"कपबशी" चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान गाडीला अपघात, सुदैवाने गाडीतील सर्वजण सुखरूप.


"कपबशी" चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे येथून सांगली येथे जात असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे 3 वाहने एकमेकांवर आदळून कार अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नसून मुका मार  लागला आहे. सदर प्रवासात अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे या गाडीतून प्रवास करत होते. गाडीचे नुकसान झाले असून गाडीतील सर्वजण हे सुखरूप आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

आर्यरवी एंटरटेनमेंट प्रस्तुत व दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त"माझा बाबा"शॉटफिल्मला मिळाले ३मानाचे पुरस्कार.