मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट,फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित ‘मैत्रेया’ची घोषणा...

‘मैत्री’ हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या आयुष्यातील काही चेहरे नकळत डोळ्यांसमोर येतात. काही नाती काळासोबत बदलतात, काही हरवतात, तर काही आयुष्यभर मनात घर करून राहातात. अशाच एका मैत्रीच्या प्रवासाची झलक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समोर आली आहे.
समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा उत्सुकता वाढवणाऱ्या पोस्टरद्वारे करण्यात आली आहे. ‘काकण’ या संवेदनशील चित्रपटानंतर लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे पुन्हा एकदा एका नव्या विषयासह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली आहे.
‘मैत्रेया’च्या पोस्टरवरून हा चित्रपट समर, आयुषी, स्काय आणि रुची या कलाकारांनी साकारलेल्या पात्रांच्या आयुष्याभोवती फिरणार असल्याची झलक पाहायला मिळते. पोस्टरमध्ये या चार कलाकारांची नावं समोर आली आहेत. या चौघांच्या नात्याची गोष्ट नेमकी काय असणार, याबाबत मात्र अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. याचा उलगडा लवकरच होणार असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
   लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणतात, “‘मैत्रेया’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील त्या मैत्रीची गोष्ट आहे, जी काळ बदलला तरी मनात कायम राहाते. या चित्रपटातून मैत्रीचे अनेक रंग, नात्यांची गुंतागुंत आणि आयुष्याची अनपेक्षित वळणं अनुभवायला मिळतील. ‘काकण’नंतर पुन्हा एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर आणताना खूप आनंद होत आहे. ‘मैत्रेया’चा हा प्रवास लवकरच प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.