बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना'.
गणरायाच्या भक्तीत तल्लीन करणारी आणि उत्सवी वातावरणाला सुरेल रंग देणारी ‘आली मोठी शहाणी’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘गणेश वंदना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बाप्पाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करणाऱ्या या गाण्यात भक्तिरसासोबतच उत्सवाचा आनंद आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं. चित्रपटाच्या टीझरमध्ये एका चिमुकलीची ‘मोठं व्हायचंय’ ही निरागस इच्छा आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तिने बाप्पाकडे घातलेलं साकडं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या गणेश वंदनेतूनही चित्रपटाच्या कथेशी जोडलेला बाप्पाचा धागा अधोरेखित होतो. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले अभय जोधपूरकर यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला भक्तिरसाची अनुभूती मिळते. पंकज पडघन यांच्या संगीत रचनेतून गाण्याचा उत्सवी बाज खुलतो, तर गुरु ठाकूर यांच्या शब्दांमधून बाप्पाप्रतीची श्रद्धा आणि भक्तिभाव प्रभावीपणे व्यक्त होतो. संगीत दिग्दर्शक पंकज पडघन म्हणतात, ‘’ ‘गणेश वंदना’ हे गाणं तयार करताना भक्तिभाव आणि उत्सवाचा आनंद यांचा सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न केला. बाप्पाशी जोडलेली श्रद्धा आणि ‘आली मोठी शहाणी’ च्या कथेतील भा...