पोस्ट्स

उत्कंठावर्धक 'लाईफलाईन'चा टिझर प्रदर्शित.

इमेज
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान 'लाईफलाईन' चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही चुरस रंगणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात आता या टिझरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. अशोक सराफ आणि माधयव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे, पाहाण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.  क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह  हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत...

"नेता गीता"'मधून उलगडणार कॉलेजचं राजकारण ते प्रेम प्रकरण.

इमेज
कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते. कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास नेता गीता या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, अभिनेत्री शिवानी बावकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेता सुधांशू महेश बुडुख या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.       सिम्बारिया फिल्म्सतर्फे "नेता गीता" या चित्रपटाची निर्मिती आणि  प्रस्तुती करण्यात येत आहे.  सुधांशू महेश बुडुख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. शिवानी बावकरसह सुधांशू बुडुख रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर, विराज अवचिते, सुहास जोशी, सुचेत गवई, विक्रांत धीवरे  असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीर हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.  कॉलेज जीवनात तरुणाईचा सळसळता उत्साह असतो. या उत्साहातच कॉलेजच्य...

'या' दिवशी होणार बहुचर्चित 'हॅशटॅग तदेव लग्नम' प्रदर्शित .....

इमेज
 'हॅशटॅग तदेव लग्नम' हे नाव ऐकूनच जरा विचारात पडला असाल ना?  हॅशटॅग हा आजचा ट्रेंडिंगमधला शब्द आहे  तर तदेव लग्नम हा संस्कृत शब्द त्यामुळे या दोघांचा परस्परांशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत असतील. हीच उत्सुकता कायम ठेवत, हा भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी  'हॅशटॅग तदेव लग्नम' सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  शुभम फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे. या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.       मोशन पोस्टर पाहून यात लग्नातील धमाल पाहायला मिळणार आहे, हे कळतेय. परंतु आता हे 'हॅशटॅग तदेव लग्नम' नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ४ ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे प्रथमच एकत्र...

दिलीप प्रभावळकर यांच्या मनात डॉ.श्रीराम लागूंच्या पत्र आठवणींचा दरवळ....'पत्रा पत्री' अभिवाचन....

इमेज
माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं या खेळाच्या आठवणी अनेकांच्या  स्मृतीरंजनात असतील. मात्र कालौघात हा खेळ हरवलायं  आणि ते पत्रसुद्धा. एक छोटा कागदाचा कपटा,पण  पत्रामध्ये, दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये किती तरी अव्यक्त गोष्टी दडलेल्या असायच्या  हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात  चिरंतन दरवळतो. अभिनेते  दिलीप प्रभावळकर यांना डॉ. श्रीराम लागू यांनी लिहलेल्या पत्राचा दरवळ आणि त्याची आठवण आजही दिलीप प्रभावळकर यांच्या मनात रुंजी घालतायेत.       ‘हसवाफसवी’ हे नाटकं पहिल्यानंतर डॉ.श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिले.  या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं सांगताना, नाट्यरसिकांसाठी  दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे, त्यासही नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.  दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे  प्रयोग सध्या  जोरदार  सुरु आहेत.  यासाठी ज्येष्ठ ना...

'बाबू' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अंकित मोहनला गंभीर दुखापत .

इमेज
मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. आगरी- कोळी समाजातील भाषेचा झणझणीत जलवा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, चित्रपटात 'बाबू'ची भूमिका साकारणारा अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी पारंपरिक पेहरावात नुकतेच आपल्या कोळी बांधवाना, भगिनींना भेटायला नवी मुंबईतील दिवाळे गावातील मासे मार्केटमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत निर्माते बाबू कृष्णा भोईरही होते. यावेळी चित्रपटातील टायटल साँगवर नृत्य करताना धारदार कोयता लागून अंकितच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अशातही तो नाचत होता, परंतु हातातून रक्त वाहू लागल्याने सगळे कोळी बांधव लगेच त्याच्या मदतीला धावून आले. गंभीर दुखापत असल्याने त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. अंकितच्या हाताला नऊ टाके पडले आहेत.  उपचारानंतरअंकित आपल्या कोळी बांधवाना भेटण्यास आणि त्यांचे आभार मानण्यास पुन्हा त्या मार्केटमध्ये गेला. या सगळ्यांचे प्रेम बघून अंकित भारावून गेला.       घटनेबद्दल अंकित म्हणतो, "कोळी बांधवांबद्द...

अक्षय कुमार चा "सरफिरा" या विकेंड ला बॉक्स ऑफिस वर करणार तुफान बॅटिंग.

इमेज
"सरफिरा" च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिसवर मंद सुरुवात झाली असावी, मुख्यत्वे महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे ज्याने अनेक चित्रपट पाहणाऱ्यांना घरामध्ये ठेवले होते. तथापि, असे असूनही, शहरी केंद्रांमधील संध्याकाळच्या शोमध्ये उपस्थितीत आशाजनक वाढ नोंदवली गेली, तिकिट विक्री 60% ने वाढली कारण प्रेक्षकांनी नवीनतम प्रकाशन पाहण्यासाठी हवामानाचा धाडस दाखवला. “सरफिरा” ला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत; चित्रपटाच्या मनमोहक कथानकाला आणि प्रभावी कामगिरीवर प्रकाश टाकणे. अक्षय कुमार आणि राधिका मदन अभिनीत, "सरफिरा" मध्ये दोन्ही लीड्सच्या करिअर-परिभाषित कामगिरी आहेत. अभिनेत्यांच्या त्यांच्या मागणीच्या भूमिकेतील अभिनय आकर्षक आणि मनोरंजक दोन्ही म्हणून कौतुक केले गेले. जसजसा शब्द पसरतो तसतसे, शनिवार व रविवारसाठी अपेक्षा निर्माण होत राहते, ज्यामुळे लक्षणीयरीत्या जास्त संख्या मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्याच दिवशी मजबूत पाया घातल्याने, "सरफिरा" वीकेंडमध्ये मोठ्या उडी पाहण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडून मिळालेला सकारात्मक प्...

'अल्याड पल्याड' टीमने मानलेमाध्यम प्रतिनिधींचे आभार.

इमेज
अल्याड पल्याड’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड चालू आहे. या  चित्रपटाने आपली यशस्वी वाटचाल ५ व्याआठवड्यातही सुरुच  ठेवली आहे. चित्रपटाचे यश साजरे करीत असताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या टीमने एका विशेष  सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी,तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी केलेल्याअमूल्य सहकार्याची दखल घेत ‘अल्याड पल्याड’ टीमने उपस्थित माध्यम प्रतिनिधींचा भेटवस्तू देत सन्मान केला.  या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात प्रसारमाध्यमांनी सिंहाचा वाटा उचलला हीआमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे  एस.एम.पीप्रोडक्शन्चे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी सांगितले.  रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते शैलेश जैन,महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील आता ‘अल्याड पल्याड २’ आपल्या भेटीला घेऊन येणारआहेत. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचा सिक्वेल ही रसिकांना...