Posts

Showing posts from July, 2024

पोस्टर रिलीजद्वारे 'रघुवीर' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित...२३ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार...

Image
महाराष्ट्राला महान साधू-संतांची थोर परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील संत समर्थ रामदास स्वामी यांची थोरवी खूप मोठी आहे. सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दासबोधसारखा महान ग्रंथ लिहिणारे तसेच सुखकर्ता दुःखहर्ता हि दैनंदिन पूजेतील आरती रचणारे समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'रघुवीर' या आगामी चित्रपटाद्वारे समर्थांचा महिमा जगासमोर येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक नवीन पोस्टर रिलीज करून घोषित करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी 'रघुवीर' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'रघुवीर'ची निर्मिती डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगानं समर्थ क्रिएशन्स यांनी केली आहे. अभिनव विकास पाठक या चित्रपटाचे निर्माते असून वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॉ. किरण छगन बडगुजर सहनिर्माते आहेत. खुशी अॅडव्हरर्टायझिंग आयडियाज प्रा. लि. या चित्रपटाचे मार्केटिंग पार्टनर असून सिनेपोलिस या चित्रपट वितरण समूहाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निलेश कुंजीर यांच्या दिग्दर्शनाखाली तय

स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम!!!!!!

Image
प्रायोगिक, व्यावसायिक नाटय़सृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. तुफान लोकप्रियता मिळवणारं 'अलबत्या गलबत्या' नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे.   झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत  थिएटर निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी ७.०० ते रात्री १०.३० यावेळेत हे ६ विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी मंदिर  मध्ये रंगणार आहेत.  मराठी रंगभूमीवर 'मैलाचा दगड' ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांनाच एक मोठं आव्हान असलं तरी कलावंतांना हा नाट्यानुभव खूप काही शिकवणारा असेल असं मत निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केलं. हा भव्य न

'लाईफलाईन' मधील 'होत्याचं नव्हतं झालं' हे हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित .

Image
क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत 'लाईफलाईन' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार असून ही चुरस रंगणार आहे अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यामध्ये. त्यामुळे अशा दिग्गजांना एकत्र पाहाण्यासाठी प्रेषक खूपच उत्सुक आहेत. त्यातच आता या चित्रपटातील 'होत्याचं नव्हतं झालं' हे मनाच्या खोलवर जाणारे गाणेही प्रदर्शित झाले आहे. राजेश शिरवईकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अशोक पत्की यांच्या संगीताची जोड लाभली आहे. तर हे हृदयस्पर्शी गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायले आहे.  एक प्रख्यात डॉक्टर आणि जुन्या परंपरेला मानणाऱ्या किरवंताच्या विचारांमधील लढाई यात पाहायला मिळणार आहे. दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यात या दोघांपैकी एकावर संकट आल्याचे दिसत आहे. या संकटाशी झुंज देताना मनातील घालमेल या गाण्यातून शब्दरूपाने समोर येत आहे. या गाण्याची प्रत्येक ओळ मनाला भिडणारी आहे. आता या संकटातून, संघर्षातून कसा मार्ग निघेल, हे प्रेक्षकांना २ ऑगस्टला

'अ परफेक्ट मर्डर' नाटकात डॉ. श्वेता पेंडसे यांचं पुनरागमन.

Image
आपल्या उत्तम आणि सयंत  अभिनयाने डॉ. श्वेता पेंडसे हिने  अनेक भूमिका सशक्तपणे  पेलल्या आहेत. आता 'अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी  तिने खाकी वर्दी चढवली आहे. रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी हे या नाटकाचं  वैशिष्टय असून लवकरच या नाटकात अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे खाकी वर्दीत  दिसणार असून तिच्या येण्याने नाटकाला कलाटणी मिळणार आहे.  बदामराजा प्रॉडक्शन्स संस्थेच्या या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे, निनाद कर्पे आहेत. गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत या नाटकाने  आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचं खरं रहस्य उलगडण्याचा खेळ  म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक. अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट  देण्यासाठी अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या

अंकित मोहन म्हणतो "मी मराठीच" !

Image
हिंदी टेलिव्हिजनवर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर दिल्लीच्या अंकित मोहनने मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडली. अंकितने ऐतिहासिक चित्रपटातच्या माध्यमातून मराठीत पदार्पण केले. आणि बघताबघता त्याने मराठीतही स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला. त्यांनतर त्याने आणखी काही ऐतिहासिक चित्रपटही केले. आता अंकित आगरी-कोळी भाषेत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा 'बाबू' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिल्लीचा अंकित चक्क आगरी कोळी भाषेत बोलताना दिसणार आहे.  अंकित मराठीच्या अनुभवाबद्दल बोलतो, '' मी आता मराठीच आहे. खरंतर माझे नाव आता अंकित मोहनकर किंवा अंकित मोहन पाटील करायला पाहिजे.  इतका मी मराठी सिनेसृष्टीत रुळलो आहे. ही भाषा आता मला माझीच भाषा वाटते.  ऐतिहासिक चित्रपटांसाठी मी मराठी भाषा शिकायला सुरुवात केली. तर आता 'बाबू'च्या निमित्ताने मी आगरी-कोळी भाषा शिकलो. कोळी भाषा खूप गोड आहे. माझी मराठी भाषेचा सराव करण्याची एक पद्धत आहे. मी गाडीत, घरात, जिममध्ये ऑडीओवर सतत डायलॉग्स ऐकत राहतो. त्यामुळे मला ते कसे उच्चरायचे हे कळते. सेटवरही मी सहक

'आई तुळजाभवानी' मालिका लवकरच येणार 'कलर्स मराठी'वर.

Image
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे 'आई तुळजाभवानी'. महाराष्ट्राची लाडकी वाहिनी 'कलर्स मराठी'वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भक्तांच्या हाकेला त्वरित धाऊन येणारी, स्वराज्य रक्षिण्या तळपती तलवार भेट देणारी 'आई भवानी', अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे.

'सूर-ताल' विलेपार्ले(पूर्व)'ची एस डी व आर डी बर्मन अर्थात पंचमदांना संगीतमय आदरांजली.

Image
मुंबईतील 'सूर-ताल'-विलेपार्ले(पूर्व) ही संस्था गेली अनेक वर्ष संगीत साधनेसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि नवोदित कलावंत यांच्यासाठी 'सुर ताल'चे व्यासपीठ कायम उपलब्ध आहे. गतवर्षी गानसम्राज्ञी 'भारतरत्न लता मंगेशकर' आणि 'संगीतकार बप्पी लाहिरी' यांना संगीतमय आदरांजली वाहणारी ‘सांज ये गोकुळी’ ही बहारदार सुरेल मैफिल 'सूर-ताल'ने आयोजित करून गिरगांवकरांची पसंती मिळविली होती. २२ जुन रोजी झालेल्या कार्यक्रमात खास एस डी आणि आरडींच्या गाण्यांची मैफिल परत एकदा आयोजित करण्याची विनंती 'सूर-ताल'च्या आयोजकांना गिरगावकरांकडून करण्यात आली होती. त्यानुसार म्युझिकल वर्ल्ड ऑफ बर्मन हा एस डी आणि आरडी बर्मन  ह्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या अजरामर बहारदार लोकप्रिय गाण्यांचा गिरगावाकरांना आनंद घेता येणार आहे. ह्या कार्यक्रमाला डॉक्टर जितेंद्र खेर ह्यांच्या माउंटन रेज ह्या कंपनी चे सह प्रायोजकत्व लाभले आहे. या कार्यक्रमात एस डी आणि आर डी ह्यांची लोकप्रिय गाणी गायिका अमृता, संध्य

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, 22 ते 28 जुलै समाधी सोहळा, संध्या. 6:30 वा. फक्त 'कलर्स मराठी'वर, आणि कधीही ''जिओ' सिनेमावर.

Image
    कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. विविध रूपात अन् विविध अवतारात बाळूमामांनी त्यांच्या अद्भुत लीलांनी त्यांच्या भक्तांना आणि 'कलर्स मराठी'च्या प्रेक्षकांना अनेकदा अचंबित केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केले. गेली अनेक वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण आता ही लोकप्रिय भक्तिरसपूर्ण मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.      बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या चरित्रातील अनेक प्रसंग रसिकांना ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत पाहायला मिळाले आहेत. शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामांचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला.       महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. कलर्स मराठीवर काही वर्षांपूर्वी सुरू झालेली 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही

"मन प्रेमात रंगले"... 'नेता गीता' चित्रपटातलं पहिल गाणं लाँच.

Image
कॉलेज जीवनातील राजकारण, प्रेम यांची गोष्ट गुंफून साकारलेल्या "नेता गीता" या चित्रपटातून प्रेक्षकांना म्युझिकल ट्रीट मिळणार आहे. या चित्रपटातलं "मन प्रेमात रंगले..." हे पहिल गाणं लाँच करण्यात आलं आहे. हिंदी चित्रपटाच्या तोडीचं असलेलं हे गाणं गायक अभय जोधपूरकरनं गायलं असून, म्युझिकल ट्रीट देणारा 'नेता गीता' हा चित्रपट २३ ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  सिम्बारिया फिल्म्सतर्फे "नेता गीता" या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात येत आहे.  सुधांशु बुडूख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात शिवानी बावकर, सुधांशु बुडूख, रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काळे, अजय तपकिरे, विराज अवचिते, सुहास जोशी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीव हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.  कॉलेज जीवन म्हटल्यावर प्रेम स्वाभाविकपणे येतं. मात्र "नेता गीता" या चित्रपटात कॉलेज काळातल्या निवडणुका, त्या वेळचं प्

‘तू भेटशी नव्याने' मालिकेला प्रेक्षक पसंती.

Image
वैविध्यपूर्ण आशय-विषय यामुळे काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरतात. सध्या अशाच एका मालिकेची जोरदार चर्चा आहे, ही मालिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील 'तू भेटशी नव्याने'. सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. या मालिकांवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलं आहे. मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी आणि प्रेमाचा विषय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरली आहे.‘उत्तम कथा’, ‘माही आणि अभिमन्यू  यांचा संवाद लाजवाब’,‘आम्हांला खूप आवडते ही मालिका’,  ‘उत्तम अभिनयाने नटलेली ही मालिका पाहण्याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय’. ‘एआयचा उत्तम वापर असलेली सर्वोत्कृष्ट मालिका’ अशा अनेक चांगल्या प्रतिकिया प्रेक्षकांकडून येतायेत.    अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालाय, याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या शुभहस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त २९ जुलै रोजी ग्रंथाचे प्रकाशन;"उत्कृष्ट संसदपटू" आणि "उत्कृष्ट भाषण" पुरस्कारांचे वितरण.

Image
मुंबई, दिनांक २४ जुलै, २०२४– महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते सोमवार, दिनांक २९ जुलै, २०२४ रोजी "वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व" या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते ५.०० यावेळेत हा समारंभ आयोजित करण्यात आला असून यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील निवड केलेल्या सन्माननीय सदस्यांना "उत्कृष्ट संसदपटू" आणि "उत्कृष्ट भाषण" पुरस्काराने राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत दिली.  .    या समारंभास राज्यपाल  रमेश बैस,  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,  उप मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, दोन्ही सभागृहांचे  विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानस

कास्टिंगवाइबमुळे प्रादेशिक कलाकारांना मोठ्या निर्मितीसंस्था, TV वाहिनी आणि ओटीटीवर त्यांचे काम दाखवणे आता सोपे आणि विनामूल्य.

Image
भारताची फिल्म, टीव्ही, आणि ओटीटी इंडस्ट्री सध्या जोरदार वाढत आहे. अभिनय, गायन, नृत्य, दिग्दर्शन, कॅमेरा, पटकथा लेखन आणि इतर अनेक संधी उपलब्ध आहेत. पण, अनेक प्रादेशिक प्रतिभावान कलाकारांसाठी या संधींपर्यंत पोहोचणं सुद्धा खरंतर कठीण आहे, विशेषतः ग्रामीण भागातील कलाकारांसाठी. कोविडमुळे त्यांची शहरात येऊन काम करण्याची स्वप्नं अधिकच दूर गेली आहेत. हे मी का म्हणालो तर ते आता समजून घेऊया. एखाद्या प्रादेशिक प्रतिभावान कलाकाराचे उदाहरण पाहूया. नागपूरच्या एका लहान गावातील एक गुणी कलाकार शिल्पा, जिचं स्वप्न आहे ते म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठी हिरॉईन व्हायचं. ती नेहमीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे अनुकरण करत, तिच्या मोठ्या स्वप्नांमध्ये हरवून जायची. पण भेदक वास्तव मात्र तिला ते स्वप्नांतून बाहेर आणायचं. तरीही एकदा धीर करून ती मुंबईला आली. पहिला मुंबईमध्ये जिथे ऑडिशन होतात त्या जवळ घर शोधण्याचे दिव्य, नंतर ऑडिशनच्या लाईनमध्ये तासंतास वाट पाहत होणारी जीवघेणी तीव्र स्पर्धा यामुळे ती घाबरली. नंतर मुंबईमधील उच्च जीवन, त्यावर होणारा खर्च आणि मनोरंजन इंडस्ट्रीतील योग्य संपर्काअभावी ऑ

'बाबू' मधील 'फ्युचर बायको' गाणे प्रदर्शित .

Image
श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत  'बाबू' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच आगरी- कोळी स्टाईलने दिमाखात पार पडला. प्रेम, ऍक्शन, स्टाईल, धमाका, राडा असे  मनोरंजनाचे पॅकेज असणाऱ्या या चित्रपटातील एक नवीन गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. 'फ्युचर बायको' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा दमदार आवाज लाभला आहे. मनातील प्रेमभावना प्रेयसीसमोर व्यक्त करणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून ऋषिकेश कामेरकर यांचे या धमाल गाण्याला संगीत लाभले आहे.  अंकित मोहन आणि रुचिरा जाधव यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात बाबू शेठची जगावेगळी प्रपोज करण्याची स्टाईल आणि सुप्रियाचे नखरे दिसत आहेत. आगरी भाषेतील गोडवा आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत या गाण्यात दिसत आहे. 'फ्युचर बायको' हे गाणे प्रेमात असणाऱ्या प्रत्येकाचे मन घायाळ करेल असेच आहे. ९० च्या शतकातील 'बाबू शेठ' च्या आयुष्याची ही कथा आहे. 'बाबू' चा बाबूशेठ कसा होतो, हे जाणून घ्यायचे असल्यास हा चित्रपट बघावा लागेल.  या गाण्याबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हण

आनंदी वास्तू प्रोडक्शनचे ‘स्वामी शक्ती’ भक्तीगीत भेटीला.

Image
        आनंदी वास्तू प्रोडक्शनच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त  स्वामी शक्ती हे भक्तीगीत आनंद पिंपळकर यांच्या ‘आनंदी वास्तू’ या यूट्यूब चॅनलवर  प्रदर्शित झाले आहे. एखाद्या शॉर्टफिल्म प्रमाणे  गीताचे  चित्रण करण्याची परंपरा व पद्धत आनंदी वास्तू प्रोडक्शनने केली असून गाण्याच्या माध्यमातून कथा सादरीकरण, गीतातून चित्रपटाची भव्यता दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.      स्वामी शक्ती हे गीत स्वामी भक्तांना ही पर्वणी असून योगेश तपस्वी यांच्या आवाजातील, हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या या गाण्याला तेजस सालोखे यांनी संगीत दिले आहे. याचे चित्रीकरण नुकतेच पुणे येथे झाले. स्वामी शक्ती या भक्तिमय गाण्यांमध्ये सामाजिक संदेश देण्यात आला आहे. अन्यायग्रस्त मुलीला न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या ६५ वर्षीय जोशी काका व जोशी काकूंची ही कथा आहे. पांढरपेशा पापभिरू रिटायर्ड साधा माणूस जीवनात ठरवलं तर काय करू शकतो. समाज बदलण्याची ताकदही  ठेवू शकतो. सामान्य माणसाची असामान्य ताकद काय आहे हे या गीतामधून आपल्याला पहायला मिळते. कर्तुत्वाला, नेतृत्वाला आणि दातृत्वाला जर श्री गुरूची साथ असेल तर कोणतेही शिवधनुष्

पुष्कर जोग घेऊन येतोय 'टॅबू' ...

Image
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर समोर आलेला चेहरा म्हणजे पुष्कर जोग. आजवर पुष्करने आपल्या वैविध्यपूर्ण, नैसर्गिक अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली आहेच. याशिवाय नात्यांसारख्या संवेदनशील विषयांवरील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केले आहे. इतकेच नाही तर त्याच्या प्रत्येक चित्रपटाची काही खासियत असते. प्रत्येक चित्रपटात त्याचा एक वेगळा प्रयत्न असतो. यंदाचे वर्ष तर पुष्करसाठी जास्तच खास आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने 'मुसाफिरा'सारखा भव्य चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर येथे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या ठिकाणी चित्रीकरण करणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. तर 'कोक' या आगामी बॉलिवूड चित्रपटात पुष्कर लीड रोलमध्ये झळकणार असून लवकरच त्याचा ' 'धर्मा- दि एआय स्टोरी' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी  चित्रपट आहे.   यात अभिनयासह दिग्दर्शनाची जबाबदारीही पुष्करने सांभाळली आहे. एका पाठोपाठ हे प्रोजेक्ट्स असतानाच आता पुष्करने एका नवीन चित्रपटाची घो

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वा. कलर्स मराठीवर.

Image
मराठी मनोरंजनाचा बॉस 'BIGG BOSS मराठी'चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. 'बिग बॉस मराठी'चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार  आहे.. 100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत.. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत. 'बिग बॉस'च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे. रितेश देशमुख आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवणार आहे. या खेळात धमाल आहे, मस्ती आहे, मनोरंजनाचा राडा आहे, धुरळा आहे. फॉरमॅट ओन बाय बनिजय ग्रुप, बनिजय आणि एंडेमॉल शाइन इंडिया निर्मित, विशेष प्रायोजक SANTOOR, पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या सहयोगाने 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन येत्या रविवारपासून दररोज रात्री 9 वा. पाहा आपल्या 'कलर्स मराठी'वर. 'बिग बॉस मराठी'च्या या चक्रव्यूहात विविध क्षेत्रातील कमाल अतरंगी स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता हे अतरंग

झी टॉकीजवर बघा दादा कोंडके यांचे क्लासिक ब्लॅक अँड व्हाइट मराठी चित्रपट रंगीत स्वरूपात...

Image
झी टॉकीजने नेहमीच मराठी चित्रपटांना आणि गाण्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या क्लासिक चित्रपटांच्या प्रसारणामुळे आणि विशेष कार्यक्रमांच्या आयोजनामुळे त्यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यांच्या स्ट्रॅटेजिक प्रोग्रामिंगमुळे त्यांनी उच्चतम ग्रॉस रेटिंग पॉइंट्स (GRPs) मिळवले आहेत, ज्यामुळे झी टॉकीज नेहमीच मराठी चॅनेलमध्ये आघाडीवर राहिले आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते दादा कोंडके यांच्या काही लोकप्रिय आणि अविस्मरणीय चित्रपटांना झी टॉकीजने रंगीत स्वरूपात सादर करून प्रेक्षकांना नवीन आनंद दिला आहे.*"पांडू हवालदार", "आंधळा  मारतो डोळा", "एकटा जीव" आणि "सोंगाड्या"* हे दादा कोंडके यांचे चित्रपट आता झी टॉकीजवर *रंगीत* स्वरूपात बघायला मिळतील. दादा कोंडके यांच्या चित्रपटांमध्ये हास्यविनोद, गाणी आणि संवाद आजही तितकेच ताजे वाटतात. त्यांच्या चित्रपटांचे रंगीत रूपांतर प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे. याआधी इतर टेलिव्हिजनवर हिंदी चित्रपट "*मुघल-ए-आझम*" आणि "*श्री ४२०*" यांना देखील रंगीत स्वरूपात सादर कर

"नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा मनोरंजक प्रवास २० सप्टेंबरपासून.

Image
सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच "नवरा माझा नवसाचा 2" हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. नुकतेच मुंबई येथील श्री. सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते. .    सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती,  कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत

फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा प्लॅनेट मराठीवरवरील 'आयुष्याची जय'मध्ये शिव ठाकरेने व्यक्त केली खंत .

Image
प्लॅनेट मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन विषय, आशय घेऊन येते. आपली हीच परंपरा कायम ठेवत प्लॅनेट मराठी असाच उत्सुकता वाढवणारा 'आयुष्याची जय' हा एक पॉडकास्ट शो घेऊन आला आहे. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींसोबत यात भरपूर गप्पा मारल्या जाणार आहेत. अनेकांना आपल्या लाडक्या कलाकारांबद्दलचे  माहित नसलेले अनेक किस्से यावेळी शेअर केले जातील आणि या कलाकारांसोबत गप्पा मारणार आहे, सर्वांची लाडकी सूत्रसंचालिका जयंती वाघधरे. या शोच्या पहिल्याच भागात बिग बॉस मराठी सिझन २ चा विजेता शिव ठाकरे सहभागी होणार असून यावेळी त्याने अनेक त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.  प्रोमोमध्ये शिव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम, व्यक्त करताना दिसत आहे. त्याचे गडांप्रती असलेले प्रेमही यातून दिसत आहे. त्यामुळे या शोमधून शिव किती महाराजभक्त आहे, याचे दर्शन घडतेय. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात.  त्यामुळे महाराजांचे फक्त नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा, अशी विनंतीही शिवने यावेळी केली आहे. याव्यतिरिक्त शिवच्

काळजाचा ठाव घेणाऱ्या "धर्मवीर - २" चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च.

Image
चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या "धर्मवीर - २" चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलीवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती.  साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी "धर्मवीर - २" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रचंड उत्सुकता होती.       २०२२ ला "धर्मवीर" चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला. दिघे साहेबांचे कार्य खुप मोठे आहे जे केवळ एका भागत दाखवणे शक्य नाही.          दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल नाही तर त्या पावलांवर जीव टाकून आम्ही काम करतो आहे. या चित्रपटात एक डायलॉग आहे "कार्

'बाबू' नाय… बाबू शेठ’ ॲक्शनपट ‘बाबू’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात संपन्न ....

Image
    बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश 'बाबू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली. तर 'बाबू'नेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एन्ट्री घेतली. यावेळी ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. आपल्या कोळी बांधवांना, भगिनींना घेऊन तो ही या कोळी नृत्यात सहभागी झाला. या उत्साहाने भरलेल्या वातावरणात अंकितच्या २० फूट पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या भव्य सोहळ्यात चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, इतर टीमसह कोळी बांधवही सहभागी झाले होते.   प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील  प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.  चित्रपटाबद्दल

'किशोरी आंबिये’ ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत दिसतायेत वेगळ्या भूमिकेत.

Image
कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी  नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत दिसतायेत. कॉलेजच्या प्राध्यापिकेची भूमिका त्या यात साकारत आहेत. पद्मिनी गाडगीळ असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा  यात साकारत आहेत. ही मालिका  सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. प्रसारित होते. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली  ‘तू भेटशी नव्याने’  ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांत वेगळ्या शैलीत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते  संदीप जाधव आहेत.    या मालिकेत किशोरी आंबिये' यांचे दोन ट्रॅक असून त्यांच्या नव्या व्यक्तिरेखेमुळे मालिकेत काय वळण येणार? हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन काळातल्या व्यक्तिरेखा त्या यात साकारत असून प्राध्यापिकेच्या भूमिकेनंतर  नव्या ट्रॅकमध्ये त्या कोणत्या रूपात दिसणार? आणि त्यांच्या येण्याने अभ

डिजिटल युगात आणखी एक पाऊल,अभिनेता 'अमेय वाघ'चे स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले.

Image
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ ओळखला जातो. काला पानी, असूर यांसारख्या हिंदी वेबसीरिज, दिल दोस्ती दुनियादारी सारखी लोकप्रिय मालिका आणि फास्टर फेणे, मुरांबा, धुरळा यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून अमेयने आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही अमेयचे अनेक प्रोजेक्ट्स लाईन अप आहेत. त्याबद्दल अमेय सोशल मिडियावर चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. आता अमेय त्याच्या चाहत्यांसाठी एक भन्नाट बातमी घेऊन आला आहे. 'ती' म्हणजे अमेयने डिजिटल युगात आणखी एक पाऊल टाकले आहे. अमेयने चाहत्यांशी दिल से कनेक्ट होता यावे म्हणून स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले आहे. असे करणारा मराठी सिनेसृष्टीतील अमेय वाघ हा पहिलाच कलाकार ठरला आहे. त्यामुळे इथून पुढे चाहत्यांना अमेयचे आगामी प्रोजेक्ट्स आणि प्रदर्शनाच्या तारखा आता एका क्लिकवर समजणार आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अमेय झोन (AmeyZone) हे व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करु शकता.  तेव्हा आजच व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करा आणि वाघ सेनेत सामील व्हा! Link https://whatsapp.com/channel/0029Vaf30XYLo4hlgb2g161x

डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार?..... 'लाईफलाईन' चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित.

Image
    डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, सुश्रुत मंकणी, अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत नुकताच 'लाईफलाईन' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.   ट्रेलरमध्ये डॉक्टर आणि किरवंताची लढाई दाखवण्यात आली असून ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत तर माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. त्यामुळे या लढाईत कोण जिंकणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होतो, याची जाणीव करून देणारा हा च

अभिनेता अमित रेकी, ही वारी माझ्यासाठी एक जीवन बदलणारी अनुभूती ठरली आहे.

Image
पंढरपूर वारी, महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित वार्षिक धार्मिक यात्रा, असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. विठोबाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली मार्गावरून पंढरपूरकडे निघतात. यंदा, या यात्रेचे विशेष कव्हरेज करण्याची संधी झी टॉकीजने अमित रेकी या गुणी कलाकाराला दिली, ज्यात तो २१ दिवस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. झी टॉकीजचा  उपक्रम वारीच्या या विशाल सोहळ्यात झी टॉकीजने भक्तांसाठी खास उपक्रम राबवले आहेत. झी टॉकीजने एक भव्य चित्ररथ साकारला आहे ज्यात १२ फुटांची विठोबा आणि रुक्मिणीची मूर्ती आहे. हा चित्ररथ वारीच्या मार्गावर फिरत भक्तांना प्रत्यक्ष मंदिरात असल्याची अनुभूती देतो. त्याचप्रमाणे, एक दुसरा चित्ररथ आहे, ज्यावर विठोबा-रुक्मिणीसाठी वस्त्र तयार होत आहेत, ज्यात वारकरी सुद्धा श्रमदान करत आहेत. झी टॉकीजच्या या अनोख्या उपक्रमामुळे भक्तांची श्रद्धा अधिक वृद्धिगंत झाली आहे. अमित रेकी याचा अनुभव वारीच्या प्रवासात अमित रेकी यांनी वारकऱ्यांच्या संघासह प्रवास केला. "वारी हा एक अद्वितीय अनुभव आहे. प्रत्येक पावलावर भक्तांचा उत्साह, श्रद्धा आणि प्रेम जाणवते," अम

डॉ.शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र.

Image
अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद असणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडलेले आणि प्रामुख्याने मराठी रंगभूमीवर सक्रिय असणारे हे दोन कलावंत आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटात दिसणार आहेत.  व्यवसायाने डॉक्टर असलेले शरद भुताडिया हे मराठी रंगभूमी आणि मराठी, हिंदी चित्रपटातील नावाजलेले अभिनेते. कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ या हौशी नाट्य संस्थेतर्फे ते १९८२पासून दिग्दर्शन करीत आहेत. त्यांनी साकारलेल्या ‘किंग लिअर’, ‘जोतिबा फुले’, तसेच ‘आईनस्टाईन’ यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी स्वत:ला जोडून घेऊन ‘व्हय मी सावित्रीबाई’, ‘तिच्या आईची गोष्ट’, ‘द मदर‘, ‘द घरवाली’ या आपल्या नाटयकृतींमध्ये स्त्री-सक्षमीकरणाचा जागर करणाऱ्या सर्जनशील कलावंत म्हणून अभिनेत्री सुषमा देशपांडे ओळखल्या जातात. ‘घरत गणपती’ या चित्रपटात हे दोघे आजी आणि आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. कुटुंबप्रमुख असलेले ‘आप्पा’ आणि ‘माई’ यांची महत्त्वपूर्ण

धनंजय भावलेकर दिग्दर्शित 'कर्मवीरायण' उद्या १९ जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात..

Image
'कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट, महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे १९ जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे. ट्रान्सएफेक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या "कर्मवीरायण" चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. या चित्रपट पटकथा

'मुघल-ए-आझम' फेम आणि महाराष्ट्राचा अभिमान 'प्रियांका बर्वे' अनंत अंबानींच्या ताऱ्यांनी गजबलेल्या मंगल उत्सवात.

Image
भारतातील सुप्रसिद्ध गायिका आणि थिएटर अभिनेत्री प्रियांका बर्वे आपल्या पती सारंग कुलकर्णी यांच्यासह अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या मंगल उत्सवाच्या स्वागत समारंभात सहभागी झाल्या. मुकेश अंबानी यांचा सुपुत्र अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रियांका बर्वे यांनी मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या गायन कौशल्याबरोबरच थेटरमधील अभिनयासाठीही त्यांना खूप कौतुक मिळाले आहे. फिरोज खान यांच्या मुघल-ए-आझम: द म्युझिकल नाटकात अनारकलीची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काल मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अंबानी कुटुंबाच्या ताऱ्यांनी गजबलेल्या मंगल उत्सवाचा समारंभ पार पडला. या समारंभात प्रियांका बर्वे यांना बोलावून अंबानी यांनी त्यांचे महाराष्ट्राचे प्रेम आणि आदर दाखवला. त्यांच्या उपस्थितीने या रंगारंग सोहळ्याला एक सांस्कृतिक शोभा मिळाली. प्रियांका यांनी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटले की, "या शाही उत्सवाचा भाग होऊन मला खूप आनंद झाला. इथले प्रेम आणि आपुलकी खूपच भावली.

झी टॉकीजचा विशेष उपक्रम: वारीत विठोबा-रुक्मिणीची भव्य मूर्ती आणि वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे .

Image
पंढरपूरची वारी म्हणजे संतांचा उत्सव, यंदा झी टॉकीजच्या विशेष आयोजनामुळे अधिकच रंगतदार झाली आहे. झी टॉकीजने दोन भव्य कॅन्टर ट्रकची उभारणी केली असून, त्याठिकाणी १२ फूट उंचीच्या विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे वारीला एक विशेष आकर्षण मिळाले आहे. .  वारीच्या २१ दिवसांच्या प्रवासात झी टॉकीजची टीम ३०० दिंड्यांसह सहभागी झाली . पण झी टॉकीज यंदा वारीला आणखी एक अनोखी आयडिया घेऊन आली . त्यांनी प्रत्येक वारकऱ्याच्या मदतीने कॅन्टर ट्रकवर माऊलींची वस्त्रे आणि रुक्मिणीची साडी  बनवण्याचे नियोजन केले आणि सर्व वारकर्यांनी केलेल्या श्रमदानामुळे माऊलींची अतिशय सुंदर अशी वस्त्रे तयार झाली आहेत .  ही वस्त्रे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करण्यात येणार आहे, ज्यामुळे वारीचे धार्मिक महत्त्व आणखी वाढणार आहे.    गेल्या वर्षी झी टॉकीजने तुकाराम महाराजांच्या मार्गाचा अवलंब केला होता, तर यंदा ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गाने प्रवास करणार आहेत. या वर्षीची वारी २९ जून ते १७ जुलै दरम्यान सुरु आहे.    या कॅन्टर ट्रकवर अनेक सेलिब्रिटींनाही माऊलींचे दर

उत्सुकता वाढवणारा 'गूगल आई'चा ट्रेलर प्रदर्शित....

Image
शोध... भीती...  काळजी...  वेदना...  अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून 'गूगल आई'मध्ये काय रहस्य दडलेय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच 'गूगल आई' बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरने प्रेक्षक 'गूगल आई'ची आतुरतेने वाट पाहात आहेत.   विविध भावनिक छटा उलगडणारा 'गूगल आई' चित्रपटाचा रंजक, रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत 'गूगल आई' या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांचे आहे. तर ‘गूगल आय’ला एस सागर यांचे संगीत लाभले आहे. प्रणव रावराणे,  प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  ट्रेलरमध्ये एक हसतेखेळते, आनंदी कुटुंब दिसत

आपण शोधायचं का रोहित चौहानला ? ११ ऑक्टोबरला 'लाईक आणि सबस्क्राईब'मध्ये होणार उलगडा ....

Image
 हॅशटॅग, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. याच धाटणीवर आधारित 'लाईक आणि सबस्क्राईब' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून येत्या ११ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोशन पोस्टरमध्ये 'आपण शोधायचं का रोहित चौहानला? ' असा प्रश्न विचारण्यात आला असून हा रोहित चौहान नक्की कोण आणि त्याचा 'लाईक आणि सबस्क्राईब'शी काय संबंध? हे जाणून घेणे औस्त्युक्याचे ठरणार आहे. दरम्यान पहिली झलक पाहाता हा रहस्यपट असल्याचे कळतेय. त्यामुळे आता प्रेक्षकांना रोहित चौहानला जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे.   नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

Image
राजकारणात फक्त रस असून चालत नाही, तर समाजभान असणं गरजेचं असतं. समाजासाठी उभा राहिलेल्या एका तरुण कार्यकर्त्याच्या भोवती फिरणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा १५ जुलै २०२४ रोजी सोशल मीडियावर पोस्टर लॉंच झाला आहे. पोस्टर सोशल मिडियावर तरूणांना आकर्षित करत असून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.  प्रकाश फिल्म्स प्रस्तुत ‘युवानेता’ चित्रपट योगेश रमेश जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. राजू राठोड आणि जगदीश कुमावत यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.      पोस्टरमध्ये लाखोंच्या संख्येत असणारा समाज रस्त्यावर उतरला आहे. हातात झेंडे घेऊन जणू झोपलेल्या प्रस्थापितांना जागं करण्यासाठी मोर्चा निघालेला आहे. तळागाळातून आलेला एक तरुण हात उंचावून संपूर्ण समाजाचं नेतृत्व करताना दिसत आहे. ‘सभेत सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता की युवानेता?’ असा प्रश्न करून पोस्टरने चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता वाढवली आहे.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते "धर्मवीर - २" चित्रपटाचं म्युझिक लाँच दिमाखात संपन्न.

Image
साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या "धर्मवीर - २" या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच सुप्रसिध्द ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन,ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.  या म्युझिक लाँच कार्यक्रमासोबतच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना 'आनंद माझा' या पुरस्काराने गौरवण्यात आले.  "धर्मवीर - २" या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे  उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून कॅमेरा मन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. "धर्मवीर" मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता "धर्मवीर - २