सुगी परिवारातर्फे प्रख्यात गायक श्री. राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांच्या साथीने सुरेल दिवाळी पहाटचे आयोजन; 12 नोव्हेंबर 2023 रोजी दादर येथील पार्क क्लबच्या मागे रंगणार मैफल.
मुंबई, 10 नोव्हेंबर, 2023: दिवाळी साजरी करण्यासाठी चमकदार वातावरण निर्मिती करत, मुंबईतील आघाडीचा रिअल इस्टेट विकासक समूह 'सुगी ग्रुप’ने, 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात नरकचतुर्दशीला मुंबईकरांसाठी संगीताच्या मेजवानीचे आयोजन केले आहे. परंपरेनुसार 'दिवाळी पहाट’ म्हणून ओळखला जाणारा हा सोहळा सकाळी सहा वाजता होणार आहे. सुगी परिवाराने ही संगीताची मैफल सर्व रसिकांसाठी तसेच संगीताच्या चाहत्यांसाठी खुली ठेवली असून, 5000हून अधिक संगीतप्रेमी दिवाळीच्या पहिल्या दिवशी या दिवाळी पहाट समारंभाला उपस्थिती लावतील असे अपेक्षित आहे. या अनोख्या ‘सांगितिक पहाट’चे आयोजन मोठ्या आनंदाने करणारे सुगी ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार श्री. निशांत देशमुख म्हणाले, “सुगी परिवाराच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा व वारसा उभारण्यासाठी तसेच जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, जेणेकरून, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध समाज घडवला जाईल. मुंबईतील, विशेषत: दादरमधील, सर्व वयोगटांतील नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही या सोहळ्याचे आयोजन केले आ...