अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन - २०२६ व चित्रकर्मी महाउत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली नियोजित पहिली बैठक.

अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन २०२६ व चित्रकर्मी महा-उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पहिली पूर्वतयारी बैठक दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस महाराष्ट्रभरातील चित्रकर्मी, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व विविध घटकांचा उत्स्फूर्त व उल्लेखनीय प्रतिसाद लाभला.
   संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व उपस्थितांनी एकजुटीने सहभाग नोंदवत, “हे संमेलन प्रत्येक चित्रकर्मीचं आहे” ही भावना ठामपणे व्यक्त केली. आगामी काळात हे संमेलन मराठी चित्रपट व्यवसायाला नवी दिशा, नवी ऊर्जा व व्यावसायिक बळ देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
   या बैठकीच्या निमित्ताने संपूर्ण मराठी चित्रपट परिवार एकत्र येण्याची सकारात्मक नांदी दिसून आली असून, भविष्यात एकत्रितपणे, समर्थपणे मराठी चित्रपटाचा समृद्ध वारसा पुढे नेला जाईल, असा आश्वासक चित्र स्पष्टपणे उभा राहिला आहे.
 आयोजन -अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन नियोजन समिती 2026.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...