‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न.
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुप्रतिक्षित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या टीझर व शीर्षक गीताने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता प्रेक्षकांच्या याच उत्सुकतेत भर घालत या चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच एका अनोख्या पद्धतीने पार पडला. हा चित्रपट स्त्री सशक्तीकरणावर भाष्य करणारा असल्याने या सोहळ्याला उपस्थित सर्व महिला पत्रकार, चित्रपटाच्या तंत्रज्ञ टीममधील महिला यांच्याद्वारे चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. हा क्षण या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. तसेच यादिवशी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा वाढदिवस असल्याने संपूर्ण टीमने केक कापून तिचा वाढदिवसही साजरा केला. सासू सुनेचं नातं हे अनेक कुटुंबात तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना या प्रकारचं असतं.. तर काहींसाठी ‘ असून अडचण, नसून खोळंबा’ अशा स्वरूपाचं असतं. थोडक्यात, घरोघरी मातीच्या चुली अशी परिस्थिती असते. पण, याहीपलिकडे जाऊन त्यांच्यात एक असाही भावनिक बंध असतो जो या नात्याची वीण कधीच सैल होऊ देत...