'आदिपुरुष' चित्रपटातील दुसरे गाणे "राम सिया राम" अनेक प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज या तारखेला …
टीम आदिपुरुष पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे! आदिपुरुष टीम आपला बेंचमार्क उंचावत, २९ मे २०२३ रोजी हिंदी, तेलगू, तमिळ , कन्नड आणि मल्याळम भाषेत असंख्य प्लॅटफॉर्मवर "राम सिया राम" हे चित्रपटातील दुसरे गाणे सर्व मीडिया सह भव्य लॉन्च करणार आहेत.
म्युझिकल जोडी सचेत-परंपरा यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केलेले आहे , त्याचबरोबर मनोज मुनताशीर यांनी हे गीत लिहिले आहे . असे हे अभूतपूर्व गाणे सर्व सीमारेषा ओलांडून जगभरातील प्रेक्षकांना मोहित करेल. चित्रपट चॅनेल, संगीत चॅनेल ते सामान्य मनोरंजन चॅनेल (GECs), संपूर्ण भारतात 70+ पेक्षा जास्त भारतभर पसरलेले रेडिओ स्टेशन, राष्ट्रीय वृत्त चॅनेल, मैदानी होर्डिंग, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, तिकीट भागीदार, चित्रपट थिएटर, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, २९ मे रोजी दुपारी १२ वाजता गाणे प्रदर्शित केले जाणार आहे.
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट टी-सिरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, आणि त्याचबरोबर ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्स मधील राजेश नायर यांनी निर्मित केला आहे आणि १६ जून २०२३ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल.
Comments
Post a Comment