सांस्कृतिक कलादर्पण च्या मराठी नाट्य महोत्सवाची अंतिम नाटकं जाहीर.
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २८ व्या" सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्यातील मराठी व्यावसायिक नाटक विभागातील स्पर्धेतील एकूण २२ नाटकांमधून अंतिम ५ नाटकांची "निवड मराठी व्यावसायिक नाट्य महोत्सवात" जाहीर झाली आहेत.जाहीर झालेली नाटकं पुढील प्रमाणे आहेत.
सविता दामोदर परांजपे , फिल्टर कॉफी , ठरलंय Foreverr, गोष्ट तिच्या घटस्फोटाची,लागली पैज .वरील नाटकांचा महोत्सव दिनांक १० ते १३ मार्च दरम्यान संपन्न होणार आहे.
दिनांक १० मार्च रात्रौ ८ वा.सविता दामोदर परांजपे. ११ मार्च रात्रौ ८ वा. फिल्टर कॉफी
१२ मार्च रात्रौ ८ वा. ठरलंय Foreverr
१३ मार्च दुपारी ४ वा. गोष्ट तिच्या घटस्फोटाची
दिनांक १३ मार्च रात्रौ ८ वा. सविता दामोदर परांजपे.या वेळे नुसार सादर होणार आहेत. तसेच मराठी प्रायोगिक नाट्य स्पर्धेत पुढील नाटकं अंतिम स्पर्धेसाठी जाहीर झाली आहेत. महापूर , इतना सन्नाटा क्यू है भाई.कर्ण,स्वस्तिकाची ट्रॅजेडी , इथेच टाका तंबू, ऊन पाऊस ,मराठी प्रायोगिक नाट्य महोत्सव दिनांक ९ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत साजरा होणार आहे. दिनांक ९ मार्च रोजी मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक आणि गीतकार मा. संजय कृष्णाजी पाटील यांच्या शुभ हस्ते यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे होणार आहे.या वेळी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या व्यावसायिक नाट्य विभागाचे परिक्षणाचे काम रमेश मोरे, संकेत तांडेल,रविंद्र आवटी, अमित फाटक, चंद्रशेखर सांडवे आणि शिरीष घाग यांनी पाहिले तसेच प्रायोगिक नाटकाचे परीक्षणाचे काम मनोहर सरवणकर ,विकास मोजर आणि चंद्रशेखर सांडवे यांनी पाहिले. वरील मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाट्य महोत्सव दिनांक ९ ते १३ मार्च पर्यंत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे मोठ्या जल्लोषात रंगणार आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही रसिक प्रेक्षकांना कमी दरात दर्जेदार नाटकं फक्त १००, २००, ३०० रुपयात पहायला मिळणार आहेत. नाटकाची बुकिंग बुक माय शो वर उपलब्ध असून फोन बुकिंगसाठी विकास मोजर:9594993031 यांच्याकडून तिकीट मिळतील असे संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांनी जाहीर केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा