सुगी परिवारातर्फे प्रख्यात गायक श्री. राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांच्या साथीने सुरेल दिवाळी पहाटचे आयोजन; 12 नोव्हेंबर 2023 रोजी दादर येथील पार्क क्लबच्या मागे रंगणार मैफल.




मुंबई, 10 नोव्हेंबर, 2023: दिवाळी साजरी करण्यासाठी चमकदार वातावरण निर्मिती करत, मुंबईतील आघाडीचा रिअल इस्टेट विकासक समूह 'सुगी ग्रुप’ने, 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात नरकचतुर्दशीला मुंबईकरांसाठी संगीताच्या मेजवानीचे आयोजन केले आहे. परंपरेनुसार 'दिवाळी पहाट’ म्हणून ओळखला जाणारा हा सोहळा सकाळी सहा वाजता होणार आहे. सुगी परिवाराने ही संगीताची मैफल सर्व रसिकांसाठी तसेच संगीताच्या चाहत्यांसाठी खुली ठेवली असून, 5000हून अधिक संगीतप्रेमी दिवाळीच्या पहिल्या दिवशी या दिवाळी पहाट समारंभाला उपस्थिती लावतील असे अपेक्षित आहे.

या अनोख्या ‘सांगितिक पहाट’चे आयोजन मोठ्या आनंदाने करणारे सुगी ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार श्री. निशांत देशमुख म्हणाले, “सुगी परिवाराच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा व वारसा उभारण्यासाठी तसेच जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, जेणेकरून, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध समाज घडवला जाईल. मुंबईतील, विशेषत: दादरमधील, सर्व वयोगटांतील नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही या सोहळ्याचे आयोजन केले आहे. आमच्या विस्तारित कुटुंबाने एकत्रितपणे दिवाळी साजरी करावी हा यामागील हेतू आहे. आपला संगीताचा समृद्ध वारसा व सांस्कृतिक अंगे पुढील पिढीला समजावून देण्यासाठी हे कार्यक्रम उपयुक्त असतात.”

दादर चौपाटीलगत छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळील द पार्क क्लबवर दिवाळीच्या पहाटे प्रसन्नतेने वाहणाऱ्या वाऱ्यासोबत श्रोते, प्रख्यात शास्त्रीय गायक श्री. राहुल देशपांडे ह्यांच्या गळ्यातून बाहेर पडणाऱ्या, संगीताच्या सुरेल रागांमध्ये व स्वरांमध्ये बुडून जातील. आपल्या मखमली आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी गायिका आर्या आंबेकरही त्यांच्या जादूई गाण्यांनी श्रोत्यांवर गारुड करतील. ह्या दोघांच्या गायनासोबतच मराठी रंगभूमीवरील अभिनेता तसेच 'संकर्षण व्हाया स्पृहा’ ह्या प्रसिद्ध काव्य समारंभासाठी ओळखला जाणारा लोकप्रिय कवी संकर्षण कऱ्हाडे ह्या दिवाळी पहाटेचे सूत्रसंचालन करणार आहे.

‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटातील ‘घेई छंद मकरंद’ या गीताच्या प्रस्तुतीकरणामुळे ओळखले जाणारे तसेच ‘मी वसंतराव’मधील कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे श्री. राहुल देशपांडे अनेक सुरेल भावगीते, भक्तिगीते आणि नाट्यगीते यांची मालिकाच श्रोत्यांपुढे उलगडणार आहेत. त्याचप्रमाणे 'द राहुल देशपांडे कलेक्टिव’मधील त्यांच्या आवडीची काही गाणीही सादर करणार आहेत. दिवाळीच्या सहा दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या नऊ संगीत मैफिलींपैकी ही एक मैफल दादर येथे होणार आहे.

या मैफलील उपस्थित राहण्यासाठी सुगी परिवार संगीतप्रेमींना मोफत प्रवेशिका देत आहे. या प्रवेशिका सुगीचे कार्यालय, शिवाजी मंदिर, शिवाजी पार्क जिमखाना व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे उपलब्ध होतील. अधिक तपशिलांसाठी कृपया आम्हाला पुढील क्रमांकावर कॉल करा: 9619198989. वेबसाइट: https://www.sugeegroup.com/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत व दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त"माझा बाबा"शॉटफिल्मला मिळाले ३मानाचे पुरस्कार.