पोस्ट्स

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांचा ‘खालिद का शिवाजी’....

इमेज
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील प्रतिष्ठित ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागासाठी  निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यातर्फे अधिकृत निवड झालेला हा चित्रपट नुकताच जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात झळकला आहे. मायकेल थेवर आणि सुषमा गणवीर निर्मित, राज प्रीतम मोरे दिग्दर्शित 'खालिद का शिवाजी' या चित्रपटात  क्रिश मोरे याने खालिदची भूमिका साकारली असून सोबत प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलाश वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. केलाश वाघमारे लिखित या चित्रपटाचे संवाद राजकुमार तंगडे यांनी लिहिले आहेत. तर विजय मिश्रा चित्रपटाचे डिओपी आहेत.   'खालिद का शिवाजी'ची निवड कान्स महोत्सवात झाली नसून इफ्फी इंडियन पॅनोरमा - एनडीएफसी फिल्म बाजार २०२४(गोवा), अजंठा - एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ - इंडिया फोकस स्पेशल स्क्रीनिंग, फ्रिप्रेसी इंडिया ग्रँड प्रिक्स अवॉर्ड २०२५ ...

सोशल मीडियावार AK आणि VK जोडीची धमाल.

इमेज
शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजीत रामदास पाध्ये यांनी भारताचा पहिला हेल्थकेअर मॅस्कॉट विचार कर अर्थात VK हा सह्याद्री हॉस्पिटल्ससाठी तयार केला आहे. हा पुणेरी कॅरॅक्टर त्याच्या खास मिश्कील आणि तडफदार शैलीतून लोकांचे मनोरंजन करतो.    या प्रवासात VK सोबत आहेत आपले लाडके अभिनेते अनिल कपूर अर्थात (AK)! “The AKVK Show” मधून AK आणि त्याचा हुशार व पुणेरी शैलीत बोलणारा मित्र VK विविध विषयांवर चर्चा करून प्रेक्षकांना माहिती देतात, तेही विनोद आणि सहज संवादातून! या खास सिरीजमध्ये सत्यजीत आणि त्यांची टीम — कौस्तुभ आणि कैलाश यांनी अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत ८ विशेष व्हिडिओंचे शूटिंग केले आहे. AK आणि VK यांच्यातील धमाल गप्पांची केमिस्ट्री बघायला प्रेक्षकांना आवडत असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. https://www.instagram.com/p/DJwIWb5tOcS/?igsh=cDM0NTJkY2k5N254

'कप बशी' या आगामी चित्रपटात दिसणार पूजा सावंत, ऋषी मनोहर ही फ्रेश जोडी.....

इमेज
      नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटांतून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे.    "कप बशी" या चित्रपटाची निर्मिती सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेच्या कल्पक सदानंद जोशी यांची असून निर्माता म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असला, तरी त्यांचं चित्रपटसृष्टीशी असलेलं नातं जुनंच आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या "पुत्रवती" या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केलं होतं. त्या चित्रपटानं राष्ट्रीय, राज्यस्तरीय १४ पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यात फिल्मफेअर, स्क्रीन, राज्य पुरस्काराचा समावेश होता. त्यामुळे वडिलांचं प्रेरणादायी काम आणि त्यांचा कलात्मक वारसा आता  ‘कप बशी’ या चित्रपटातून ते पुढे आणत आहेत.    वैभव चिंचाळकर हे टीव्ही मालिका, नाटक, मराठी चित्रपटातलं सुपरिचित नाव आहे. वैभव यां...

कान फेस्टिवलच्या मार्केट विभागात मराठी चित्रपटांची चर्चा 'महाराष्ट्र फिल्मसिटी स्टॉल'ला जगभरातील मान्यवरांची भेट....

इमेज
     मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय कान फिल्म फेस्टिव्हलचे बिगूल वाजले आहे. देशोदेशीचे चित्रपट, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत कान फिल्म फेस्टिव्हलचे वातावरण भारले आहे. जगभरातील चित्रपटकर्मींच्या गर्दीत दिमाखात उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या फिल्मसिटी स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  जगभरातील मान्यवरांनी दिली भेट मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी चार मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने कान महोत्सवामध्ये पाठवण्यात आले आहेत. 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन मराठी चित्रपटांबरोबर 'जुनं  फर्निचर' हा मराठी चित्रपटही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवण्यात आले आहेत. या चारही चित्रपटांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यांचे शिष्टमंडळ महोत्सवात सहभागी झाले असून मराठी चित्रपट आणि चित्रनगरीच्या प्रचार प्रसारा करता  आकर्षक स्टॉल तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधी - चित्रकर्मी या स्टॉलला भेट देत आहेत. महाराष्ट्र शासनाच...

'आमिर खान स्टारर ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल जाणून घ्या.

इमेज
    २००७ मध्ये आलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या ‘तारे जमीन पर’चा स्पिरिच्युअल सिक्वेल असलेला ‘सितारे जमीन पर’ या वर्षी सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक ठरतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. कारण ही एक अशी कथा आहे जी प्रेम, हसू आणि आनंदाने भरलेली एक सुंदर प्रवास  सादर करते. या खास प्रवासात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात १० नवोदित कलाकार पदार्पण करत आहेत, जे आपल्या सादरीकरणाने आधीच प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. 'सितारे जमीन पर' चे नवे तारे कोण? हो, आता वेळ आली आहे या नव्या झळकणाऱ्या ‘सितार्‍यां’शी भेटण्याची – गुड्डू, सुनील, शर्माजी, करीम, लोटस, बंटू, सतबीर, राजू, गोलू आणि हरगोविंद हे आहेत चित्रपटातील लहान तारे, जे आपल्या प्रशिक्षक गुलशन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेक्षकांना हसवतील, रडवतील आणि भावूक करतील.   सोशल मीडियावर या नव्या कलाकारांची ओळख करून देताना, निर्मात्यांनी लिहिले आहे ,  \[इंस्टाग्राम लिंक: [https://www.instagram.com/p/DJs3pRPzyk6/?img\_index=9\&igsh=N3FuaTJ...

‘मॅन ऑफ मासेस’ NTR आणि मास्टरस्टोरीटेलर प्रशांत नील यांच्या बहुचर्चित बिग बजेट प्रोजेक्टबद्दल,सोशल मीडियावर केली शेअर पोस्ट.

इमेज
जगभरात आपल्या अफाट लोकप्रियतेसाठी ओळखले जाणारे ‘मॅन ऑफ मासेस’ NTR  यांनी ‘KGF’, ‘सालार’ यांसारख्या सुपरहिट अ‍ॅक्शन ब्लॉकबस्टर्स देणारे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत एकत्र येऊन ज्या सिनेमावर काम सुरू केलं आहे – तो #NTRNeel प्रोजेक्ट याआधीच लॉन्च करण्यात आला होता आणि त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता देखील होती. या बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन थ्रिलरची शूटिंग वेगात सुरू आहे. NTR च्या वाढदिवसावर ‘वॉर 2’ चा स्फोटक अपडेट; #NTRNeel साठी वाट पाहा थोडीशी! २० मे रोजी NTR चा वाढदिवस असून, चाहत्यांनी या दिवशी #NTRNeel बाबत एक मोठा अपडेट मिळेल अशी आशा बाळगली होती. मात्र निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की, या दिवशी ‘वॉर 2’ चा बहुप्रतीक्षित अपडेट येणार असल्याने, त्यांनी #NTRNeel चे कंटेंट नंतरच्या शुभदिनी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.   त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे, "आम्हाला माहीत आहे की, तुम्ही या माणसाच्या वाढदिवसाची वाट किती आतुरतेने पाहत आहात… पण #WAR2 चं कंटेंट येत असल्यामुळे हा  क्षण त्यांनाच देणे योग्य ठरेल…आणि #NTRNeel चा MASS MISSILE GLIMPSE आपण...

‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे ९९’ ला शुभेच्छा.

इमेज
    उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली असून ही सुट्टी अधिक कुल करण्यासाठी धमाल-मस्तीने भरलेला ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मापुस्कर ब्रदर्सच्या या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ‘थ्री इडियट्स’च्या टीमने म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यासह महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून हा ट्रेलर शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेलरमध्ये  मैत्री, भावनांची गुंफण आणि नात्यांची गोडी अनुभवायला मिळत आहे.     एप्रिल -मे महिना म्हटला की अनेक जण कोकणांत गावाला जातात. आपल्या माणसांमध्ये, मित्रांमध्ये, शेजारच्या घरी, कुठेही, कसेही मनसोक्त वावरता आणि बागडता येते.  ना वेळेचे बंधन ना कुठे जायचे बंधन. मस्त हुंदडत अख्खे गाव पालथे घालायचे. याच जुन्या आठवणीं ताज्या करण्यासाठी 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट भेटीला येणार आहे. ‘एप्रिल मे ९९’ च्या ट्रेलरमध्ये कृष्णा, सिद्धेश आणि प्रसाद ही धमाल तिकडी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ध...