दानशूर महामानव भागोजी शेठ कीर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त उरण येथे जनजागृती सभा संपन्न.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर, सचिव श्री. प्रकाश कांबळी, खजिनदार सौ. शलाका पांजरी आणि सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अलका नाईक -मुंबई, यांनी उरण- बोरी गाव, ज्येष्ठालय, येथे भंडारी हितवर्धक समाज- उरण यांच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती कार्यक्रम केला, ज्यामध्ये महामानव भागोजीशेठ कीर यांच्याबद्दल सविस्तर माहिती आणि रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दादर-मुंबई. येथे होणाऱ्या रथयात्रेसाठी सर्वांना हार्दिक आमंत्रण दिले. उरण येथील भंडारी समाजाने या रथयात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे महासंघाच्या अध्यक्षांनी सर्वांना आवाहन केले.याप्रसंगी येथील स्थानिक भंडारी कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष- श्री. दिनेश हळदणकर, सचिव श्री. स्वप्नील मयेकर, उपाध्यक्षा सौ.रेश्मा मयेकर, श्री.मिलींद तळेकर आदींसह अनेक रसिक श्रोतेही उपस्थित होते. अध्यक्ष मा. श्री. हळदणकर यांचा सन्मान अ.भा.भं. महासंघाच्या वतीने डॉ. अलका नाईक यांनी केला. तसेच महासंघाच्या अध्यक्षांचे व मान्यवरांचे स्वागत सन्मान स्थानिक समितीने समस्त उरणवासियांच्या वतीने केले.
या कार्यक्रमासाठी उरण भंडारी हितवर्धक समाजातील डॉक्टर मेकर, संजू कांबळी, संतोष कांबळी, सुप्रिया पुसाळकर, सारजा कांबळी, सपना शिलदंणकर, कल्याणी हळदणकर, प्रिती शिलधनकर असे अनेक सदस्य उपस्थित होते त्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली. तसेच मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. रेशमा मयेकर यांनी पुढाकार घेऊन सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले, त्यामुळे रथयात्रेच्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात उत्तम चर्चा व सर्व प्रकारे विचारांची देवाणघेवाण झाली. श्री. मिलिंद तळेकर यांनी स्थानिक मंडळाच्या कार्याची माहिती दिली. महासंघाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी अत्यंत तळमळीने भागोजीशेठ कीर यांच्या महान कार्याचे विस्तृत वर्णन केले, सचिव श्री. प्रकाश कांबळे यांनी आपल्या प्रस्तावनेत महासंघाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. महासंघाच्या नवनिर्वाचित खजिनदार सौ.शलाकाताई पांजरी यांचे सर्वांनी हार्दिक अभिनंदन केले.कवयित्री व मानसतज्ञ डॉ. अलका नाईक यांनी सर्व श्रोत्यांना उद्बोधनपर मार्गदर्शन केले. महामानव भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचे वर्णन करणारी आपली स्वरचित कविता सादर केली, तसेच आपल्या विविध विषयावरच्या स्वरचित कविता सुरेल आवाजात गाऊन सादर करून सर्व रसिक वर्गाला मंत्रमुग्ध केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा