पोस्ट्स

मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर.

इमेज
महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या दैदिप्यमान कलाप्रवासाबद्दल मानाचा ‘नाफा जीवन गौरव’ प्रदान करण्यात आला. नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या हस्ते हा सन्मान बहाल करण्यात आला. यावेळी नाफाच्या को-कन्व्हेनर अर्चना सराफ, रिया ठोसर, ज्येष्ठ सभासद श्री. ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रोहिणी हट्टंगडी यांनी हा सन्मान आपल्या संपूर्ण कलाप्रवासाला आकार देणाऱ्या आई-वडिलांसह गुरु इब्राहिम अल्काझी, पती जयदेव हट्टंगडी, सहकलाकार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि निर्माते यांना समर्पित केला. त्या म्हणाल्या, “मला अजून खूप काम करायचे आहे. ‘जीवन गौरव’ मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारता...

सामाजिक वास्तवाचा आरसा ठरणारा 'द महाराष्ट्र फाईल्स' आता Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध.

इमेज
समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची प्रभावी कहाणी मांडणारा 'द महाराष्ट्र फाईल्स'हा बहुचर्चित मराठी चित्रपट आता Prime Video वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवल्यानंतर आता हा आशयप्रधान चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. केवळ मनोरंजन न करता सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा 'द महाराष्ट्र फाईल्स' हा चित्रपट शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि उपेक्षित समाजाच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडतो. विशेष म्हणजे, बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा हा भारतातील पहिलाच चित्रपट असल्याने या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांसारख्या दिग्गज कला...

‘ऑल दि बेस्ट’ची अमेरिकेत भरारी.

इमेज
मराठी रंगभूमीवर गेली तब्बल ३३ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे, अनामय प्रॉडक्शन्स निर्मित आणि ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित अजरामर विनोदी नाटक ‘ऑल दि बेस्ट’ आता अमेरिकेतील मराठी रसिकांच्या भेटीला सज्ज झाले आहे. या भव्य अमेरिका दौऱ्यात नाटकाचे १७ प्रयोग विविध शहरांमध्ये सादर करण्यात येणार असून, मराठी रंगभूमीसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.   सध्या महाराष्ट्रभर ‘ऑल दि बेस्ट’चे प्रयोग प्रचंड उत्साहात आणि हाऊसफुल्ल प्रतिसादात सुरू आहेत. मयुरेश पेम, जुई बेंडखळे, निखिल चव्हाण आणि मनमित पेम यांच्या उत्स्फूर्त आणि दमदार अभिनयामुळे प्रत्येक प्रयोगाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळत आहे. या यशात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे अमेरिकेतील प्रतिष्ठित बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) यांच्या जगभर लोकप्रिय असलेल्या अधिवेशनात ‘ऑल दि बेस्ट’ची झालेली निवड. जगभरातील मराठी रसिकांना एकत्र आणणाऱ्या या प्रतिष्ठित व्यासपीठावर सादरीकरणाची संधी मिळणे ही अनामय प्रॉडक्शन्स आणि संपूर्ण कलाकार-तंत्रज्ञ टीमसाठी मोठा सन्मान आहे. ७ ऑगस्ट- सिएटल (BMM), ८ ऑगस्ट - बे एरि...

मराठी बालनाट्य दिवसानिमित्ताने बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेच्या वतीने आयोजित 'इतिहास महाराष्ट्राचा' या अत्यंत प्रेरणादायी उपक्रम.

इमेज
२ ऑगस्ट मराठी बालनाट्य दिवसानिमित्ताने बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेच्या वतीने आयोजित 'इतिहास महाराष्ट्राचा' या अत्यंत प्रेरणादायी उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरणाची प्राथमिक फेरीचे उद्‌घाटन, माटुंग्याचे यशवंत नाट्य मंदिर, बी हॉल येथे दिनांक २ ऑगस्ट रोजी बालरंगभूमी परिषद च्या अध्यक्षा व नवनिर्वाचित बृहन्मुंबई शाखा नीलमताई शिर्के - सामंत यांनी केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना, बालमनांमध्ये कलेची गोडी निर्माण करणे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि समृद्ध बालरंगभूमीचा वारसा अधिक जोमाने पुढे चालवणे हेच आमचे ध्येय असून, नाट्यसंस्कृतीच्या या पवित्र वाटेवर आपल्या लाडक्या बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालरंगभूमी परिषद नेहमीच कटिबद्ध आहे. संस्कारक्षम बालकांद्वारे उद्याची एक सशक्त आणि सुंदर नाट्यपरंपरा घडवण्याच्या या प्रवासात आपले सहकार्य आणि प्रेम हीच आमची खरी ऊर्जा आहे. यावेळी बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेच्या कार्याध्यक्ष ज्योती निसळ, उपाध्यक्ष सुनिल सागवे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरीला दिली सदिच्छा भेट.

इमेज
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दादासाहेब फाळके चित्रनगरीला सदिच्छा भेट देऊन भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाच्या 'एक झाड आईच्या नावाने' या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत चित्रनगरी परिसरात वृक्षारोपण केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून निसर्ग संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. या प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू, स्थापत्य उप अभियंता विजय बापट, विद्युत उप अभियंता अनंत पाटील, व्यवस्थापक कलागरे संतोष खामकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी (अ.का) ड...

लहानग्यांच्या निरागस आवाजात पहिल्यांदाच ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’.

इमेज
राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिने सुरू केलेल्या ‘सावनी रेकॉर्डझ’ या म्युझिक लेबलची दुसरी कलाकृती आता स्वामीभक्तांच्या भेटीला आली आहे. ‘मुजरा शिवबाला’ या पहिल्याच सादरीकरणाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ या आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे प्रकाशन करण्यात आले असून, या मंत्राची सर्वात मोठी खासियत म्हणजे पहिल्यांदाच लहान मुलींच्या निरागस आवाजातून हा प्रभावी तारक मंत्र सादर करण्यात आला आहे.    आजवर ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्रा’च्या अनेक आवृत्त्या रसिकांसमोर आल्या. मात्र त्या सर्व प्रौढ गायकांच्या आवाजात होत्या. पुढील पिढीपर्यंत अध्यात्म, संस्कार आणि भक्ती सहजपणे पोहोचावी, या उद्देशाने सावनी रवींद्रने या मंत्राला बालस्वरांचे रूप दिले आहे. त्यामुळे हा मंत्र  भक्तीचा अनुभव देतानाच मुलांच्या मनात संस्कारांची बीजही सहज रुजवतो.या अनोख्या संकल्पनेविषयी सावनी रवींद्र म्हणते, “आजवर तारक मंत्राची अनेक व्हर्जन्स युट्युबवर आली आहेत आणि ती सगळी मोठ्यांनी गायली आहेत. पण पुढच्या पिढीवर संस्कार होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ...

मामाचा गोवा सुसाट वेगात...थिएटर्सची संख्या पहिल्या आठवड्यात १७० तर दुसऱ्या आठवड्यात २००च्या वर.

इमेज
   प्रदर्शनानंतर प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या दमदार माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपटाकडे नव्या प्रेक्षकांचा ओघही वाढत असून, कॉमेडी, अॅक्शन, सस्पेन्स, भावना आणि भरपूर मनोरंजनाचा सुरेख मेळ साधणाऱ्या या चित्रपटाला ‘परफेक्ट फॅमिली एंटरटेनर’ म्हणून पसंती मिळत आहे. दैनंदिन धकाधकीतून दोन तासांचा निव्वळ आनंद देणारा हा चित्रपट अनेकांसाठी खरा ‘स्ट्रेसबस्टर’ ठरत आहे. अर्थात स्क्रीन मिळावेत या विनंतीनंतर तुरळक ठिकाणी सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या या सिनेमाच्या थिएटर्सची संख्या पहिल्या आठवड्यात १७० होती ती आता दुसऱ्या आठवड्यात २०० च्या वर गेली आहे. याचाच अर्थ प्रेक्षकांनी ‘परदेशी’ सिनेमाकडून ‘देशी’ कडे मोर्चा वळवलाय. “खऱ्या अर्थाने एंटरटेनर फिल्म,” “सुरुवातीपासून शेवटपर्यंत नुसते हसलो,” अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षक चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. चित्रपट पाहून बाहेर पडलेले प्रेक्षक आपल्या मित्र-परिवारालाही हा चित्रपट पाहाण्याची शि...