डिजिटल युगात आणखी एक पाऊल,अभिनेता 'अमेय वाघ'चे स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले.



मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ ओळखला जातो. काला पानी, असूर यांसारख्या हिंदी वेबसीरिज, दिल दोस्ती दुनियादारी सारखी लोकप्रिय मालिका आणि फास्टर फेणे, मुरांबा, धुरळा यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून अमेयने आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही अमेयचे अनेक प्रोजेक्ट्स लाईन अप आहेत. त्याबद्दल अमेय सोशल मिडियावर चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. आता अमेय त्याच्या चाहत्यांसाठी एक भन्नाट बातमी घेऊन आला आहे. 'ती' म्हणजे अमेयने डिजिटल युगात आणखी एक पाऊल टाकले आहे.

अमेयने चाहत्यांशी दिल से कनेक्ट होता यावे म्हणून स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले आहे. असे करणारा मराठी सिनेसृष्टीतील अमेय वाघ हा पहिलाच कलाकार ठरला आहे. त्यामुळे इथून पुढे चाहत्यांना अमेयचे आगामी प्रोजेक्ट्स आणि प्रदर्शनाच्या तारखा आता एका क्लिकवर समजणार आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अमेय झोन (AmeyZone) हे व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करु शकता. 

तेव्हा आजच व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करा आणि वाघ सेनेत सामील व्हा!

Link

https://whatsapp.com/channel/0029Vaf30XYLo4hlgb2g161x


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...