'सखे गं साजणी'च्या कुल पोस्टरची चर्चा, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकरची मुख्य भूमिका.

    मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं बदलणं नाही, तर नाती अधिक घट्ट होण्याचा, आयुष्य नव्याने जगायला शिकविण्याचा अनुभव असतो. आणि हाच अनुभव मोठ्या पडद्यावर आणणारा 'सखे गं साजणी' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट तीन मित्रांच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. आणि या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. 
    'सखे गं साजणी' या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील तीन लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर हे तीन कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. पोस्टरवरील तिघांचा कुल अंदाज आताच्या तरुणाईची उत्सुकता वाढविणारा आहे. निरभ्र आकाशाकडे पाहत स्वछंदी जगण्याचा आनंद लुटण्याचा केविलवाणा प्रयत्न या तिघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे. पोस्टरवरून ही तिघांची मैत्री अर्थात वेगळी आहे हे स्पष्ट करतंय.अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब स्टुडिओ’ हाऊस मार्फत हा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अभिषेक जावकर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अभिषेक जावकर,आदित्य वासुदेव घरत, अभिजीत खांडकेकर, श्रेयश 
विलास सावंत यांनी सांभाळली आहे. तर सहनिर्माते म्हणून अभिषेक दिलीप वाकचौरे आणि जातीं उपाध्याय यांनी बाजू सांभाळली आहे.पोस्टर पाहून हा चित्रपट मैत्रीची नव्याने ओळख करून देणार असल्याचं दिसतंय. तसेच 'सखे गं साजणी' हा चित्रपट 3 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे घोषित केले गेले आहे. अर्थात पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...