आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप उमटवलेल्या चित्रपटाचे पहिल्यांदाच प्रदर्शन.

 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी छाप उमटविणारा 'पोटरा' या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. 
   महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुरू केलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत पोटरा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 
   १ तास १८ मिनिटांच्या 'पोटरा' चित्रपटात ग्रामीण वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. ग्रामीण भागात आजही मुलींना समाजातील जुनाट रूढी-परंपरांमुळे कशा प्रकारचे बंधनकारक आयुष्य जगावे लागते, याचे अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.चित्रपट प्रदर्शनावेळी सभासदासह प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.