सामाजिक वास्तवाचा आरसा ठरणारा 'द महाराष्ट्र फाईल्स' आता Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध.

समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची प्रभावी कहाणी मांडणारा 'द महाराष्ट्र फाईल्स'हा बहुचर्चित मराठी चित्रपट आता Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवल्यानंतर आता हा आशयप्रधान चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
केवळ मनोरंजन न करता सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा 'द महाराष्ट्र फाईल्स' हा चित्रपट शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि उपेक्षित समाजाच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडतो. विशेष म्हणजे, बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा हा भारतातील पहिलाच चित्रपट असल्याने या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या प्रभावी भूमिका पाहायला मिळतात. प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयातून चित्रपटाच्या आशयाला अधिक ताकद दिली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आणि निर्माते संजीव कुमार राठोड यांनी सामाजिक विषयाला संवेदनशीलतेने आणि वास्तवदर्शी शैलीत पडद्यावर साकारले आहे. क्रिएटिव्ह प्रोड्युसर शालिनी राठोड आणि आर्यन राठोड यांनीही चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज बुलंद करण्याचा आणि त्यांच्या न्यायाच्या लढ्याला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या संगीताची धुरा नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली असून, कथा, अभिनय, संगीत आणि सामाजिक आशय यांचा उत्कृष्ट संगम या चित्रपटात अनुभवायला मिळतो. त्यामुळे 'द महाराष्ट्र फाईल्स'हा केवळ एक चित्रपट नसून सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि प्रत्येक प्रेक्षकाला अंतर्मुख करणारा अनुभव ठरतो.
   चित्रपटगृहांमध्ये यशस्वी प्रदर्शनानंतर आता 'द महाराष्ट्र फाईल्स'Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला असून, ज्यांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी गमावली होती त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सामाजिक विषयांवर आधारित, आशयपूर्ण आणि विचारप्रवर्तक सिनेमांचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन चित्रपटाच्या संपूर्ण टीमतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.