पोस्ट्स

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची वर्षपूर्ती.

इमेज
 मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींचा वारसा जपत चित्रपट रसिकांमध्ये अभिरुची निर्माण करणे, आशयपूर्ण चित्रपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सुजाण चित्रपट प्रेक्षकांची नवी पिढी घडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’ने वर्षपूर्तीचा टप्पा गाठला आहे. वर्षपूर्तीनिमित्त ६२व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावलेल्या ‘छबिला’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच चित्रपटाचा कलात्मक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून आस्वाद घेणारा प्रेक्षकवर्ग घडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास ...

‘दशमी’ या थरारक चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित.

इमेज
केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट सस्पेन्स, क्राईम, थरार आणि सामाजिक वास्तव यांची दमदार सांगड घालत प्रेक्षकांना एका वेगळ्याच सिनेमॅटिक विश्वात घेऊन जाणार आहे. ‘प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी ‘दशमी’ हा विचार केंद्रस्थानी ठेवत चित्रपटाची कथा उलगडत जाते. येत्या २३ ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला, देवी दुर्गेने महिषासुराचा संहार केला... पण आजच्या काळातील अन्यायाविरुद्ध कोण उभे राहणार? याच प्रश्नाला थरारक आणि रहस्यमय पद्धतीने भिडणारा ‘दशमी’चा प्रवास प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे. ‘दशमी’ची कथा रहस्याच्या अनेक स्तरांनी विणलेली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथानकातील प्रत्येक धागा प्रेक्षकांना वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे. नवे प्रश्न, अनपेक्षित वळणे, वाढता तणाव आणि धक्कादायक खुलासे यामुळे पडद्यावर नेमकं पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधणं कठीण होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलन'ला दिग्गज कलाकारांचा जाहीर पाठिंबा.

इमेज
​महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्म सिटी) ५९ व्या वर्धापन दिन निमित्त 'सुवर्ण महोत्सवी शुभारंभ' सोहळा दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता स्टुडिओ नंबर ०१, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर, गोरेगाव, मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन महनीय व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. ​याच महत्त्वपूर्ण पार्श्वभूमीवर, मराठी चित्रपट सृष्टीच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या 'मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आंदोलन' या अभियानाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज नामवंतांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते श्री. महेश कोठारे, अभिनेते श्री. विजय पाटकर, श्री. जयंत वाडकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविताताई मालपेकर यांनी या आंदोलनाला आपला मोलाचा व जाहीर पाठिंबा दिला आहे. ​मराठी चित्रपट सृष्टीसमोरील विविध प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी 'मराठी फिल्म इंडस्ट्री बचाओ आं...

‘आदि अनंत’ जेजुरीत खंडोबाचा आशीर्वाद घेत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

इमेज
काही नाती आपल्याला नशिबाने मिळतात, तर काही आपण कमावतो ... नात्यांमधल्या प्रेमाची, सहवासाची, आणि भावनांची गोष्टं हसत खेळत , धमाल करत सांगणाऱ्या ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले. जेजुरी येथे श्री खंडोबाचे आशीर्वाद घेत पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं. एका व्यक्तीच्या कुशीत दुसऱ्याने विसावलेलं हे दृश्य परस्परांवरील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधाराची जाणीव करून देतं.  त्यामुळे ‘आदि अनंत’ नेमक्या कोणत्या नात्याची गोष्टं सांगणार, याची उत्सुकता पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे.  ह्या दोघांची जोडगोळी असल्यामुळे धमाल ही असेल हे काही वेगळं सांगायला नको ... या चित्रपटात अशोक सराफ व संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर असे दमदार कलाकार पाहायला मिळणार आहे.  आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणसं जवळ असूनही त्यांच्यातलं भावनिक अंतर वाढतंय. अशा वेळी आपल्या माणसांचा सहवास, त्यांचं प...

"सहल" चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित.

इमेज
शाळेची सहल म्हणजे धमालमस्ती आणि गमतीजमती... शाळेच्या सहलीशी संबंधित एक मनोरंजक कथा सहल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, ९ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर असून, सहनिर्माते मुकुंद वसंत खुपेरकर आहेत. मूळ पटकथा मुकुंद वसंत खुपेरकर यांनी लिहिली आहे. ‘सहल’मध्ये देविका दफ्तरदार यांच्यासोबत सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर, प्रज्वल सुतार, सेजल कोरे, सचिन मोरे, शिवाजी पाटील, रवि कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धेश मुकुंद खुपेरकर याचे या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य नायक म्हणून पदार्पण असून त्याने याआधी झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका "तुझ्यात जीव रंगला" ह्यामध्ये लहान राणाच्या भावाची म्हणजेच सुरजची भुमिका साकारली होती, तसेच डॉ केशव हेगडेवार ह्यांची बाल भुमिका ही साकारली होती.चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यानी केल...

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा दिमाखदार शुभारंभ.

इमेज
महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीसह भारतीय चित्रपट आणि दृक्-श्राव्य क्षेत्राला गेली पाच दशके भक्कम पायाभूत सुविधा आणि निर्मितीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा दिमाखदार शुभारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात चित्रनगरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण, सुवर्ण महोत्सवी गीताचे लोकार्पण तसेच चित्रनगरीच्या पाच दशकांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणाऱ्या दृक्-श्राव्य चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी चित्रनगरीच्या पाच दशकांच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे, ऐतिहासिक क्षण अधोरेखित करणाऱ्या कॉफीटेबल बुकचे तसेच 'चित्रपताका' नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात चित्रनगरीच्या विकासात तसेच मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या विविध निर्मिती संस्थांचा सन्मान करण्यात आला.  या प्रसंगी सांस्कृतिक कार्य ...

सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत 'पाच फुटाचा बच्चन' चित्रपटाचा ट्रेलर लाँच.

इमेज
कीर्तनातून प्रसिद्धीस आलेल्या एका तरुणीची गोष्ट सांगणाऱ्या 'पाच फुटाचा बच्चन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या  प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरला भरभरून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट ९ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. 'पाच फुटाचा बच्चन' या चित्रपटात तरूण कीर्तनकार मुलीची गोष्ट आहे. तिच्या कीर्तनात कोल्हापुरी भाषा आहे.  संतांचे अभंग तिला मुखोद्गत आहेत. जनमानसात तिचं प्रचंड नाव आहे.  उंचीने पाच फूट असलेल्या या तडफदार मुलीला 'पाच फुटाचा बच्चन' म्हणून ओळखलं जातं. या प्रमुख भूमिकेतून श्रुती मधुदीप ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. यात तगड्या कलाकारांची फौज आहे. मराठी मनाला भावणाऱ्या कीर्तन या विषयाला हा सिनेमा साद घालतो आहे, असं दिसतं आहे. अवघ्या अडीच मिनिटाचा हा ट्रेलर अत्यंत नाट्यमय असून त्यातील दृश्यांनी प्रेक्षकांची मने...