश' या चित्रपटाचा रंजक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत, दर्शन प्रॉडक्शन्स, मीडिअम स्ट्रॉन्ग प्रॉडक्शन्स आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.  हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट आहे. चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाताना दिसतेय. बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी आल्याचे दिसतेय, जिला संगीताची आवड आहे. संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे 'त्या' कॅनेडिअन मुलीशी सूर जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ८ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.  चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुहास देसले म्हणतात, ...

भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी आणि राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने घेतली महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह-व्यवस्थापकीय संचालकांची भेट...

इमेज
नुकतीच फिल्मसिटी येथील महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक (Joint MD) माननीय श्री संजय कृष्णाजी पाटील यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडी आणि राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने एक सदिच्छा भेट घेतली आणि काही मागण्या आणि मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली. याप्रसंगी भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष समीर दीक्षित, संपर्कप्रमुख चंद्रकांत विसपुते आणि सरचिटणीस नितीन कोदे  हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग यांच्याकडून अध्यक्ष बाबा पाटील, उपाध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष  रीमा रंजन आणि मीरा भाईंदर चे  राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे शहर प्रमुख रोहित गुप्ता हे पण उपस्थित होते. या महत्त्वाच्या झालेल्या चर्चेमध्ये खालील काही मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून माननीय श्री. संजय कृष्णाजी पाटील यांनी त्याला संपूर्ण सहकार्य आणि पुढे नेण्यास सांगितले. १) चर्चेचा एक प्रमुख विषयांमध्ये महाराष्ट्रातील मराठी चित्रपटाला देणाऱ्या अनुदान विषयी ब...

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

इमेज
आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाच्या मराठी रूपांतराचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना आई आणि मुलाच्या विलक्षण नात्याची अनुभूती येणार आहे. सत्यासाठी जीव देणाऱ्या सत्यवादी आईचा सत्यवादी मुलगा समाजाचा प्रतिनिधी होऊन समाजासाठी लढतो आहे. हा लढा समाजाचं शोषण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात आहे. प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या होणाऱ्या शोषणापासून अखंड समाजाला वाचवू शकेल का चित्रपटाचा नायक? या प्रश्नाचं उत्तर हे चित्रपटात मिळणार आहे.       “प्रत्येक आठवड्याला नव्या चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांचं मनभरून मनोरंजन करत आहोत. या आठवड्यात सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ मराठी भाषेत मराठी प्रेक्षकांसाठी सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. रसिकांना चित्रपट नक्कीच आवडेल अशी मनापासून आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी...

पद्मश्री नयना आपटे यांच्या कारकिर्दीचा गौरव.... चरित्राचे प्रकाशन

इमेज
आपल्या आईकडून कलेचा सक्षम वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनी मालिका, चित्रपट, रंगभूमी, डबिंग अशी चौफेर मुशाफिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या कर्तबगारीने यश, कीर्ती मिळवीत असताना अभिनेत्री नयना आपटे यांनी अनेक अडथळे पार केले. त्यांच्या आयुष्याचा आणि कलेचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. हा प्रवास आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचला असून त्यांच्या या कला प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे ‘अमृतनयना‘ च्या रूपाने. आपल्या समर्थ अभिनयाने आणि सुंदर गायनाने शांता आपटे यांनी रूपेरी पडद्यावर राज्य केले. त्यांच्या चित्रपटांनी त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली. असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करत चित्रपटाच्या इतिहासात “शांता आपटे” हे नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं गेलं. साहजिकच शांता आपटे यांची कन्या म्हटल्यावर नयना आपटे यांच्यावर तशी फार मोठी जबाबदारी होती. अभिनया बरोबरच आपल्या कष्टाने त्यांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत शिकून घेतले. त्याचप्रमाणे नृत्यशिक्षणही त्यांनी घेतले. वयाच्या चौथ्या वर्षापासून नयना आपटे यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपट...

आत्ता 'नामदेव ढसाळ' यांचा हि झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर...

इमेज
द बायोस्कोप फिल्म्सने महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे.  संजय पांडे निर्मित, वरुणा राणा लिखित आणि दिग्दर्शित, प्रताप गंगावणे यांच्या संवादांसह, या बायोपिकमध्ये ढसाळ यांच्या अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या संघर्षाचे वास्तववादी चित्रण करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होऊन २०२५ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संजय पांडे या भव्य चित्रपटाचे निर्माते आहेत. यानिमित्ताने संजय पांडे म्हणाले की, ‘’ पद्मश्री नामदेव ढसाळ म्हणजे वादळ. सोशीत आणि अन्यायाने पीडलेल्या दलित समाजाला नवसंजीवनी देणारा, शब्दात विद्रोहाची आग असलेला पॅंथर, महाराष्ट्राच्या साहित्याला ग्लोबल करणारा पहिला कवी.  त्यांचं जीवन चरित्र म्हणजे एक ज्वलंत मशाल आहे. महाराष्ट्रच काय संपूर्ण देशात दलित पॅंथरने एक राजकीय व सामाजिक ...

एका अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगणार ‘कन्नी’.

इमेज
मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ऋता परदेशात नोकरी करून तिचे आयुष्य सुखकर करायचे आहे. यासाठी तिला तिच्या मित्रांची साथ हवी आहे. परंतु या सगळ्यात तिचे मित्र तिला साथ देणार का तिचे हे स्वप्न अधुरे राहून तिला तिच्या मायदेशी परतावे लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना ८ मार्चला मिळणार आहे.  टिझरवरून हा चित्रपट मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे दिसतेय. यात प्रेम, मैत्री, स्वप्नांचा मागोवा घेणाऱ्या कथेला विनोदाची आणि भावनांचीही जोड आहे.  ‘कन्नी’चे लेखनही समीर जोशी यांचे असून यात ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर आणि अजिंक्य राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, " आयुष्या...

‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने ‘ही अनोखी गाठ'मधील ‘मी रानभर’ प्रेमगीत प्रदर्शित.

इमेज
झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. 'मी रानभर' असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले असून बेला शेंडेचा या प्रेमगीताला सुमधूर आवाज लाभला आहे. तर हितेश मोडक यांचीही या गाण्यासाठी साथ लाभली आहे. हितेश मोडक यांचेच संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांचे बोल लाभले आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिचे बहारदार नृत्य पाहाण्याची संधी प्रेक्षकांना या गाण्यातून मिळणार आहे.  या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, " प्रेमदिनाच्या निमित्ताने हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या गाण्यात अधिक रंगत येत आहे. नवीन नात्याची सुरूवात या गाण्यातून दिसत आहे. हे नाते कसे बहरतेय, याचे सुंदर चित्रण यातून सादर होत आहे.’’        झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, " अनोखी प्रेमकह...

'व्हॅलेन्टाईन्स डे' विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर.

इमेज
महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा 'व्हॅलेन्टाईन्स डे'चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत ओटीटी प्रेक्षकांचे बेमालूम मनोरंजन करीत आहेत. व्यक्ती आवडणं. प्रेम व्यक्त करणं. प्रेमात बेधुंद होणं. वाट्याला विरह येणं. हे सगळं या चित्रपटात पहायला मिळणार असून या सर्व भावनांना आणखी ठळक करत, मनाचा ठाव घेणारी गाणी प्रेक्षकांना हळवं करीत आहेत. कष्टाळू आणि जबाबदार युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पहायला मिळणार आहे. “प्रेमाने जग जिंकण्याएवढी ताकत असते असं म्हणतात, अशाच प्रेमातून आजच्या युवकांना आयुष्यातील एक प्रेरणादायी धडा शिकवणारा चित्रपट ‘एक ती’ प्रदर्शित करताना मन हर्षित होत आहे. अशा प्रकारचे दर्जेदार चित्र...

'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात.

इमेज
  || शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर                 जाहला ।।        या दोन ओळींतच खर्‍या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो. छत्रपती संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं त्या हिमालयाएवढं कर्तुत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मनोमन नमन केलं जातं, अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती अणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य रक्षणार्थ अनंत अत्याचार सोसत बलिदान देणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट या चित्रपटाचे  प्रस्तुतकर्ते आहेत.          स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रच...