Posts

Showing posts from May, 2023

'हॅशटॅग तदेव लग्नम'मध्ये झळकणार सुबोध भावे - तेजश्री प्रधान .

Image
शुभम फिल्म प्रॉडक्शन निर्मित, आनंद गोखले दिग्दर्शित 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नावावरूनच हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणारा दिसतोय. मात्र या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. शेखर मते निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद दिलीप गोखले यांचीच आहे. या चित्रपटासाठी मंदार चोळकर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीतलेखन केलं आहे तर पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, '' नुकतीच आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली असून सध्या चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. लग्नसंस्थेवर आधारित जरी हा चित्रपट असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. एका परिपक्व नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे. यापूर्वी असा विषय क्वचितच कोणी हाताळला असेल. हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक आणि सहकुटुंब बघावा, असा हा सिनेमा असून लवकरच हा चित्रपट

बहुप्रशंसित “खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर

Image
  मराठी   ओटीटी   प्लॅटफॉर्ममध्ये   आपल्या   वेगवेगळ्या   कन्टेंटने   चर्चेत   असलेल्या   अल्ट्रा   झक ा स   ओटीटी   प्लॅटफॅार्मर   बहुप्रशंसित   मल्याळम   भाषेतील   ‘ खो  खो ’   हा   चित्रपट   मराठी   भाषेत   प्रिमियरसा ठी   सज्ज   झाला   आहे .  ‘ खो  खो ’   हा   २०२१   चा   मल्याळम   भाषेतील   क्रिडा   विषय वर   आधारित   चित्रपट   आता   जगभरातील   प्रेक्षकांसाठी   मराठीमध्ये   उपलब्ध   होणार   आहे .  ‘ खो खो ’   या   चित्रपटाची   कथा   तिरुअनंतपुरममधील   माजी   अॅथलीट   मारिया   फ्रान्सिसभोवती   फिरत े ,  जिने   काही   विशिष्ट   परिस्थितींमुळे   राष्ट्रीय   खो - खो   संघात   जाण्याची   संधी   गमावली   होती .  तिच्या   कुटुंबाला   आर्थिक   संकटातून   बाहेर   काढण्यासाठी   ती   नंतर   मुलींच्या   शाळेत   पीटी   शिक्षिकेची   नोकरी   स्वीकारते .   ‘ खो  खो ’   हा   खेळ   एका   प्रतिभावान   खेळाडूच्या   अत्यंत   संबंधित   कथेची   पार्श्वभूमी   बनवते   आणि   तिच्या   इच्छेची   ठिणगी   हसतमुख   आणि   मजेदार   किशोरवयीन   मुल ां मध्ये   हस्तांतरित   करते .  मुलींसाठी   एक   प्रेर

'फकाट'च्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे -रसिका सुनीलची 'हॅट्रिक'

Image
सध्या 'फकाट' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीही सुयोग आणि रसिकाने चित्रपटात आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे आता 'फकाट'च्या निमित्ताने त्यांची हॅट्रिक होणार आहे. मुळात रसिका आणि सुयोगची पडद्यामागेही घनिष्ट मैत्री असल्याने पडद्यावरही त्यांची केमिस्ट्री तितकीच अफलातून वाटते. त्यांची हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना येत्या २ जून रोजी पाहायला मिळणार आहे.  आपल्या या मैत्रीबद्दल सुयोग गोऱ्हे म्हणतो, '' आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांसोबत यापूर्वीही काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन निर्माण झाला आहे. आम्ही खूप धमाल करतो. कधी एकमेकांना कामाबद्दल सल्लेही देतो. मुळात इतक्या वर्षांची मैत्री असल्याने आता आम्हाला एकमेकांचे स्वभाव माहित झाले आहेत. कोणत्या परिस्थितीत एकमेकांची रिऍक्शन कशी असेल, याचीही आम्हाला आता कल्पना असते. आम्ही भांडणेही तितकीच करतो.'' तर रसिका या मैत्रीबद्दल म्हणते, ''आमच्या सुरुवातीच्या काळात आम्ही

२०२२ मधील सर्वाधिक पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट "गोदावरी" जिओ सिनेमावर होणार रीलीज.

Image
देश-विदेशात तसचं मायदेशातही नावलौकिक मिळवलेला जिओ स्टुडिओज् चा चित्रपट ‘गोदावरी’ आता प्रेक्षक घर बसल्या बघू शकणार आहेत. जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली होती तेव्हापासूनच हा चित्रपट देशभरात चर्चेचा विषय बनला होता.  इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय - इंडिया ग्रँड प्रिक्स तसेच शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायजेशन अशा अनेक महोत्सवात 'गोदावरी'ने आपली मोहोर उमटवली आहे.  तसेच २०२२ मध्ये गोदावरी हा महाराष्ट्रात सर्वाधिक पुरस्कार पटकवणारा मराठी चित्रपट ही ठरला आहे. दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात की,   ‘राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर तसेच महाराष्ट्रतील प्रेक्षकांकडून मिळालेल्या उंदंड प्रतिसादानंतर आता 'गोदावरी'  हा सिनेमा जिओ सिनेमा वर प्रदर्शित होत आहे आणि त्याच निमित्ताने जगभरातील मराठी प्रेक्षकच नव्हे तर सगळेच सिनेप्रेमी हा चित्रपट पाहू शकतील याचा मला आनंद आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच

'आदिपुरुष' मधील प्रेम आणि भक्तीचा प्रवास अनुभवा, 'राम सिया राम' या गाण्यातून..

Image
.  जेव्हा तुम्ही आदिपुरुष चित्रपटातील दुसरे गाणे 'राम सिया राम' ऐकाल तेव्हा अशा जगात पाऊल टाकाल जिथे प्रेम आणि भक्ती हे , वेळ आणि जगाच्या पलीकडे जाते. 'आदिपुरुष' हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे . प्रभास आणि क्रिती सॅनॉन या जोडीवर चित्रित केलेल्या राघव आणि जानकीच्या मंत्रमुग्ध करणार्‍या कथेने आपण त्या कथेत गुंतलो जातो. टीम 'आदिपुरुष' ने आता या मनमोहक ट्रॅक 'राम सिया राम' ची संपूर्ण आवृत्ती प्रकाशित केली आहे, जी एक या सिनेमॅटिक मास्टरपीसच्या आहे . या गाण्यात दाखवलेला मधुर प्रवास राघव आणि जानकीच्या अगाध प्रेम आणि एकमेकांबद्दलची तळमळ सुंदरपणे कॅप्चर करतो. साचेत-परंपरा यांनी रचलेल्या संथ, मधुर नोट्स आणि मनोज मुनताशीर यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी गीतांसह, 'राम सिया राम' प्रभू श्री राम आणि सीता माँ यांच्यातील खोल नातेसंबंधाचे ज्वलंत चित्र रेखाटते. हे गाणे जसजसे उलगडत जाते तसतसे ते एकमेकांच्या जीवनातील त्यांच्या बंधाचे महत्त्व दर्शविते, खऱ्या प्रेमाची शाश्वत शक्ती आणि मानवी भावनांच्या कालातीत खोलीची आठवण करून देते.      मंत्रमुग्ध करणारे स

जिओ स्टुडिओजच्या कॉन ड्रामा "रफुचक्कर" मध्ये मनीष पॉल चे हटके लूक्स.

Image
 जिओ स्टुडिओज ची आगामी वेब सिरीज रफुचक्कर चा टीझर आणि पोस्टर आज झाला रीलीज.  ट्रेलरमधील मनीष पॉल वेगवेगळ्या लूक्स मध्ये दिसत आहे.  आपल्या पहिल्याच वेब सिरीजव्दारे ओटीटी स्पेसमध्ये पदार्पण करत अभिनेता मनीष पॉल एका ठगच्या मनोरंजक पात्रात दिसणार आहे.  ही वेब सिरीज 15 जून रोजी JioCinema वर रिलीज होईल आणि मनीष पॉल याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे.  त्याच्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्ससाठी आणि परफेक्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा, मनीष त्याच्या अभिनयाच्या पराक्रमाच्या सीमा ओलांडणाऱ्या भूमिकेत ऍक्शन ही करताना दिसून येणार आहे.  अप्रतिम अष्टपैलुत्व व्यक्तिमत्त्व असलेला हा ऍक्टर एका फिटनेस तज्ञापासून ते  जाड वृद्धापर्यंत, पंजाबी वेडिंग प्लॅनर पासून ते हँडसम हंक अशा मजेदार लुकने चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यास सज्ज आहे.   रफुचक्कर चे जग हे जलद, नाट्यमय आणि चपखल असुन प्रेक्षकांची आवड जपून आहे.  फेस-मॅपिंग, डीप फेक, डिजिटल फूटप्रिंट मॅपिंगपासून ते जुन्या तपास शैलीपर्यंतच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांमधून ही कथा  या वेब शोला मनोरंजक बनवते.   ज्योती देशपां

प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ‘गेमाडपंथी’चा ट्रेलर प्रदर्शित

Image
एक सॉलिड प्लॅन.. एक सरळ साधा मुलगा... आणि एक हनी ट्रॅप. संतोष कोल्हे दिग्दर्शित 'गेमाडपंथी'चे उत्सुकता वाढवणारे ट्रेलर प्रदर्शित झाले असून आता या हनी ट्रॅपमध्ये कोण कोण अडकणार, हे २ जूनपासून दर शुक्रवारी प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर कळणार आहे. प्लॅनेट मराठी ओरिजनल्सच्या यादीत आणखी एका वेबसीरिजचे नाव समाविष्ट झाले असून दि फिल्म क्लिक स्टुडिओजने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. यात चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे. प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  ट्रेलरमध्ये चिकूच्या किडनॅपिंगचा प्लॅन बनताना दिसत आहे. आता हा चिकू कोण? आणि त्याला का किडनॅप करत आहेत. याशिवाय हनीच्या लिपस्टिक लावण्यामागचं नेमकं रहस्य? या सगळ्याचीच आता लवकरच उत्तरं मिळतील. या सगळ्या गोंधळात भल्याभल्यांची वाट लागणार असून एकापेक्षा एक मोठे गेमही होणार आहेत. यात कोण कोणावर भारी होणार, हे 'गेमाडपंथी' पाहिल्यावरच कळेल. बोल्डनेसने भरलेली ही वेबसीरिज कॉमेडी, थ्रिलर आणि रहस्यमयही आहे.  दिग्दर्शक

कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट म्हणजेच "बटरफ्लाय"

Image
आपली स्वप्नं मरतात तेव्हा आपण मरतो, असा भन्नाट विचार बटरफ्लाय या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मांडण्यात आला आहे. संसारगाड्यात रमलेल्या होममेकरच्या स्वप्नांची गोष्ट उलगडणारा बटरफ्लाय हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होत आहे.  ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी 'बटरफ्लाय' चित्रपट प्रस्तुत केला आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी बटरफ्लाय या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम या चित्रपटाचे निर्माते आहेत. मधुरा वेलणकर साटम यांच्या संकल्पनेला विभावरी देशपांडे यांनी कथेत बांधले आहे. विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी पटकथा लेखन, तर कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे यांनी संवाद लेखन केले आहे.  वैभव जोशी, गुरू ठाकूर यांनी गीतलेखन, शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिग्दर्शन, वासुदेव राणे यांनी छायांकन केले आहे. वैशाली भैसने माडे आणि हंसिका अय्यर यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. या चित्रपटात मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, राधा धारणे, सोनिया परचुरे, प्रदीप वेलणकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे.  प्रत्

क्षिती जोग दिसणार रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये

Image
करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. 'मिट दि रंधवास' अशी ओळख करून देणाऱ्या या पोस्टरमध्ये रणवीर सिंग,धर्मेंद्र, जया बच्चन या मोठ्या चेहऱ्यासोबतच एक मराठी चेहरा झळकत आहे. हा चेहरा म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग. या चित्रपटात क्षिती एका महत्वपूर्ण आणि रंजक भूमिकेत दिसणार आहे.  इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल क्षिती म्हणते, '' अनेक वर्षं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठच नाही तर आताच्या काळात सुपरहिट असलेला रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्यासोबत काम करतानाही धमाल आली. धर्मा प्रॉडक्शन, करण जोहर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अफलातून होता. करण सर एक उत्तम दिग्दर्शक आहेत. समोरच्याकडून अपेक्षित सीन कसा करून घ्यायचा याचे कसब त्यांच्याकडे उत्तम आहे. एकंदरच ही प्रक्रिया खूप छान होती.”  येत्या २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'आदिपुरुष' चित्रपटातील दुसरे गाणे "राम सिया राम" अनेक प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज या तारखेला …

Image
        टीम आदिपुरुष पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे! आदिपुरुष टीम आपला बेंचमार्क उंचावत,  २९ मे २०२३ रोजी हिंदी, तेलगू, तमिळ , कन्नड आणि मल्याळम भाषेत असंख्य प्लॅटफॉर्मवर "राम सिया राम" हे चित्रपटातील दुसरे गाणे सर्व मीडिया सह भव्य लॉन्च करणार आहेत.          म्युझिकल जोडी सचेत-परंपरा यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केलेले आहे , त्याचबरोबर मनोज मुनताशीर यांनी हे गीत लिहिले आहे . असे हे अभूतपूर्व गाणे  सर्व सीमारेषा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांना मोहित करेल. चित्रपट चॅनेल, संगीत चॅनेल ते सामान्य मनोरंजन चॅनेल (GECs), संपूर्ण भारतात  70+ पेक्षा जास्त  भारतभर पसरलेले रेडिओ स्टेशन,  राष्ट्रीय वृत्त चॅनेल, मैदानी होर्डिंग, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, तिकीट भागीदार, चित्रपट थिएटर, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, २९ मे रोजी दुपारी १२ वाजता गाणे प्रदर्शित केले जाणार आहे.            ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट टी-सिरीजचे  भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, आणि त्याचबरोबर ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्स मधील राजेश न

प्रेमाची 'अंब्रेला', येतेय तुमच्या भेटीला; बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

Image
खरंतर प्रेमकथा ही काही मराठी प्रेक्षकांसाठी नवीन बाब राहिलेली नाही. गेल्या ५० दशकांत मराठी चित्रपटसृ्ष्टीत असंख्य प्रेमकथा पडद्यावर अवतरताना मराठी प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. आधी प्रेम, नंतर अॅक्शन आणि शेवटी दोघांचा सुखेनैव संसार अशा धाटणीचे अनेक सिनेमे मराठी चित्रपट रसिकांसाठी आता तोंडपाठच झाले असावेत! त्यामुळे आताशा प्रेक्षक नेहमीच नव्या धाटणीच्या चित्रपटाच्या किंवा थेट मनाचा ठाव घेणाऱ्या सादरीकरणाच्या शोधात असतात! प्रेक्षकांची हीच गरज पूर्ण करण्यासाठी येत्या ९ जून रोजी निर्माते मनोज विशे घेउन येतायत नव्या रंगांनी सजलेली प्रेमाची 'अंब्रेला'! स्वत: मनोज विशेंनीच पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचा नावाइतकाच दिलखेचक ट्रेलर नुकताच लाँच झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार यात शंकाच नाही! कारण चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेला कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून हाताळण्याची वेगळी शैली दिसणार आहे. हा चित्रपट त्याच्या ट्रेलरप्रमाणेच प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलाय तो त्याच्

शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत स्टोरिटेलच्या ऑडिओ बुक्समध्ये!

Image
युवा पिढीतील लोकप्रिय गीतकार-कवी संदीप खरे सर्वपरिचित आहेत. सोपी पण अर्थवाही, तसेच आजच्या पिढीच्या थेट परिचयाची भाषा आणि अभिव्यक्ती हे संदीप खरे यांच्या गीतांचे वैशिष्ट्य आहे. ‘चकवा’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘हाय काय नाय काय’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘‘मोरया’ असे २५ चित्रपट. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्यासोबत ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ असे लोकप्रिय सादर करणारे संदीप खरे आता स्टोरिटेलवर उन्हाळी सुट्टीनिमित्त अनोखा खजिना घेऊन येत आहेत. 'शेरलॉक होम्स'च्या गाजलेल्या रहस्यकथा आता स्टोरीटेलवर त्यांच्या आवाजात ऐकता येणार आहेत. दीर्घकाळ जगभरातील वाचकांना भुरळ घालणाऱ्या या अजरामर कथा मराठीत ऑडिओबुकच्या स्वरूपात आणताना आलेल्या अनुभवांबद्दल संदीप खरे यांच्याशी साधलेला संवाद... प्रश्न :लहान मुलांसह सर्वक्षेत्रातील व्यक्तींसाठी तुम्ही खूप काम केलंय, लिहिलंय, कविता गाणी सगळं केलं आहे, या सगळ्यामध्ये शेरलॉक होम्सचं वाचन, हा प्रवास नेमका कसा सुरु झालं? संदीप खरे : शेरलॉक होम्स हे इतकं अद्धभुत व्यक्तिमत्व आहे, त्याने माझ्या आयुष्यात खूप लहानप

आईच्या मातृत्वाची कथा सांगणारा ‘जननी’ चित्रपटाचा २९ मे रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’..

Image
‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच लॉन्च केलेल्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने दर आठवड्याला नवीन कॉन्टेन्ट प्रेक्षकांच्या भेटीला आणत ‘जननी’ हा बहुचर्चित चित्रपट २९ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील आठवड्यात मातृदिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित झाले होते. जननी या चित्रपटाची कथा विचारप्रवर्तक आणि भावनिकरित्या मातृत्वाच्या नातेसंबंध, कौटुंबिक बंध आणि वैयक्तिक वाढ यांच्या गुंतागुंतीचे वर्णन करून मांडण्यात आली आहे. आईच्या आपल्या मुलांवरील प्रेमाचा आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या ‘जननी’ या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, मोहनीश बहल, आयेशा झुल्का, अमन वर्मा, विनीत रैना आणि सोनिका हंडा या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाच दिग्दर्शन चंदर एच. बहल यांनी केलं आहे, तर अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता हाच चित्रपट संपूर्णपणे मराठी भाषेत प्रेक्षकांना अल्ट्रा झकास या मराठमोळ्या ओटीटीवर पाहता येणार आहे.       ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’

कान्स 2023: सनी लिओनीचा ब्लश गुलाबी स्लिट गाऊन मधला ग्लॅमरस अंदाज !

Image
बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री सनी लिओन हिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये तिच्या 'केनेडी' चित्रपटाच्या मध्यरात्रीच्या स्क्रिनिंगच्या वेळी तिच्या ग्लॅमरस लूक ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आदरणीय अनुराग कश्यप द्वारे दिग्दर्शित, 'केनेडी' सन्माननीय ज्युरीं नी निवडलेला एकमेव चित्रपट आहे.          प्रतिष्ठित प्रीमियर रात्रीसाठी, सनी लिओनीने प्रतिभावान नाजा सादेने डिझाइन केलेला एक उत्कृष्ट ब्लूश गुलाबी वन-शोल्डर गाउन निवडला. कॉलरबोनवर नाजूक ब्रोचने सुशोभित केलेला गाऊन ने सनीचा ग्लॅमरस अंदाज दाखवला. सनीच्या रेड कार्पेट लूक ने प्रेक्षकांची मन जिंकली. तिच्या लूकमध्ये ग्लॅमर तर आहेच  सनी लिओनीने स्वतःला हेलेना जॉयच्या उत्कृष्ट दागिन्यांनी अनोखा साज केला होता. हेलेना जॉयने डिझाइन केलेले सुंदर दागिने सनीवर उठून दिसत होते. बॉडी-हगिंग सॅटिन ग्रीन ड्रेस आणि अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंट मल्टी-कट ड्रेसमध्ये तिने सगळ्यांची मन जिंकली  कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनी ने फॅशन गेम सेट केला ! नाजा सादे आणि हेलेना जॉय सोबतचे तिचं फॅशन  सहकार्य तिच्या स्टाईल आयकॉन म्हणून तिची वेगळी

अभिनेता अमित साध यांनी त्यांच्या आगामी 'मेन' चित्रपटा मधील झलक केली शेअर !

Image
पहिले शेड्यूल पूर्ण केल्यानंतर गेल्या वर्षी अभिनेता अमित साधने नुकतेच यूवी फिल्म्सच्या " मेन " चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईत सुरू केले आहे. आउटडोअर शूटच्या दरम्यान ची एक खास झलक त्याने शेयर केली आहे.      गेल्या महिन्यात सुट्टी घेऊन स्वतः ला मस्त रिचार्ज करत हा अभिनेता पुन्हा एका पोलिसाच्या पात्रात परत येण्यासाठी उत्सुक झालेला दिसत होता. मुंबईत तापमान वाढत असताना या अभिनेत्याचा मेनच्या स्टिलमध्ये सुपर हॉट दिसतोय. मेन हे एक कॉप ड्रामा आहे, जो सामर्थ्यशाली संदेशासह सामाजिक संदेश देणार आहे. ज्यामुळे अभिनेत्याने लगेचच या प्रोजेक्ट ला हो म्हटलं आहे. अमित मेन मध्ये ईशा देओल तख्तानी, सीमा बिस्वास, तिग्मांशु धुलिया आणि मिलिंद गुणाजी सारख्या काही प्रतिभावान कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी केले आहे.     'ब्रीद' मधील बौद्धिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याच्या आणि त्याच्या 'घुसपैथ' या लघुपटातील फोटो पत्रकाराच्या भूमिकेने सर्वांना थक्क करून सोडलेले, चाहते अमितला 'मेन'मध्ये प

"ढ लेकाचा" चित्रपटातील आयुष उलागड्डेला अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोकृष्ट बालकलाकार पुरस्कार जाहीर.

Image
  नुकताच पार पडलेल्या अंबर भरारी ,  डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित  8  व्या अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल महोत्सवात अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट निर्मित  “ ढ लेकाचा ”     या चित्रपटातील आयुष उलागड्डेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे. हृदयस्पर्शी अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडण्यासाठी लवकरच हा चित्रपट  “ अल्ट्रा झकास ”   मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.        "ढ लेकाचा" या चित्रपटाची कथा भाल्या या तरुण मुलाभोवती फिरते ,   भाल्याच्या शाळेत शिकत असणा-या विक्की देशमुख या  विद्यार्थ्याला  असलेल्या पैशाच्या माजामुळे  गुंडगिरीचा सामना करत   तसेच शाळेतील शिक्षणप्रणाली च्या अडचणींना तोंड देत शालेय  जीवनात  संघर्ष करावा लागतो.   भाल्याचं त्याचे वडील आणि पाळीव बकरी बादशाहसोबत एक भावनिक  नातं तयार होताना दिसत आहे. आपल्या मुलाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना भाल्या आणि त्याचे वडील सदा लोहार यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रिकरण करण्यात आले आहे.   “ ढ लेकाचा ”  चित्र

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला 'रावरंभा' चित्रपटाचा विशेष शो...

Image
ढोल ताशांचा गजर आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘रावरंभा’  चित्रपटाचा विशेष खेळ   मुंबईतील चित्रा सिनेमागृहात दिमाखात संपन्न झाला. दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित, अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या चित्रपटाची मनोरंजन विश्वात बरीच चर्चा सुरू आहे. सिनेनाटय सृष्टीतील कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या विशेष शोला आवर्जून उपस्थित होती. सर्व कलाकारांच्या व तंत्रज्ञाच्या सहकार्यामुळे उत्तम चित्रपट करता आल्याची भावना निर्माता शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली तर सुंदर कलाकृतीचा भाग होता आल्याचा आनंद कलाकारांनी बोलून दाखविला. येत्या शुक्रवारी  २६ मे ला 'रावरंभा' चित्रपटगृहात दाखल होत आहे.    आजवर आपण  छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा वाचल्या, पाहिल्या पण त्यांच्या शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या शिलेदारांचा इतिहास उलगडून दाखवत, एका मोरपंखी प्रेमकहाणीची किनार असलेला ‘रावरंभा’ चित्रपट मनाला स्पर्शून जात असल्याची भावना उपस्थित मान्यव

वैशाली भैसने माडे म्हणते "कोरी कोरी झिंग हाय गं...."

Image
आपल्या प्रत्येकाचं एक दैनंदिन आयुष्य हे ठरलेलं असत आणि आपण तसंच ते जगत असतो. पण एक दिवस मेघाच्या आयुष्यात एक अशी रंजक गोष्ट घडते  ज्यामुळे तिचं दैनंदिन आयुष्य बदलून जाते. तिला  सापडलेल्या एका नवीन वाटेला आणि स्वतःला ती  अधिक प्राधान्य देते. आयुष्याला लखलख लाइटिंग झाल्यामुळे, कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट म्हणजेच "बटरफ्लाय" एका छोट्याश्या ठिणगीने आयुष्याला लखलख लाइटिंग कसं होत ह्याची गोष्ट सांगणारा "बटरफ्लाय" हा चित्रपट येत्या २ जूनला प्रदर्शित होणार असून नुकतेच ह्या चित्रपटातील "कोरी कोरी झिंग हाय गं" असे रंजक शब्द असलेले गीत सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.चित्रपटाच्या पोस्टरपासूनच  चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढली आहे.   वैभव जोशी ह्यांनी लिहिलेल्या या गाण्याला शुभाजित मुखर्जी यांनी संगीतबद्ध केले असून सुप्रसिध्द गायिका वैशाली भैसने माडे हिच्या सुमधुर आवाजात हे गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.  ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी 'बटरफ्लाय' चित्रपट प्रस्तुत केला आहे. असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज या

'आदिपुरुष' च्या टीमने पूर्ण गाणं आणलं प्रेक्षकांच्या भेटीला...

Image
आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' या गाण्याने केवळ भारतीयांना नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावले आहे! हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड यासह अनेक भाषांमध्ये टीझर रिलीज झाल्यानंतर, प्रेक्षक आतुरतेने पूर्ण गाण्याची आतुरतेने वाट पाहू  लागले . अजय-अतुल या जगप्रसिद्ध मराठमोळ्या जोडीने संगीतबद्ध केलेले आणि मनोज मुनताशीर यांच्या दमदार गीतांचे वैशिष्ट्य असलेले, हे विलक्षण गाणे प्रभू श्रीराम यांच्या सामर्थ्याला आदरांजली अर्पण करते. ग्रीपिंग व्हिज्युअल्स आणि अजय-अतुल या संगीतकार जोडीने ३०पेक्षा अधिक गायक गायकांच्या सोबतीने हे गाणे सादर केले.  नाशिक ढोलांपासून ते ‘जय श्री राम’च्या गजरापर्यंत, अशा प्रकारचा हा एक मोहक आणि आगळावेगळा अनुभव होता. एका तल्लीन करणाऱ्या अनुभवाद्वारे हे गाणे भव्य पद्धतीने लाँच करण्यात आले. मराठमोळ्या ओम राऊतने दिग्दर्शित केलेला आणि भूषण कुमार निर्मित, आदिपुरुष हा एक सिनेमॅटिक अनुभवाचा उत्कृष्ट नमुना आहे जो प्रभास, सैफ अली खान, क्रिती सॅनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्यासह अनेक उत्कृष्ट कलाकारांना एकत्र आणतो. मंत्रमुग्ध करणारी चाल, चित्तथरारक व्ह

यु.आर.एल फाउंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा २९ मे ला रंगणार....

Image
सामाजिक भान जपत अनेक मान्यवरांनी आजवर आपली समाजाप्रती बांधिलकी जपली आणि जोपासली.  समाजातील अशा मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या कार्याप्रती ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्यासाठी यु.आर.एल फाउंडेशन तर्फे दरवर्षी २९ मे ला ‘कृतज्ञता दिवस’ साजरा करण्यात येतो.  यु.आर.एल फाउंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान यादिवशी करण्यात येतो.  यंदाचा २०२३ चा सामाजिक गौरव पुरस्कार सोहळा सोमवार २९ मे ला शिवाजी मंदिर नाट्यगृहात सायं. ६.०० वा. रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने उपस्थित राहणार आहेत.   डॉ. श्री शैलेश श्रीखंडे (प्रसिद्ध कर्करोग तज्ञ),  डॉ. प्रीतम सामंत (प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ), डॉ. अमोल भिंगार्डे (जनरल फिजिशियन) आणि अभिनेते सयाजी शिंदे (कलाकार  आणि वृक्षप्रेमी) आदि मान्यवरांना याप्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये १ लाख आणि सन्मानचिन्ह असं  या पुरस्काराचं स्वरूप आहे.  यासोबत अ.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र  अंधश्रद

रहस्याचा शोध घेणारा ‘अदृश्य’ चित्रपटाचा 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’.

Image
'हत्या की आत्महत्या' याच रहस्य उलगडणारा कबीर लाल दिग्दर्शित ’अदृश्य' हा नवा चित्रपट 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे संपन्न झाली. “अदृश्य” हा चित्रपट प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या दोन जुळ्या बहिणी सायली आणि सानिका भोवती फिरतो. सायलीची जुळी बहिण असणारी सानिका बहिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असते, पण सानिकाला ब-याच विकृत वास्तवाचा सामना करावा लागतो. सायलीचा मृत्यू ही, ‘हत्या की आत्महत्या’ हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य ‘व्यक्ती’ की अदृश्य ‘उत्तर’ हा प्रश्न एका रोमांचक वळणावर घेऊन जातो.  मला नेहमीच सर्व भाषांमध्ये चित्रपट करायचे होते आणि अदृश्यच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो, असे चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल यांनी सांगितले. सहकलाकार, उत्तम ठिकाण आणि उत्तम दिग्दर्शकाने बनलेला हा चित्रपट सुंदर झाला आहे, असे अभिनेत्र

... आणि सुयोगने मला किस केलं - रसिका सुनील.

Image
पडद्यावर किसिंग सीन देणे, ही आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. कलाकारही सिनेमाचा भाग म्हणून असे सीन करण्यास तयार होतात. परंतु 'हे' असं करण्यासाठी सगळेच कलाकार कम्फर्टटेबल असतात, असे नाही. असाच एक किस्सा 'फकाट'च्या चित्रीकरणादरम्यान सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलसोबत घडला. चित्रपटात सुयोगला रसिकाला किस करायचे होते. मात्र असा सिन करण्याकरता तो खूप अनकम्फर्टटेबल झाला होता. हा सीन करणे सुयोगला खूपच अवघड जात होते, कारण यापूर्वी त्याने किसिंग सीन कधीच केला नव्हता. मात्र या सगळ्यात त्याला त्याचीच सहकलाकार रसिका सुनीलने साथ दिली आणि अखेर तो सीन चित्रित झाला. हा सीन कसा चित्रित झाला याचा किस्सा रसिकानेच आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. येत्या २ जूनला रसिका आणि सुयोगमधील हा रोमान्स पडद्यावर पाहायला मिळेल.   या सीनबद्दल रसिका सुनील म्हणते, '' असा सीन करायचा आहे हे जेव्हा सुयोगला कळले, तेव्हा तो खूप घाबरला कारण आधी त्याने असा सीन कधीच दिला नव्हता. मी हा सीन कारण्यासाठी कम्फर्टटेबल होते. मला काहीच अडचण नव्हती. पण सुयोगला हे जरा विचित्र वाटत होतं. त्याला मी सांगि

प्रथमेश परबच्या नव्या चित्रपटाचा मुहुर्त संपन्न...

Image
मराठीचा प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब लवकरच आपल्या चाहत्यांसाठी एक नवा कोरा सिनेमा घेऊन येत आहे.  १४ मे रोजी म्हणजेच मदर्स डे च्या दिवशी प्रथमेश ने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. मातृदिनाच्या मुहूर्तावर त्याच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रथमेशला आतापर्यंत आपण रॉम कॉम आणि युवा पिढीवर आधारित चित्रपटात काम करताना पाहिले आहे. मात्र हा चित्रपट त्याने यापूर्वी साकारलेल्या सर्व भूमिकांना छेद देणारा असणार आहे.    तूर्तास, या चित्रपटाबद्दल अधिक माहिती हातात आली नसली तरी प्रथमेश ने टाकलेली पोस्ट सर्व काही बोलून जाते.प्रथमेश लिहिले की, "एक नवीन सुरुवात. खूप सुंदर विषय, आणि मातृदिन सोबत या सिनेमाचे खूप गोड नातं आहे." प्रथमेश ने दिलेल्या या कॅप्शन मुळे हा चित्रपट एका वेगळ्याच धाटणीचा असणार आहे, यात वाद नाही. शिवाय प्रथमेश देखील एका वेगळ्या रूपात या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.    मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या य

रहस्याचा शोध घेणारा ‘अदृश्य’ चित्रपटाचा 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘वर्ल्डडिजिटल प्रीमियर’

Image
' हत्या की आत्महत्या '  याच रहस्य उलगडणारा कबीरलाल दिग्दर्शित  ’ अदृश्य '  हा नवा चित्रपट  ' अल्ट्रा झकास ’  मराठी   ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.   मंजरी फडणीस ,  पुष्कर जोग ,  सौरभ गोखले ,  उषा नाडकर्णी ,  अनंत जोग आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे संपन्न झाली.   “ अदृश्य ”  हा चित्रपट प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या दोन जुळ्या बहिणी सायली आणि सानिका भोवती फिरतो. सायलीची जुळी बहिण असणारी सानिका बहिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असते ,  पण सानिकाला ब-याच विकृत वास्तवाचा सामना करावा लागतो. सायलीचा मृत्यू ही , ‘ हत्या की आत्महत्या ’  हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य  ‘ व्यक्ती ’  की अदृश्य  ‘ उत्तर ’  हा प्रश्न एका रोमांचक वळणावर घेऊन जातो. मला नेहमीच सर्व भाषांमध्ये चित्रपट करायचे होते आणि अदृश्यच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली ,  याचा मला अभिमान वाटतो ,  असे चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल यांनी सांगितले .       सहकलाकार ,  उत्तम ठिकाण आणि उत्तम दिग्दर

प्लॅनेट मराठीच्या नव्या वेबसीरिजचे टिझर प्रदर्शित....

Image
हेमाडपंथी... दगड एकमेकांत गुंफून केलेल्या बांधकामाची एक स्तुत्य शैली. आपण सर्वांनीच या शैलीचा इतिहासात अभ्यास केलेला आहे. हेमाडपंथीशीच साधर्म्य साधणारा शब्द म्हणजे 'गेमाडपंथी'. 'गेमाडपंथी'... नाव ऐकूनच थोडं आश्चर्य वाटलं ना? ही कोणती नवीन शैली? तर दगड एकमेकांच्या डोक्यात घालून केलेल्या गेमची एक शैली. ही शैली नेमकी काय आहे, तर याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे, प्लॅनेट मराठी ओटीटीवर. नुकतेच 'गेमाडपंथी' या वेबसीरिजचे जबरदस्त बोल्ड टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. अ प्लॅनेट मराठी ओरिजनल, दि फिल्म क्लिक स्टुडिओज प्रस्तुत, संतोष कोल्हे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग अशी तगडी स्टारकास्ट आहे.   टिझरमध्ये सुरुवातीलाच पूजा कातुर्डे मादक अंदाजात दिसत असून प्रणव रावराणेला ती तिच्या प्रेमाच्या जाळयात ओढत आहे. तर दुसरीकडे कोणाला तरी किडनॅप करण्याचा प्लॅन शिजत असल्याचे कळतेय. आता हे किडनॅपिंग कोणाचे आणि कशासाठी आहे, हे 'गेमाडपं

आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांच्या आवाजातलं "रूप सजलया.....

Image
पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या "गेट टुगेदर" या चित्रपटातलं रूप सजलया हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. आर्या आंबेकर, अजय रणपिसे यांनी हे गाणं गायलं असून,  हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. सतनाम फिल्म्स प्रस्तुत "गेट टुगेदर" या चित्रपटाची निर्मिती  समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे,साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. या गाण्यांना आणि नुकत्याच लाँच केलेल्या ट्रेलरला सोशल मीडियातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव "गेट टुगेदर'" हा चित्रपट नव्याने करून देतो. रोमान्स, भावभावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. शाळा,

'मी वसंतराव'ने होणार मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरूवात, 21 तारखेला जिओ सिनेमांवर होणार डिजिटल वर्ल्ड प्रीमियर

Image
जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच भारतीय सिनेमागृहात प्रदर्शित होताच देशभरातून समीक्षकांची दाद मिळालेल्या ह्या सिनेमाला प्रेक्षकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नव्हे तर प्रेक्षक OTT वर हा सिनेमा कधी बघायला मिळेल याची आतुरतेने वाट पाहत होते, आणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे कारण जिओ सिनेमावर २१मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ह्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ही उत्सुकता निर्माण केली होती. ९५ व्या ऑस्करसाठी जगभरातील ३०१ चित्रपटांची रिमांइंडर लिस्ट जाहीर केली होती यांमध्ये ‘मी वसंतराव’ चा समावेश होता.     जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट मी वसंतराव पासून जिओ सिनेमावर मराठी चित्रपटांच्या डिजिटल वर्ल्ड प्रीमियरची सुरवात होणार आहे. पुढे ही जिओ स्टुडिओजचे आगामी प्रोजेक्ट्स ज्यात नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे चित्रपट, नव्या धाटणीचे वेब शोज, आणि मनाला भिडणाऱ्या अप्रतिम कथा यांचा समावेश असणार आहे. राहूल देशपांडे

१९ मेपासून 'कानभट' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर

Image
प्लॅनेट मराठीचा 'कानभट' चित्रपट येत्या १९ मे रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. रश प्रॉडक्शन प्रा. लि. निर्मित या चित्रपटाच्या निर्माती अपर्णा एस होशिंग असून त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. मुळात भारतीय संस्कृतीत जे वेद, पुराण आहेत. ते सगळ्याच शास्त्रांना सामावून घेणारे आहे. खूप वर्षांपासून शास्त्राविषयी लिखाण करणयात आलेले असून ते आता विज्ञानाच्या दृष्टीकोनातून मांडण्यात आले आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न ‘कानभट’मधून करण्यात आला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल झळकले असून यात एक विद्यार्थी आणि त्याच्या बाजूला त्याचे दोन गुरु दिसत आहेत. वेदविद्या शिकतानाचा लहान मुलाचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. 'कानभट'ची कथा आणि पटकथा अपर्णा एस होशिंग आणि विवेक बोऱ्हाडे यांची असून 'कानभट'मध्ये भव्या शिंदे, ऋग्वेद मुळे, संजीव तांडेल, विपीन बोराटे, मनीषा जोशी, अनिल छत्रे आणि विजय विठ्ठल वीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " प्रत्येकाच्या आयुष्यात योग्य दिशा देणारा गुरु असणे खूप ग

राज्य नाट्यस्पर्धेत 'सफरचंद'ची बाजी.

Image
मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन रंगभूमीवर दाखल झालेली ‘सफरचंद’ ही नाट्य कलाकृती सध्या चांगलीच गाजतेय. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या सिद्धहस्त दिग्दर्शकानं बसवलेल्या या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सफरचंद’ या नाटकाने प्रथम पारितोषिकासह बाजी मारली आहे.  सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे या पारितोषिकाची घोषणा केली आहे. या नाटकाला रुपये सात लाख पन्नास हजाराचा पुरस्कार मिळणार आहे. आतापर्यंत एकूण २१ पारितोषिक पटकवणाऱ्या सरगम आणि अमरदीप संस्थेच्या 'सफरचंद' या नाटकाने झी नाट्य गौरव, मटा सन्मान, माझा पुरस्कार, सांस्कृतिक कलादर्पण, महाराष्ट्र शासन अशा विविध व्यासपीठावर जोरदार बाजी मारली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील यश आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंददायी असल्याची भावना निर्माता,दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.   ‘सरगम’ आणि ‘अमरदीप’ निर्मित, ‘कल्पकला’ प्रका

मन की बात गौरवगीताचा ‘मराठी सूर'.

Image
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाच्या अभिनव आणि कलात्मक पद्धतीने सादर होणाऱ्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाने गेल्या काही वर्षांत लोकप्रियतेचे नवे उच्चांक निर्माण केले असून यातून पंतप्रधान आणि सामान्य जनता यांच्यात विलक्षण नाते तयार झाले आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०१ वा भाग २८ मे ला प्रसारित होणार आहे.  त्या पार्श्वभूमीवर १०० भागांचा गौरव आणि १०१ व्या भागाचे स्वागत करणारे  ‘मन की बात गौरवगीत’ समोर आले आहे.  जनतेच्या भावनेचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या या कार्यक्रमाच्या गौरवगीताचा सूर सध्या सर्वत्र घुमतो आहे. सौ भागो की सुंदर माला भारत माँ के चरणों मे  एक सौ एक वी मन की बात का स्वागत है हर घर घर मे .... मन की बात ये जन की बात ये देश की बात है .... ये बात है सूनहरी राष्ट्रहित से भरी भरी ... असे बोल असणारे गीत प्रत्येकाच्या मनाला भिडेल असा विश्वास या गीताचे गीतकार-संगीतकार संजय गीते यांनी व्यक्त केला. अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना समोर आणणाऱ्या कार्यक्रमाच्या गौरवगीतातून समाजातील ‘रिअल हिरो ना मानाचा मुजरा करण्यात आला आहे. पतंप्रधान मोदींचा आठ वर्ष सुरू असलेला रे