जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेतून कलेचा जागर....विजेत्यांना लाखोंची पारितोषिके.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार तसेच सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले असून १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात येणार आहे. या स्पर्धेत ‘जागतिक सर्वोत्तम रील’ ठरणाऱ्या स्पर्धकाला १ लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेच...