पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ.. "अस्मिता-अभिमान-परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध"

इमेज
     शुक्रवार दि. ३० जानेवारी २६ रोजी  अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ पुरस्कृत भागोजीशेठ स्मृती समितीच्या माध्यमातून माहिम स्थित कोकण नगर येथे दि. १५ फेब्रुवारी २६ महाशिवरात्री दिनी भागोजीशेठ कीर जयंतीनिमित्त सभेचे आयोजन केले होते. सभेत भागोजीशेठ कीर यांच्या जीवनपटपर उपस्थितांबरोबर संवाद व जयंती निमित्त कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली.सभेत लालबागच्या राजाचे मूर्तिकार सन्मा. श्री. संतोष कांबळी यांच्या हस्ते भागोजीशेठ कीर यांच्या जीवनावर आधारित पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या सभेस प्रमुख पाहुणे या नात्याने समाजसेवक सन्मा. श्री. वीरेंद्रजी तांडेल, कोकण नगरच्या अध्यक्षा सन्मा. श्रीम. उषाताई उ. बांदिवडेकर,महासंघाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकरजी, महासंघाचे सरचिटणीस श्री. प्रकाशजी कांबळी, समितीचे अध्यक्ष किशोरजी केळसकर, कोकण नगरचे सभासद व  इतर मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन - २०२६ व चित्रकर्मी महाउत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली नियोजित पहिली बैठक.

इमेज
अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन २०२६ व चित्रकर्मी महा-उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पहिली पूर्वतयारी बैठक दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस महाराष्ट्रभरातील चित्रकर्मी, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व विविध घटकांचा उत्स्फूर्त व उल्लेखनीय प्रतिसाद लाभला.    संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व उपस्थितांनी एकजुटीने सहभाग नोंदवत, “हे संमेलन प्रत्येक चित्रकर्मीचं आहे” ही भावना ठामपणे व्यक्त केली. आगामी काळात हे संमेलन मराठी चित्रपट व्यवसायाला नवी दिशा, नवी ऊर्जा व व्यावसायिक बळ देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.    या बैठकीच्या निमित्ताने संपूर्ण मराठी चित्रपट परिवार एकत्र येण्याची सकारात्मक नांदी दिसून आली असून, भविष्यात एकत्रितपणे, समर्थपणे मराठी चित्रपटाचा समृद्ध वारसा पुढे नेला जाईल, असा आश्वासक चित्र स्पष्टपणे उभा राहिला आहे.  आयोजन -अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन नियोजन समिती 2026.

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर.

इमेज
   ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.    'पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजांची आणि अनपेक्षित वळणांची धमाल सांगणार आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या कथेचा  केंद्रबिंदू आहे. या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडाली, याची उत्तरं चित्रपट पाह...

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

इमेज
विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत  पहायला मिळणार आहेत. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार्‍या ‘केस नं. ७३’ या चित्रपटात एसपी संजय देशमुख ही जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेते शैलेश दातार साकारणार आहेत.   एसपी म्हणून संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याच्या पूर्ण सेवाकाळात एकही गुन्हा आजवर अनसॉल्व्ह राहिलेला नाही. प्रामाणिकपणा, कर्तृत्व आणि सरळ स्वभावामुळे संजय गावात लोकप्रिय आहे. मात्र, ऐन निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्याकडे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला येतो. ही केस सोडवण्याचे प्रचंड दडपण त्यांच्यावर आहे. धागेदोरे मिळत नाहीत आणि प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसोटीचा ठरतो. धाडस, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारी ही भूमिका कथानकाला वेगळी कलाटणी देणारी असणार आहे.    लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित  ‘केस नं. ७३’  हा मराठी चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपट...

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात.

इमेज
शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.   महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणा...

“चित्रपट कसा बनवावा” या विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन.

इमेज
  महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII), पुणे यांच्या सहकार्याने “चित्रपट कसा बनवावा” या विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यशाळा दिनांक २ फेब्रुवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दादासाहेब फाळके चित्रनगरी, चित्रांगण सभागृह येथे दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.   या कार्यशाळेसाठी सहभागींसाठी रु. ३,५००/- (अक्षरी रुपये तीन हजार पाचशे फक्त) इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) येथील प्राध्यापक डॉ. मिलिंद दामले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क :सुमेध आढाव मोबाईल : ८६५२२१५४०१

नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित.

इमेज
   नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या कथा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’सारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणाऱ्या आदित्य इंगळे यांचा ‘माया’ हा नवा चित्रपट आता त्याच भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. या टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.     टीझरमधून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. माणूस खरंतर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. ‘माया’चा टीझर हा भाव अतिशय हळुवारपणे उलगडतो. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून तयार होणारे मनोव्यापार आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचं जाणवतं.   चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा वेगळा, समजूतदार दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेग...

मोठ्या पडद्यावर उलगडणार नारीसामर्थ्याची गाथा...‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित !

इमेज
   प्रत्येक स्त्रीतील मर्दिनीला जागं करणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.  नारीशक्तीचा प्रभावी आणि प्रेरणादायी आविष्कार असलेला हा सिनेमा ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या या नव्या पोस्टर मध्ये एक ठाम पाऊल, उग्र रूप आणि ज्वालांनी वेढलेलं नाव ‘मर्दिनी’ पाहायला मिळतं.      सामान्य चौकटी मोडत, स्त्रीच्या संयम, संघर्ष आणि आत्मबळाचा ठसा उमटवणारा ‘मर्दिनी’ भावनांना स्पर्श करणारा आणि मनाला प्रश्न विचारायला लावणारा अनुभव देईल असा दिसतोय. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या  प्रमुख कलाकारांच्या सशक्त अभिनयासोबत बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेला एक वेगळी भावनिक उंची देते.      अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली ‘मर्दिनी’ साकारला जात आहे.  तर सह निर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक, पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी...

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

इमेज
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या प्रांगणात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांचा हस्ते राष्ट्र ध्वजवंदन करण्यात आले. दरम्यान भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.    यावेळी श्रीमती म्हसे पाटील यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांना प्रजासत्ताक  दिनाच्या  शुभेच्छा दिल्या. २०२७ हे वर्ष महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने विविध उपक्रम हाती घेण्याचे संकल्प करण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.  यासाठी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि एकजूट महत्वाचे असल्याचे स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितले. महामंडळाच्या प्रशासकीय इमारती जवळ चित्रांगण सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहात अत्याधुनिक प्रोजेक्टर सह ध्वनीयंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन श्रीमती स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

'पोटरा' चित्रपटाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

इमेज
     आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या पोटरा या मराठी चित्रपटाला तरुणांचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे या चित्रपटाचे प्रदर्शन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. रुईया महाविद्यालय,साठे महाविद्यालय, बाकलीवाल महाविद्यालय आणि सिडनेम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या चित्रपटाला हाऊसफुल गर्दी केली.     पोटरा म्हणजे ज्वारीचे कणीस जेव्हा  परिपक्व होण्याच्या स्थितीस येते ती स्थिती. मासिक पाळी सुरु होताच मुलींचे शिक्षण थांबवून त्यांचे लग्न लावून देण्याची प्रथा आजही काही गावात काही प्रमाणात पाळली जाते.या विषयावर पोटरा हा चित्रपट संयतपणे भाष्य करतो,निर्माते शरद शिंगाडे, कलाकार छकुली देवकर आणि नंदा काटे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली.महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी चित्रपट निर्मिती प्रक्रिया आणि  चित्रपटाचा अनुभव याबद्दल चित्रपटात...

‘मन जुळले’ने उलगडली ‘रुबाब’ची प्रेमळ बाजू!‘रुबाब’ चित्रपटातील रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ चित्रपटातील नवे रोमँटिक गाणे ‘मन जुळले’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेमाच्या हळुवार भावना मांडणारे हे गाणे रिलीज होताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या गाण्यात संभाजी ससाणे आणि शितल पाटील या जोडीच्या प्रेमप्रवासाची सुंदर झलक पाहायला मिळते. एकमेकांबद्दल उमलणाऱ्या भावना, न बोलता समजून घेणारे क्षण, नजरेतून व्यक्त होणारे प्रेम आणि मन जुळल्यानंतरची ती नाजूक भावनिक जवळीक हे सगळे ‘मन जुळले’ या गाण्यात अतिशय हळुवारपणे साकारण्यात आले आहे. त्यामुळे हे गाणे प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाचा आवाज बनते. केतकी माटेगावकरच्या सुमधुर आणि भावस्पर्शी आवाजाने सजलेले ‘मन जुळले’ हे गाणे ऐकताच मनात अलगद घर करते. तिच्या आवाजातील कोमलता आणि प्रेमळ स्पर्श या गाण्याला एक वेगळीच उंची देतो. चिनार–महेश यांच्या मधुर संगीताने या गाण्याला हृदयाला भिडणारी लय लाभली आहे, तर समीर आशा पाटील यांच्या अर्थपूर्ण आणि भावनांनी ओथंबलेल्या शब्दांनी प्रेमाची गहिरी अनुभूती उलगडली आहे.     दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “ रुबाब’ हा चित्रपट आत्मसन्मान,...

प्लटून वनच्या ‘तो ती आणि फुजी’चे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घवघवीत यश.

इमेज
 शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) जागतिक प्रीमियर झाला. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी स्पर्धा विभागातील सात निवडक चित्रपटांपैकी एक होता आणि त्याचे सर्व शोज् हाऊसफुल्ल झाले.     महोत्सवातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत ‘तो ती आणि फुजी’ने मानाचे २ पुरस्कारही पटकावले—ललित प्रभाकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरी विशेष उल्लेख) आणि इरावती कार्णिक यांना सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले.      जापान आणि भारतात चित्रीत झालेला ‘तो ती आणि फुजी’ हा चित्रपट पुण्यात राहणाऱ्या एका जोडप्याची कथा सांगतो—जिथे प्रेम नैसर्गिक न राहता ते मोजून-मापून केलं जातं, त्याला गुणांकनात आणि भाकितांमध्ये अडकवलं जातं. अशा जगात त्यांची तीव्र, सर्वस्व झोकून देणारी प्रेमकहाणी उलगडते.     या सन्मानाबद्दल बोलताना ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ, झोंबिवली, स्माईल प्लीज) म्हणाले, “तो ती आणि फुजी हा माझ्...

'पिफ्फ'मध्ये ‘बाप्या’ने पटकावले तीन मानाचे पुरस्कार.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व गौरवाचा क्षण ठरत आहे.  २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) २०२६ मध्ये ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ विभागात अधिकृत निवड झालेल्या आगामी मराठी चित्रपट ‘बाप्या’ ने आता थेट तीन मानाचे पुरस्कार पटकावत महोत्सवात दैदिप्यमान यश मिळवले आहे.     ‘बाप्या’ ला 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा सन्मान मिळाला असून, आपल्या दमदार आणि सहज अभिनयाने प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकणाऱ्या गिरीश कुलकर्णी यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' , तर संवेदनशील भूमिकेतील उत्कृष्ट सादरीकरणासाठी राजश्री देशपांडे यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.   समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ची कथा दापोलीतील एका लहान मासेमार कुटुंबाभोवती फिरते. कुटुंबातील नातेसंबंध, समाजाचा दृष्टीकोन आणि वैयक्तिक संघर्ष यांचा हळुवार वेध घेणारी ही गोष्ट भावनिक संवेदनशीलता, विनोद आणि सामाजिक भाष्य यांचा सुंदर समतोल साधणारी आहे. मुक्तल तेलंग आणि समीर तिवारी निर्मित या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर...

'बोलीभाषा' एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीची रंगत...

इमेज
   ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची मूळ संकल्पना असलेली आणि मराठी नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी एकांकिका स्पर्धा म्हणजे 'बोलीभाषा एकांकिका स्पर्धा'. नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. सध्या गोविंद चव्हाण यांच्या पश्चात त्यांची कन्या सुप्रिया चव्हाण या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. 'सुप्रिया प्रॉडक्शन'तर्फे आयोजित या स्पर्धेची यंदाची प्राथमिक फेरी अलीकडेच पार पडली आणि त्यातून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या सात एकांकिकांची अंतिम फेरी गुरुवार, २९ जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे.      'सपान' (डॉक्टर्स थिएटर ग्रुप - माणदेशी), 'फ्रीडम ॲट मिडनाईट' (सृजन द क्रिएशन - मालवणी), 'पाकळ्या' (नक्षत्र कलामंच - खान्देशी), 'डिझाईन' (डॉ. टी.के.टोपे रात्र महाविद्यालय - घाटी), 'त्यात काय!' (एकदम कडक नाट्यसंस्था - घाटी), 'सत्य' (नाट्यारंभ एन.के.टी.टी. - मालवणी) आणि ...

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री.

इमेज
राष्ट्रीय  पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते, अभिजित घोलप, यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या 'नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन' अर्थात ‘नाफा’ (NAFA) या संस्थेने नववर्षात अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणताही आर्थिक लाभ न घेता, स्वयंसेवकांच्या निष्ठा, समर्पण आणि कलाप्रेमावर उभी राहिलेली ही नो-प्रॉफिट संस्था आता आपल्या खास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नाफा स्ट्रीम’च्या माध्यमातून नॉर्थ अमेरिकेतील मराठी रसिकांच्या भेटीला आली आहे.    नुकताच लाँच झालेला ‘नाफा स्ट्रीम’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म उत्तर अमेरिका व कॅनडामधील प्रेक्षकांसाठी वेब, रोकु, आयओएस आणि अँड्रॉइड या सर्व माध्यमांवर उपलब्ध झाला आहे. मराठी चित्रपट, लघुपट, डॉक्युमेंट्री, वेबसीरिज आणि मास्टरक्लासेसचा दर्जेदार खजिना एकाच छताखाली आणण्याचे ध्येय या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य ठरते. उत्तर अमेरिका व कॅनडामधील मराठी प्रेक्षकांसाठी 'नाफा स्ट्रीम' हे मराठी मनोरंजनाचे हक्काचे OTT platform ठरणार आहे !    ‘नाफा स्ट्रीम’वर NAFA मास्टरक्लास, कल्ट क्लासिक, तसे...

भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’.

इमेज
इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ.गजानन जाधव, राम जाधव यांनी केली आहे. रमेश साहेबराव चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘सालबर्डी’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून या चित्रपटाच्या विषयाची भीषणता अधोरेखित होत आहे. या गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं काळकभिन्न वास्तव हा या चित्रपटाचा गाभा आहे. भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पहाणं अतिशय थरारक असणार आहे. भीती, थरार, विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात ...

रणपति शिवराय स्वारी आग्रा चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षक पसंतीस.

इमेज
छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली.   औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची खरी झलक दिसली. हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला, निमित्त होते…‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याचे. शिववंदना, शिवशाहिरांकडून सादर झालेल्या दमदार पोवाडा सादरीकरणाने हा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला.   मराठी चित्रपटाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत.‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासात दडलेले सुपरहिरोज AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. या ट्रेलर अनावरण प्रसंगी महाराजांचा ‘तिसरा डोळा’ अशी ख्याती असणाऱ्या बहिर्जी नाई...

लग्नाच्या गडबडीत अडकले अभि - कृतिका, ‘लग्नाचा शॉट’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

इमेज
लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण आणि अनेक अनपेक्षित क्षणांचा संगम आणि हाच संगम मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच एका खास आणि हटके वातावरणात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्चचा हा सोहळा चक्क खऱ्या लग्नघरासारखा साकारण्यात आला होता, ज्यामुळे उपस्थितांना हा केवळ ट्रेलर लॉन्च न वाटता जणू प्रत्यक्ष लग्नसमारंभाचाच अनुभव मिळाला.    यावेळी ढोल ताशांच्या गजरात अभिजीत आमकर याची घोड्यावरून वरात आली तर वाजतगाजत प्रियदर्शिनी इंदलकर पालखीतून आली. या खास सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी यांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली. संपूर्ण वातावरणात लग्नाची लगबग, उत्साह आणि गोंधळ अनुभवायला मिळत होता, अगदी चित्रपटाच्या संकल्पनेप्रमाणेच.    ट्रेलरमध्ये एका लग्नाच्या तयारीपासून सुरू होणारी गोष्ट पुढे कशी अनपेक्षित वळणं घेते, याची रंजक झलक पाहायला मिळते. चुकीचे निर्णय, नात्यांमधील गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ हे सगळं अगदी हलक्याफुलक्या, विनोदी शैलीत प्रभाव...

व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलेल्या अभिनेत्री 'मृण्मयी सुपल'च्या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग.

इमेज
   सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडसं हशा पिकवणार, सामाजिक गांभीर्य असणारा विषय, नात्यात होणारे गैरसमज, व्यक्ती व्यक्तीतला फरक, समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म, थोडीशी कॉमेडी थोडं सिरीयस असा सगळा मालमसाला असलेलं एक नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आहे. ज्याचं नाव आहे  "एक नातं असंही" आहे. हे दोन अंकी नाटक प्रत्येकाच्या आयुष्यावर किंबहुना नात्यावर प्रकाश टाकणार असे असून या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या ३१ जानेवारीला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे.        "एक नातं असंही" या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केली असून अभिजीत भालेराव हे या नाटकाचे  निर्माते आहेत. नाटकाचे लेखन विस्मय दिपक कासार यांनी केलेले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांचे आहे. या नाटकात अभिनेत्री मृण्मयी सुपल, विस्मय कासार, मोहिनी, प्रवीण भाबल, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सुजल दळवी या कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत रुपेश मोहन जाधव यांचे तर  प्रकाश योजना निखिल...

चित्रनगरीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी गिरवले व्यवस्थापनाचे धडे.

इमेज
   महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि सल्लागाराकरिता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथे ही दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.    प्रकल्प व्यवस्थापन, आर्थिक नियोजन व बजेटिंग, कार्य–जीवन संतुलन, कार्यस्थळी तंत्रज्ञान, अपग्रेडेशन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत केतन गावंड यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवसाचा समारोप `टीम बाँडिंग'साठी अनौपचारिक `कराओके' सत्राने झाला.   प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या दिवशी सर्जनशीलता व डिजिटल जागरूकतेवर भर देण्यात आला. संवेदी म्हात्रे व ओंकार पाटील यांनी समूह चित्रकला उपक्रम घेतला. तर मुकुंद नाडगौडा यांनी डिजिटल व सायबर सुरक्षेवर सुशासनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. या वेळी संस्थात्मक सुधारणा विषयावर खुली चर्चा झाली. त्यात अनेक कर्मचाऱ्यांनी अनेक कल्पक सूचना मांडल्या. दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाला सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर व मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणाचे ...

'रुबाब'च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीचे, काळाशी सुसंगत प्रयोग सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक डॅशिंग, स्टायलिश आणि मनाला भिडणारी लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या बहुप्रतीक्षित ‘रुबाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्याच क्षणापासून ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.       ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही लक्षवेधी टॅगलाईन घेऊन आलेला ‘रुबाब’ केवळ एक प्रेमकहाणी नसून, स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या, आत्मसन्मान जपणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहाणाऱ्या आजच्या तरुणाईची गोष्ट आहे.  एक रुबाबदार, स्वॅग असलेला नायक, त्याची ड्रीम गर्ल आणि त्यांचं गोड, हळवं आणि तितकंच बेधडक प्रेम ट्रेलरमध्ये दिसते. मात्र या प्रेमाच्या वाटेत उभा आहे समाज, कुटुंब आणि अनेक विरोधकांचा भक्कम अडथळा!    प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान यांच्या संगमातून उभं राहिलेलं हे नातं जिंकेल की, समाजाच्या दबावापुढे झुकेल? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार ...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप उमटवलेल्या चित्रपटाचे पहिल्यांदाच प्रदर्शन.

इमेज
 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी छाप उमटविणारा 'पोटरा' या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.      महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत पोटरा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.     १ तास १८ मिनिटांच्या 'पोटरा' चित्रपटात ग्रामीण वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. ग्रामीण भागात आजही मुलींना समाजातील जुनाट रूढी-परंपरांमुळे कशा प्रकारचे बंधनकारक आयुष्य जगावे लागते, याचे अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.चित्रपट प्रदर्शनावेळी सभासदासह प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

हास्याचा डोस घेऊन ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
कुरळे बंधू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत… आणि यावेळी गोंधळ, गैरसमज आणि धमाल अधिकच वाढलेली दिसतेय! नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चा ट्रेलर पाहिला की, एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे हा चित्रपट फक्त हसवणारा नाही, तर शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारा आहे.    रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात ट्रेलरमध्ये सतत काही ना काही विचित्र घडताना दिसतंय. कधी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते, कधी गैरसमजांचा गुंता वाढतो, तर कधी बबनची खट्याळ एन्ट्री सगळंच गणित बदलून टाकते. वेगवेगळ्या स्वभावांची चार माणसं एकत्र आली की, काय काय घडू शकतं, याची भन्नाट झलक हा ट्रेलर देतो.    याच गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. ती नेमकी कोण आहे, ती त्यांच्या आयुष्यात का आली आहे आणि तिच्या येण्याने सगळेच इतके अस्वस्थ का झाले आहेत, याचं थेट उत्तर ट्रेलर देत नाही. त्यामुळेच तिच्या भूमिकेबाबत एक कुतूहल निर्माण होतं. ही एन्ट्री योगायोग आहे की, एखाद्या मोठ्या वळणाची सुरुवात?ट्रेलरमधील विनोदाचा टेम्पो जबरदस्त आहे. संवादांचा अचूक टाइमिंग, प्र...

मानसी नाईकची मध्यवर्ती भूमिका असलेला "मन आतले मनातले",१३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
आशयसंपन्न कथा असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला मन आतले मनातले हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.    सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत "मन आतले मनातले" या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाचं कथा आणि पटकथा लेखन, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. तर जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिजित मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईक अभिनेता सुरेन महापात्रा, अभिनेता  उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनित भोंडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. अतिशय नावीन्यपूर्ण कथा, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोर...

दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्या "सहवास" भयपटाचे पोस्टर प्रदर्शित.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि प्रेमकथेचा अनोखा संगम सादर करणारा नवा चित्रपट “सहवास” याचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे , सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित या चित्रपटाने पोस्टरच्या माध्यमातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि थरार निर्माण केला आहे. पोस्टरमध्ये एका पुरुषाच्या खांद्यावर ठेवलेला अदृश्य हात आणि गूढ, अंधुक वातावरण चित्रपटाच्या कथेतील रहस्य अधोरेखित करते. “प्रेम का भीती?” हा सवाल उपस्थित करत, “सहवास” ही केवळ प्रेमकथा नसून, प्रेमाच्या नावाखाली उलगडणाऱ्या भयावह सहवासाची कथा असल्याचे संकेत पोस्टरमधून मिळतात. “सहवास” या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे करणार असून, निर्मितीची धुरा गोवर्धन दोलताडे हे सांभाळणार आहेत . सहनिर्माते म्हणून कार्तिक दोलताडे पाटील यांचे योगदान आहे. मराठी सिनेमात फारसा न पाहिलेल्या हॉरर-रोमँटिक शैलीत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे.    चित्रपटाच्या शीर्षकातील “सहवास” हा शब्द प्रेम, जवळीक आणि नातेसंबंध सूचित करतो , मात्र पोस्टरमधील भयगूढ संकेत या सहवासामागील अंधार उघड करतात. त्यामुळे हा सहवास प्रेमाचा आहे की...

‘शतक’च्या ट्रेलरचे अनावरण.

इमेज
देशातील सर्वाधिक चर्चेत आणि बारकाईने पाहिल्या जाणाऱ्या संघटनांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त ‘शतक : संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे मुंबईत भव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आले. हा ट्रेलर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. मनमोहन वैद्य यांच्या हस्ते, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.     ट्रेलर लाँचपूर्वी निर्मात्यांकडून निवडक माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष प्रिव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मनमोहन वैद्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या विशेष प्रदर्शनामुळे पत्रकारांना चित्रपटाचा आशय, दृष्टीकोन आणि उद्देश अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.    २०२५ हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले, कारण या वर्षी संघाने आपल्या कार्याचा शताब्दी टप्पा पूर्ण केला. गेल्या शंभर वर्षांत संघाने भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जीवनावर खोलवर प्रभाव टाकला आहे. मात्र, या काळात संघ हा नेहमीच चर्चेचा, वादाचा आणि अनेकदा गैरसमजांच...

२२ वर्षे नेटाने महोत्सव करणे हे कौतुकास्पद: प्रशांत साजणीकर.

इमेज
गेला आठवडाभर रंगलेल्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा नुकताच संपन्न झाला. यंदाच्या आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे ५६ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगातल्या उत्तम चित्रपटांचा आस्वाद अशा महोत्सवांमधून घेता येत असतो. चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महोत्सवांप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज प्रशांत साजणीकर यांनी यावेळी बोलून दाखविली. शहराप्रमाणे ग्रामीण भागात चित्रपट पोहचणे गरजेचं असल्याचं सांगत, शासन वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळानेच जुन्या चित्रपटांसाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. त्याचप्रमाणे नवोदित कलाकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देत तीन वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरु करण्यात आल...

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा.

इमेज
   हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (RSS) अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संघटनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून, हा त्याच्या इतिहासातील एक मोठा टप्पा आहे.    शंभर वर्षांचा हा प्रवास पूर्ण करत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेली संघटना राहिली आहे. संघाविषयीची सार्वजनिक मते अनेकदा सखोल समजुतीपेक्षा धारणांवर आणि समजुतींवर आधारित राहिली आहेत. त्याच्या मूळ तत्त्वज्ञान, मूल्यव्यवस्था आणि अंतर्गत कार्यपद्धतीकडे पाहाण्याचा प्रयत्न फारसा झालेला नाही.     ‘शतक (संघ के १०० वर्ष)’ असे शीर्षक असलेला हा हिंदी चित्रपट वीर कपूर निर्मित असून, आशिष तिवारी सहनिर्माते आहेत. एडीए ३६० डिग्री एलएलपी यांच्या सहकार्याने साकारलेला हा चित्रपट गोंगाटापलीकडे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा, प्रामाणिक आणि वास्तव प्रवास मांडण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटात संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे योगदान, तसेच एम. एस. गोळवलकर (गुरुजी) यांच्या ने...

२२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात,'एशियन कल्चर’ पुरस्काराने जेष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित.

इमेज
   २२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग,महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एनएफडीसी यांच्या सहकार्याने आयोजित २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी(IAS), राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) चे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश मगदूम, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, ज्युरी मेंबर सुप्रतिम भोल, सतीश जकातदार, प्रेमानंद मुजुमदार, कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.  याप्रसंगी महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार' देण्यात आला आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' देऊन सन्मानित केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन ...

कौटुंबिक मनोरंजनाचा 'शॉट' तयार...अभि - क्रितिकाचे केळवण झाले दणक्यात ‘लग्नाचा शॉट’चा टिझर प्रदर्शित.

इमेज
    लग्न म्हणजे आनंद, गोंधळ, परंपरा आणि थोडीशी धावपळ… परंतु या सगळ्यावर जर अचानक ‘शॉट’ बसला तर? हाच प्रश्न उद्भवणाऱ्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, लग्नघरातील उत्साह, धमाल आणि पारंपरिक विधींनी नटलेल्या या सोहळ्यात चित्रपटातील नवरा -नवरी अर्थात अभि आणि क्रितिका म्हणजेच अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी उखाणेही घेतले. या रंगतदार सोहळ्यात भर टाकली ती, चित्रपटाच्या टीझरने. 'लग्नाचा शॉट'ची पहिलीच झलक उपस्थितांना प्रचंड भावल्याचे दिसतेय.      पोस्टरमधून सूचित झालेल्या गोंधळाचा टिझरमध्ये मजेशीर विस्तार पाहायला मिळतो. लग्नाची धावपळ, चुकीचे निर्णय, वेळेचा गोंधळ, नशिबाचे फेरे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार प्रसंगांची झलक टिझरमध्ये दिसते. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच टिझरमध्येही ‘शॉट’ म्हणजेच अचानक घडणाऱ्या घटना, वळणावळणाचा प्रवास आणि लग्नात उडणारा गोंधळ यांचा धमाल मेळ आहे.     विशेष म्हणजे प्रियदर्शिनी इंद...

“चि व चि. सौ. का”ची हिट जोडी ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले, मोहित टाकळकर दिग्दर्शित “तो, ती आणि फुजी” ह्या मराठी - जपानी रोमँटिक चित्रपटात एकत्र.

इमेज
    अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या महोत्सवातील प्रतिष्ठित मराठी फीचर फिल्म स्पर्धा विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या “संत तुकाराम” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारासाठी हा चित्रपट स्पर्धेत असून, हा त्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.    ह्या चित्रपटाचे चित्रीकरण जपान आणि भारतात झाले असून हा एक अभूतपूर्व मराठी रोमँटिक चित्रपट आहे.जपान केवळ पार्श्वभूमी किंवा वेगळे स्थळ म्हणून नाही, तर पात्रांच्या आतल्या भावनिक अंतराचे प्रतिबिंब असलेल्या भावनिक अवकाशासारखा उलगडतो. हा चित्रपट अंतर, काळ आणि बदलत्या भावनिक वास्तवामुळे नातेसंबंध कसे बदलतात याचा शोध घेतो.सुरुवातीला अतिशय उत्कट असलेले एक नाते काळानुसार, प्राधान्यक्रमांमुळे, परस्परविरोधी स्वभावांमुळे व अनाठायी अपेक्षांमुळे कसे विषारी बनते हे या कथानकातून उलगडते. विभक्त झाल्यानंतर सात वर्षांनी ते पुन्हा एकदा जपानमध्ये भेटतात तेव्हा जुन्या जखमा, अर्धवट राहि...

‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही हटके टॅगलाईन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून चित्रपटाबद्दलची चर्चा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या रुबाबदार आणि स्टायलिश लव्हस्टोरीतील पहिलं प्रेमगीत ‘कसं तरी होतंया रं’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.     या गाण्यात अभिनेता संभाजी ससाणे आणि अभिनेत्री शितल पाटील यांच्या पहिल्या प्रेमातील निरागस, हळवे आणि गोड क्षण अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आले आहेत. प्रेमात पडल्यावर मनात निर्माण होणारी धडधड, नजरानजरेतून उमटणारी ओढ, हळूच उमलणारे भाव या सर्व भावना या गाण्यात अतिशय सुरेख पद्धतीने व्यक्त केल्या आहेत.या रोमँटिक गाण्याला बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाची जादू लाभली असून, गीतकार मंगेश कांगणे यांच्या शब्दांनी गाण्याला अधिक भावनिक खोली दिली आहे. तर चिनार–महेश यांच्या संगीतामुळे हे गाणं ऐकताना प्रेमाच्या विश्वात हरवून जायला होतं. चिनार-महेश यांनी ‘बालक-पालक’, ‘ट...

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड.

इमेज
मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोगांची लाट सुरू असताना, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे नव्या वर्षाची सुरुवात एका खास भेटीसह करत आहे. नेहमीच आशयघन, दमदार आणि आव्हानात्मक भूमिका निवडणारी मुक्ता बर्वे ‘माया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. येत्या २७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     भूमिकांच्या निवडीत नेहमीच वेगळेपण जपणारी मुक्ता बर्वे ‘माया’मध्ये प्रमुख आणि प्रभावी भूमिकेत झळकणार आहे. पोस्टरमध्ये मुक्तासोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि डॉ. गिरीश ओक अशी तगडी कलाकारांची फळी दिसत असून, या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.    वया चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, घोषणेआधीच ‘माया’ने आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे. या चित्रपटाची निवड २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाली असून, ही बाब ‘माया’च्या आशयघन आणि दर्जेदार कथानकाची साक्ष देते. चित्रपटाची घोषणा आणि ...