अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ.. "अस्मिता-अभिमान-परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध"
शुक्रवार दि. ३० जानेवारी २६ रोजी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ पुरस्कृत भागोजीशेठ स्मृती समितीच्या माध्यमातून माहिम स्थित कोकण नगर येथे दि. १५ फेब्रुवारी २६ महाशिवरात्री दिनी भागोजीशेठ कीर जयंतीनिमित्त सभेचे आयोजन केले होते. सभेत भागोजीशेठ कीर यांच्या जीवनपटपर उपस्थितांबरोबर संवाद व जयंती निमित्त कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली.सभेत लालबागच्या राजाचे मूर्तिकार सन्मा. श्री. संतोष कांबळी यांच्या हस्ते भागोजीशेठ कीर यांच्या जीवनावर आधारित पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.या सभेस प्रमुख पाहुणे या नात्याने समाजसेवक सन्मा. श्री. वीरेंद्रजी तांडेल, कोकण नगरच्या अध्यक्षा सन्मा. श्रीम. उषाताई उ. बांदिवडेकर,महासंघाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकरजी, महासंघाचे सरचिटणीस श्री. प्रकाशजी कांबळी, समितीचे अध्यक्ष किशोरजी केळसकर, कोकण नगरचे सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा