पोस्ट्स

'तीन अडकून सीताराम' मध्ये अडकले वैभव, संकर्षण आलोक आणि प्राजक्ता ?

इमेज
हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे चित्रपटाचे नाव. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. दुनिया गेली तेल लावत अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे.    पहिल्या पोस्टरमध्ये दिसलेल्या बेड्या आता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे आणि आलोक राजवाडेच्या हातात असून ते गजाआड आहेत. त्यांच्या सोबत त्यांची साथीदार प्राजक्ता माळी दिसत आहेत. त्यामुळे आता हे कोणत्या कारणासाठी जेलमध्ये आहेत, आणि बाकीचे त्यांना का अशा नजरेने बघत आहेत तसेच चित्रपटाच्या नावाशी या सगळ्याचा नेमका काय स...

६ ऑक्टोबरला उलगडणार 'जर्नी'च्या असामान्य संघर्षाचा प्रवास.

इमेज
एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा 'जर्नी' चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित 'जर्नी' चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस आणि शुभम मोरे दिसत आहे. पोस्टरवरून हा एक भावनिक, कौटुंबिक चित्रपट दिसत आहे. सचिन जीवनराव दाभाडे दिग्दर्शित या चित्रपटात अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकर गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने यांच्यासह माही बुटाला आणि निखिल राठोड या बालकलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रवींद्र मठाधिकारी लिखित या चित्रपटाची कथा सचिन दाभाडे यांची आहे तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत.   पोस्टरमध्ये तिघांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेले हे चढउतार, संघर्ष काय आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होणार, या सगळ्याची 'जर्नी' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.         चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभ...

'सप्टेंबर’मध्ये होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा.

इमेज
गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले 'सिमर' आणि 'लिपस्टिक मर्डर' हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत. इन्स्पेक्टर राज एका सिरीयल किलरच्या केसचा तपास करत आहे. तो अधिक तपास करत असताना, एका मुलीच्या प्रेमात पडतो पण ज्या केसचा तो तपास करत आहे, त्या केसचा मुख्य आरोपी ती मुलगीच निघाली तर? 'लिपस्टिक मर्डर' ची कथा या प्रश्नात पाडते तर   हॉटेलमधल्या एका तरुण आचाऱ्याला त्याच्या कुटुंबासाठी मोठ्या रकमेची गरज असते. तेव्हा त्याचा मालक त्याला मोठी रक्कम मिळवण्याची एक संधी देतो. हॉटेलचे काम झाल्यानंतर एक विशिष्ट पेटी रोज एका विशिष्ट ठिकाणी पोहचवणे, परंतू त्यात एक अट आहे की, ती पेटी चुकूनही उघडायची नाही. पेटी आणि पेटीमधील अदृश्य गुपिताभोवती ‘सिमर’ची कथा फिरते.   ‘चित्रपट, वेब सिरीज, आणि अन्य कार्यक्रमांतून 'अल्ट्रा झकास’ हा ...

शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलें यांच्या नाटकांचा अमेरिका दौरा.

इमेज
    परदेशी स्थायिक असलेल्या मराठीजनांची आपल्या मराठी संस्कृतीशी असलेली नाळ अधिक घट्ट व्हावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभत असते. अशाच एका उपक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी पुढाकार घेतला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शैक्षणिक निधी उभारणीसाठी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांचा अमेरिका दौरा त्यांनी आयोजित केला आहे. ८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘नियम व अटी लागू’ चे  प्रयोग तर ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होतील. या दोन नाटकांचे २१ कलाकार ६ आठवड्यात २१ प्रयोग सादर करणार आहेत. या प्रयोगांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा बृहन्महाराष्ट्र मंडळ शैक्षणिक निधी उभारणीसाठी देण्यात येणार आहे. त्यातून २०२३ मध्ये १३-१८ वयोगटातील १०० मुलामुलींसाठी $३०,००० आणि २०२४ मध्ये ५०० मुलामुलींसाठी अंदाजे $१५०,००० असा $२ मिलीयनचा फंड उभारण्याचा बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप दीक्षित ह्यांचा मान...

‘बापल्योक’ ची टीम बाप्पाच्या दर्शनाला.

इमेज
मायेचा हात डोक्यावर ठेवणारा, कुटुंबाला आधार देणारा ‘बाप’ सोबत असला तरी ज्याच्या आशिर्वादाची आपल्याला सदैव गरज असते, तो म्हणजे आपला लाडका गणपती 'बाप्पा'. लवकरच गणपती 'बाप्पा'चं आगमन होणार आहे पण त्याआधी १ सप्टेंबरला रसिक दरबारात दाखल होणाऱ्या ‘बापल्योक’ चित्रपटाला गणपती बाप्पाचा कृपाआशिर्वाद मिळावा म्हणून चित्रपटाची संपूर्ण टीम पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाली होती. अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे, अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे याप्रसंगी उपस्थित होते. 'बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन मकरंद माने यांचे आहे.  कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे नेहमी दुर्लक्षितच राहतं. त्याच्या असण्याने घराला घरपण असतं. आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठीच दिवसभर खस्ता खात असतो. बापाची ‘माया’ आपल्या कवितेतून व्यक्त करताना 'बापल्योक’ चित्रपटातील अभिनेते शश...

'सुभेदार' पहिल्याच वीकेंडला ५ कोटींहून अधिकची विक्रमी कमाई..

इमेज
हिंदवी स्वराज्यातील सुवर्णपान उलगडत सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम सादर करणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील 'सुभेदार' रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही 'सुभेदार' चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरु आहे. पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने ५ करोडहून अधिकची विक्रमी कमाई केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही 'सुभेदार' चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला जातोय.     चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. 'आले मराठे' या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. मुखानं 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत प्रेक्षकांचे ...

'बापल्योक' १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला....

इमेज
     बाप म्हणजे धाक..  बाप म्हणजे कडक शिस्त..  बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे 'बापल्योक'.  नातं’ या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. माणसाच्या आयुष्यात कित्येकदा नात्याला वळण देणाऱ्या घटना घडतात, या घटनांमधून नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना, त्यावेळी नातं जास्त न ताणता हुडकायचा प्रयत्न करायचा. अशाने नात्याची प्रत्येक नाजूक गाठ विश्‍वासानं आणि प्रेमानं आपोआप पक्की होईल. हेच सांगू पाहणारा दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट १ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  ‘बापल्योक’ या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रो...