अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित 'पप्पा सांगा कुणाचे...' माहितीपटाचे प्रदर्शन...

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ यांच्या वतीने अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित 'पप्पा सांगा कुणाचे...' माहितीपटाचे विशेष प्रदर्शन शुक्रवारी लघु नाट्यगृह, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले होते. 
   यावेळी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अरुण सरनाईक यांची कन्या आणि माहितीपटाच्या निर्मात्या सविता सरनाईक नाईकनवरे, दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे, संकलक सौरभ नाईक, विशाखा देशपांडे, संहिता पाठारे तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर काटकर उपस्थित होत्या. महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच उपस्थितांशी संवादही साधला.
   स्व. अरुण सरनाईक हे मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते व गायक होते. अरुण सरनाईक यांची मुलगी डॉ. सविता सरनाईक - नाईकनवरे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 'पप्पा सांगा कुणाचे...' या माहितीपटाची निर्मिती केली आहे. यावेळी डॉ.सविता सरनाईक नाईकनवरे आणि डॉ. संतोष पाठारे यांनी माहितीपटाच्या निर्मितीची प्रक्रिया प्रेक्षकांना सांगितली. श्रीमती श्रुती सडोलीकर आणि उपस्थित यांनी अरुण सरनाईक यांच्या आठवणीना उजाळा दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...