Posts

Showing posts from December, 2022

बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिर्याणी' लवकरच येणार भेटीला.

Image
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता प्रेक्षकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात पूर्ण झाले असून आता लवकरच 'घर बंदूक बिर्याणी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असून  येत्या नवीन वर्षात ‘घर बंदुक बिर्याणी’ प्रदर्शित होणार आहे.  एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.  झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.  टीझर पाहता

आयएमडीबीवर ९.७ रेटिंग मिळवत 'वी२' चित्रपटाचा धमाका.....

Image
काही चित्रपट कोणताही गाजावाजा न करता येतात आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत धमाका करतात. असे चित्रपट पाहण्यासाठी मग सर्वांचीच उडी पडते. डिजिटल विश्वात मराठीचा डंका वाजवणाऱ्या 'वी२' या चित्रपटानेही अशीच काहीशी दिमाखदार कामगिरी करत रसिकांसोबतच संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. रसिकांच्या पसंतीच्या परिमाणात मोजमाप करून कलाकृतींना रेटिंग देणाऱ्या आयएमडीबी या आघाडीच्या वेबसाईटवर 'वी२' या चित्रपटाला ९.७ रेटिंग देण्यात आलं आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या 'वी२' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या टिमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'वी२' हि ५५ मिनिटांची वेब फिल्म आहे. दोन आठवड्यांपूर्वी ही फिल्म अॅमेझॅान प्राईमवर रिलीज झाली. या अंतर्गत युके, युएस, जपान आणि जर्मनीमधील प्रेक्षकांनी हि फिल्म पाहिल्यानंतर तिचं भरभरून कौतुक केलं. मागच्या आठवड्यात हि फिल्म एमएक्स प्लेअरवर भारतातही रिलीज झाली आहे. आयएमडीबीवर ९.७ रेटिंग मिळाल्यानं संपूर्ण टिमचा उत्साह वाढला आहे. प्रेक्षकांकडून होणाऱ्या कौतुकाबाबत आभार

‘बांबू’चित्रपटातून वैष्णवी कल्याणकरचे मोठ्या पडद्यावर पदार्पण

Image
विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर. अल्पावधितच वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे केले. आता वैष्णवी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही 'झुळूक' तरुणांना भावणारी आहे.        आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल वैष्णवी कल्याणकर म्हणते, '' मोठ्या पडद्यावर मी पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळे आनंदी, उत्साही, थोडीशी धाकधूक अशा विविध भावना सध्या मी अनुभवतेय. यात मी 'झुळूक'ची व्यक्तिरेखा साकारतेय, जी खूपच सोज्वळ, निरागस आहे. तरुणींना ही व्यक्तिरेखा आपल्या खूप जवळची वाटेल. जणू काही ही आपल्याच घरातली आहे, असे वाटेल. एका मालिकेदरम्यान मी 'बांबू'मधील 'झुळूक'साठी ऑडिशन दिले होते. माझी निवड झाली आणि प्रॉडक्शनकडून मला एकदा सकाळी सात वाजता पुण्याला बोलवले. आमची ही मीटिंग सुमारे पाच तास चालू होती. त्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरु झा

'साथ सोबत'चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित .

Image
टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच उत्कंठा वाढवणाऱ्या 'साथ सोबत' या आगामी मराठी चित्रपटचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांना नेमकं काय पहायला मिळणार याचे संकेत देणारा आणि खऱ्या अर्थानं 'साथ सोबत'ची ओळख करून देणारा असा हा ट्रेलर आहे. १३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'साथ सोबत'च्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम केलं आहे. नेटकऱ्यांकडून ट्रेलरचं कौतुक होत असून, अत्यंत कमी वेळेत या ट्रेलरला खूप लाईक्स मिळत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी 'साथ सोबत'चा ट्रेलर शेअर करत चित्रपटाच्या टिमचा उत्साह वाढवला आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये 'साथ सोबत'चा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला कलाकार-तंत्रज्ञांसह काही मान्यवरांनीही हजेरी लावली. प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच लेखनही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवलेले द

अस्तित्व, ‘पारंगत सन्मान’ गौरव एकांकिकांचा.......

Image
रंगभूमीचा पाया समजला जाणाऱ्या ‘एकांकिका’ या नाट्यप्रकारात मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग सातत्याने होत असतात,या प्रयोगांचे मूल्यमापन एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून होत असते. ‘स्पर्धा’ हा शब्द आला कि टोकाचा संघर्ष हा अपरिहार्यच. त्यामुळे एकांकिका क्षेत्रातल्या सृजनशील मंडळीमध्ये एकप्रकारचा दुरावा निर्माण होतो, वर्षभरातल्या सर्वोत्तमांच्याही स्पर्धा भरवल्या जातात पण तिथे ही दुफळी अधिकच वाढते,या परिस्थितीचा विचार करून या सर्व नव्या दमाच्या रंगकर्मींना एकत्र आणून स्पर्धेशिवाय त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा खेळीमेळीच्या वातावरणात आढावा घ्यावा या हेतूने ‘अस्तित्व’ या मुंबईतल्या प्रयोगशील नाट्यसंस्थेतर्फे एकांकिका क्षेत्रातल्या गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी अस्तित्व आयोजित मोरया इव्हेंटस् अँड एंटरटेनमेंट सहआयोजित 'आयरिस प्रॉडक्शन्स पारंगत सन्मान -२०२३'चे आयोजन केले जाते.        विशेष म्हणजे २००९ पासून सुरु असलेल्या या पुरस्कारांवर नाव कोरणारी सर्वच मंडळी सिनेमा,मालिका, नाट्यक्षेत्रात पारंगत ठरली आहेत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सादर झालेल्या एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट

रविकिरणच्या बालनाट्य स्पर्धेत "ध्येय्यधुंद" सर्वोत्कृष्ट.

Image
नुकतीच रविकिरण संस्थेची ३६वी बालनाट्य स्पर्धा रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला या वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. वेळेअभावी उशिरा आलेल्या काही प्रवेशिका नाईलाजाने नाकाराव्या लागल्या. या स्पर्धेचे उद्घाटन पु. ल. अकादमीचे डायरेक्टर, श्री. संतोष रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभाला ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नागेश नामदेव वांद्रे यांनी केले. श्री वांद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षीची स्पर्धा डॉ. के. एम. एस. शिरोडकर हायस्कुलचे शिक्षक स्मृतिगत ज्योतीराम कदम सर यांच्या नावे घेतल्याचे सांगताना अशा प्रकारची स्पर्धा रविकिरण मंडळाने घ्यावी असे १९८४ साली  कदमसरांनीच सुचविल्याचे सांगितले. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्योतीराम कदम सरांनी लिहिलेल्या बालनाट्यांची पुस्तके मंडळातर्फे प्रत्येक शाळा/संस्था प्रतिनिधींना मोफत वाटण्यात आली. रवींद्र नाट्य मंदिराचे लाईट्मन, गेटकिपर, नेपथ्य व्यवस्थापक यांच्या हस्ते या पुस

नवीन वर्षात मनोरंजनाचे धमाकेदार सरप्राईज २०२३ मध्ये मिळणार प्लॅनेट मराठीवर रिॲलिटी शोची मेजवानी

Image
        प्लॅनेट मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम कलाकृती, नवनवीन विषयांवरील चित्रपट, वेबसीरिज, लघुपट, बहारदार गाणी यांसारखी मनोरंजनाची मेजवानी आणत असते. अल्पावधीतच प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या एका वर्षात प्लॅनेट मराठीने खूप मोठा पल्ला पार केला. २०२२ मध्ये प्लॅनेट मराठीने अनेक रेकॉर्डब्रेक चित्रपट, वेबसीरिज, गाणी, लघुपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले.  ६८व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘गोष्ट एका पैठणीची’ 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा मानकरी ठरला तर ‘सुमी’ने सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' म्हणून पुरस्कार मिळवला. तसेच यावर्षी सुपरहिट ठरलेले ‘चंद्रमुखी’, ‘तमाशा लाईव्ह’, ‘सहेला रे’ सारखे दर्जेदार चित्रपट असो किंवा ‘अनुराधा’, ‘मी पुन्हा येईन’, ‘रानबाजार’, ‘अथांग’ यांसारख्या सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असो. हे सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना आणि वेबसीरिजना खूप प्रेम दिले. २०२२ प्रमाणेच प्लॅनेट मराठी आता २०२३ मध्येही प्रेक्षकांसाठी अनेक वेब शो, चित्रपट, लघुपट आणि काही खास सरप्राईज घेऊन येण्यास सज्ज झा

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नाकर पिळणकर यांचा "ज्योत से ज्योत जगाते चलो" २९ डिसेंबर रोजी रात्रौ ८ वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे.

Image
रत्नाकर पिळणकर यांच्या "प्रतिष्ठा", निर्मितीच्या वतीने, गुरुवार दिनांक २९ डिसेंबर रोजी रात्रौ ८ वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे एक सामाजिक जागृतीची संकल्पना घेऊन "ज्योत से ज्योत जगाते चलो" या शीर्षकाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे ज्या कार्यक्रमात हिंदी सिनेमातील लोकप्रिय प्रार्थना, भक्तीगीते, संस्कार गीते, देशभक्तीपर गाणी आणि संदेश गीते सादर केली जाणार आहेत. "ज्योत से ज्योत जगाते चलो" या कार्यक्रमाचा उद्देश विश्वशांतीसाठी आणि देश बांधवांच्या सुरक्षेसाठी सामूहिक चिंतन असे असणार आहे. ही अभिनव संकल्पना रत्नाकर पिळणकर यांची असून प्रज्ञा देसाई, सेजल मराठे, डॉ.अंजली धामण-गावकर तसेच नितीन डिस्कळकर, जयंत पिंगुळकर आणि किरण शेंबेकर ही गाणी सादर करणार आहेत. वाद्यवृंद संयोजन प्रसाद पाथरे,दीपेश गवाणकर यांचे असून, प्रवेश मूल्य रुपये १०० ऐच्छिक स्वरूपाचे आहे. तसेच विनामूल्य प्रवेशही दिला जाणार आहे.  सन्मानिकांसाठी ईच्छुकांनी,९६१९२८७८४८ या मोबाईलवर संपर्क साधावा. अधिकाधिक रसिकांनी हा कार्यक्रम पाहून जुन्या वर्षाला निरोप व नव्या 2023 सालाचे स्वागत करावे तसे

‘सुर्या’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण.

Image
अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन नायक नायिकेमधील  रोमान्स  आणि त्याला खटकेबाज संवादाची  फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘सुर्या’ हा चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित ‘सुर्या’  या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. असत्याविरुद्ध सत्याचा लढा, त्याला नायक-नायिकेच्या प्रेमाची फोडणी ‘मनोरंजनाचं पॅकेज’ असलेल्या ‘सुर्या’ या चित्रपटातून प्रेमाचा त्रिकोण ही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्रसाद मंगेश, रुचिता जाधव, देवशी खंडुरी हे युवा चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत. सळसळत्या रक्ताचा आणि तळपत्या ज्वालांचा अंगार.. 'सुर्या'… अशा जबरदस्त टॅग लाईनसह प्रसाद मंगेश हा नवोदित अभिनेता या चित्रपटात नायकाच्या रूपात आपला धमाका दाखविण्यास सज्ज झाला आहे. अॅक्शनने ठासून भरलेला' ‘सुर्या’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमा

‘जग्गू आणि जुलिएट’, तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी......

Image
‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला 'जग्गू आणि जुलिएट' हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला आपल्या भेटीस येतोय. पुनीत बालन निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटात नक्की कोणती जोडी असेल, याचा अंदाज प्रेक्षक बांधत होते, मात्र प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांची भन्नाट जोडी या चित्रपटात दिसत आहे. तसेच मोशन पोस्टरचे अजय-अतुल यांचे म्युझिक ऐकून तरुणाई आणि तमाम रसिक प्रेक्षक त्यावर थिरकतील. अमेय आणि वैदेही जावा बाईकवर बसलेत, वैदेही बेधडकपणे गाडी चालवत आहे आणि अमेय मागे गाडीवर उभा आहे. अंगात रंगीबेरंगी जॅकेट, गळ्यात सोन्याची साखळी आहे ज्यावर ‘Rich’ असं लिहिलंय. तर वैदेही तिच्या लेदर जॅकेट, गॉगल आणि बिनधास्त स्माईलने सगळ्यांना घायाळ करत आहे. या जोडीचे फॅन आता पुन्हा एकदा हे दोघं काय धमाल करतात हे बघण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचं कलर

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मानित.

Image
‘शिवराय  अष्टक’  जगणाऱ्या  साकारणाऱ्या कलाकार,  तंत्रज्ञ  आणि  संपूर्ण  युनिटबरोबर  चित्रीकरण स्थळी  ‘गुरुकुल’  पुरस्काराने  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा  सन्मान  करण्यात आला. यावेळी बोलताना हा  दुर्मिळातील  दुर्मिळ  योग असल्याचे  प्रतिपादन  चित्रपटसृष्टीचे  पितामह  ज्येष्ठ दिग्दर्शक  राजदत्त  यांनी  केले.  आद्य  संगीताचार्य बाळकृष्णबुवा  इचलकरंजीकर  यांच्या  घराण्याचा  आशीर्वाद  म्हणून  विश्वरूप कन्सेप्ट  डेव्हलपर्स आणि डेक्कन  एज्युकेशन   सोसायटीच्या  फिल्म आणि  टेलिव्हिजन  इन्स्टिट्यूटतर्फे  श्री राजदत्त यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.    मावळातील कुसगाव येथील पीबीए  फिल्मसिटीत शूटिंग दरम्यान हा  सोहळा  संपन्न  झाला. याप्रसंगी  दिग्पाल लांजेकर यांचे गुरु ज्येष्ठ लोकशाहीर दादा पासलकर, दिग्पाल यांच्या मातोश्री सुनीता लांजेकर, ज्येष्ठ रंगकर्मी  सुहास भोळे, अभिनेते  चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मिलिंद कांबळे, संकलक भक्ती मायाळू, योगेश फुलफगर आणि  युनिटचे तंत्रज्ञ, कलाकार उपस्थित होते. प्रस्तावना व सूत्रसंचालन  माध्यमकर्मी गिरीश केमकर यांनी केले तर मान

ललित प्रभाकर प्रथमच दिसणार टेरर अंदाजात....टर्री...

Image
तरुण रक्तात नेहमीच एक चैतन्य सळसळत असतं. काहीतरी करून दाखविण्याची धमक या वयात नसानसांमध्ये भिनलेली असते. आयुष्यातला असा काळ ज्यात  प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छा असते. चुकीचं घडताना त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद असते. हाच अंदाज आपल्याला अभिनेता ललित प्रभाकरच्या रूपाने आगामी 'टर्री या मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे.           'टर्री’ हा शब्द पाळणारा, खरी मैत्री जोपासणारा..कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा पण गरम रक्ताच्या 'टर्री’ मध्ये हळवेपणा आहे. अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात 'टर्री’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ललित प्रभाकर प्रथमच अशा ‘टेरर स्वॅग’ मध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.            त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री..! त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय...टर्री!!! असा जबरदस्त स्वॅग घेऊन 'टर्री’ चित्रपटाचं बेधडक रांगडं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘ऑन युव्हर स्पॉट आणि फॅन्टासमागोरिया फिल्म्स यांच्या सहयोगाने 'टर्री'

संदेश जाधव यांचा पोलीसी खाक्या ‘यू मस्ट डाय' नाटकातून रंगमंचावर प्रथमच साकारली पोलिसांची भूमिका......

Image
अमुक एक भूमिका करायला मिळणं हे नशिबात असावं लागतं. तर काही भूमिका कलाकाराला वेगळी ओळख मिळवून देतात.  पोलिसांची भूमिका म्हंटली की काही ठराविक नाव आपसूक डोळ्यासमोर येतात. अभिनेता संदेश जाधव हे त्यापैकीच एक.  आजवर चित्रपट व मालिकांमधून त्यांनी पोलिसांच्या भूमिका यशस्वीपणे वठवल्यात. आता रंगमंचावर ही त्यांचा पोलीसी खाक्या पहायला मिळतोय. 'यू मस्ट डाय' या सस्पेन्स थ्रिलऱ नाटकातील त्यांची इन्स्पेक्टरची  भूमिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे आजवर असंख्य वेळा पोलिसांची भूमिका करणारे संदेश रंगमंचावर प्रथमच पोलिसांच्या भूमिकेत दिसतायेत.   आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना संदेश सांगतात की, चित्रपट व मालिकांमधून पोलिसांची भूमिका करून एक ठपका पडला होता निदान नाटकात पोलिसांची भूमिका करायची नाही असं ठरवलं होतं. मध्यंतरी व्यावसायिक नाटकांसाठी पोलिसांच्या भूमिकेची विचारणा झाली, पण मी नकार दिला. मात्र 'यू मस्ट डाय’ या नाटकाची कथा आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत काम करायला मिळतंय या गोष्टीने मी रंगमंचावर पोलिसाची भूमिका करायला मला भाग पाडलं.   रंगमंचावर लाईव्ह परफॉर्मन्स

अदिती आणि आस्तादला परदेशातून चर्चेचं आवताण.

Image
राजकीय आणि सामाजिक वक्तव्यावरून घडणाऱ्या चर्चा याचे उलट सुलट प्रतिबिंब समाजात उमटत असते.  कित्येकदा या चर्चा उलथापालथ करणाऱ्या ठरल्या आहेत. वेगवेगळ्या चर्चांनी सध्या देशातील वातावरण चांगलंच गढुळलेलं आहे. त्यात आता 'पठाण' मधील गाण्यावरून 'रंगासंगे युद्ध आमचे सुरु' हा चर्चेचा नवा अंक रंगत असताना मराठी रंगभूमीवरील एका चर्चेने प्रेक्षकांना खडबडून जागं केलं आहे. अगदी परदेशातही या चर्चेची दखल घेतली आहे. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर या त्रयीचं चर्चा तर होणारच या नाटकाच्या प्रयोगांना परदेशातील नाट्य रसिकांकडून नाटकाच्या प्रयोगासाठी खास आवताण देण्यात आलं आहे. अमेरिका, सिंगापूर, दुबई येथील महाराष्ट्र मंडळाकडून हे आमंत्रण देण्यात आलं आहे.  नाटकाचे अधिकाधिक प्रयोग परदेशात व्हावे अशी इच्छा परदेशातील नाट्यरसिक व्यक्त करत आहेत. परस्पर विचारसरणीच्या विरोधात दंड थोपटून उभ्या असलेल्या दोन कार्यकर्त्यांची गोष्ट या नाटकात आहे . एका सामाजिक पुरस्काराच्या निमित्ताने मुद्दाम झडविल्या गेलेल्या वैचारिक जुगलबंदीत कोण, कसे डावपेच खेळतात याची रंगतदार मांडणी केलेलं ना

'अद्वैत थिएटर्स'च्या पंचविसाव्या नाट्यकृतीचा पंचविस डिसेंबरला शुभारंभ..... 'थँक्स डियर' रंगभूमीवर...

Image
       वर्षभर ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहाय्य केले असेल, त्यांना 'थँक्स डियर' म्हणत वर्षअखेरीस आभार मानले जातात. हेच 'थँक्स डियर' आता वेगळ्या रूपात रंगभूमीवर अवतरत आहे. मोरया थिएटर्स, अद्वैत थिएटर्स व सर्वस्य प्रॉडक्शन या नाट्यसंस्थांचे निर्माते भाऊसाहेब भोईर, राहुल भंडारे व श्रद्धा हांडे यांनी संयुक्तरित्या या नाटकाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत लोकप्रिय नाट्यकृती रंगभूमीवर आणणाऱ्या 'अद्वैत थिएटर्स'चे हे २५ वे नाटक आहे; तर अभिनेत्री श्रद्धा हांडेने या नाटकाद्वारे नाट्यनिर्मितीत पदार्पण केले आहे.          २५ डिसेंबर रोजी 'थँक्स डियर' या नाटकाचा पुण्यात शुभारंभ होत असून, ३१ डिसेंबरला मुंबईत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन निखिल रत्नपारखी व तुषार गवारे यांनी केले आहे. निखिल रत्नपारखी व हेमांगी कवी हे कलाकार या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. श्रद्धा हांडे यांची वेशभूषा, उलेश खंदारे यांची रंगभूषा व गंधार यांचे संगीत, अशी टीम या ना

प्रेमात अभिनयचे लागणार ‘बांबू’,,........ ‘बांबू’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Image
प्रेमाचा इतिहास काय सांगतो, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला तर कोणाचा तरी खांदा लागतोच. हीच ओळ अधोरेखित करणारा विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या भन्नाट सिनेमाचे टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शनची असून तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. तर ‘बांबू’चे लेखन अंबर हडप यांनी केले आहे.  टीझरमध्ये  अभिनयच्या खांद्यावर अनेक मुली येऊन रडत आहेत. डोळे, नाक, कान पुसत आहेत. मात्र त्याच्या आयुष्यात अजून कोणीच मुलगी आलेली दिसत नाही. आता त्याच्या आयुष्यात कोणी मुलगी येणार की, त्याचेही ‘बांबू’ लागणार. हे २६ जानेवारीला कळणार आहे. या टीझरमध्ये सर्वात लक्षवेधी ठरत आहेत, त्या टीझरच्या शेवटी असलेल्या संस्कृत ओळी. आता याचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘बांबू’ची खासियत म्हणजे यात अभिनय बेर्डे नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनयचा

'भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ' लघुपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित

Image
    प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा नजराणा आणत असते. दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज, सांगितिक मैफल असे मनोरंजनाचे विविध पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध आहेत. इथे प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट विषयांचे लघुपटही पाहायला मिळतात. प्लॅनेट मराठी ओटीटीने उत्तम दर्जाचे आणि अनेक पुरस्कार प्राप्त केलेले लघुपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले आहेत आणि प्रेक्षकांनी या लघुपटांचा आनंद लुटला आहे. आता असाच 'भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ' नावाचा रहस्यमय आणि सामाजिक संदेश देणारा लघुपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.  नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तिचे आयुष्य अखेर कोणत्या वळणावर जाते, यावर भाष्य करणारा हा लघुपट आहे. आता नशेत गुरफटलेला हा तरूण कसा बाहेर येतो, हे आपल्याला लघुपट पाहिल्यावरच समजेल.  प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सर्व प्रकारचा कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. लघुपट हा त्याचाच एक भाग आहे. उत्तमोत्तम लघुकथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक सं

सामाजिक कार्यासाठी नूतन गुळगुळे यांचा 'अवर नॉर्थ ईस्ट (O.N.E.) वन इंडिया अवॉर्ड' २०२२' ने गौरव!

Image
  खर तर दिव्यांग या शब्दाचा अर्थ कोणाला विचारला तर तो पटकन कोणाला सांगता येणार नाही. पण 'अपंग'चा अर्थ सहज कोणीही सांगू शकेल. शरीराने विकलांग असलेली व्यक्ती म्हणजे अपंग. इतरांच्या मदती शिवाय काहीही करता येत नाही, अश्या 'अपंगांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी लढाऊ 'माय' अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होत असलेल्या सौ. नूतन गुळगुळे (संस्थापक अध्यक्षा नूतन गुळगुळे फाऊंडेशन) यांचा त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्यासाठी 'माय होम इंडिया' या संस्थेने 'वन इंडिया अवॉर्ड - २०२२' देऊन सन्मान केला. नुकताच मुंबई येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा हा सन्मान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मा. श्री पेमा खांडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला विशेष उपस्थितांमध्ये अरूणाचल विकास परिषदेचे अध्यक्ष तेची गुबिन, भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर उपस्थित होते.   "नूतन गुळगुळे या मातेचा प्रेरणादायी प्रवास थक्क करणारा आहे. स्वतःच्या जन्मजात दिव्यां

पाण्याखालचं विश्व दाखवणाऱ्या 'गडद अंधार'चा रोमांचक टिझर प्रदर्शित ...

Image
पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अवतार : द वे आॅफ वॅाटर' या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. पाण्याखालचं अद्भुत आणि रहस्यमय विश्व दाखवणारा 'गडद अंधार'चा टिझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबतचं कुतूहल जागं करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सिनेप्रेमींद्वारे 'गडद अंधार'चा टिझर शेअर करण्यात येत आहे. इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी 'गडद अंधार' या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'गडद अंधार' या अनोख्या टायटलमुळे चर्चेत असलेल्या या थ्रिलरपटाचा टिझ

अमृताची घायाळ करणारी नखरेल अदा......

Image
अभिनेत्री अमृता पत्की हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. २००६च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने २०१०मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली ही गुणी अभिनेत्री आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.  सध्या मराठी चित्रपटात बॉलीवूड तारका आयटम साँगवर थिरकताना दिसतायेत. या यादीत अमृताचाही समावेश झाला आहे. अमृता पत्की हिच्या नृत्याचा जलवा ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.  ‘रापचिक रापचिक कोळीणबाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात अमृताचा नखरेल अंदाज पहायला मिळणार आहे. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संतोष दरेकर, मंगेश ठाणगे, देव चौहान यांनी लिहिलेल्या गाण्याला देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. ममता शर्मा आणि देव चौहान यांनी आपल्या दमदार आवाजात हे

एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षांवर भाष्य करणारा 'मुसंडी' चित्रपट ५ मे ला प्रदर्शित.

Image
समृद्ध आशय आणि विषय घेऊन मराठीत अनेक चित्रपटांची निर्मिती होऊ लागली आहे. स्पर्धा परीक्षांचा ताण आणि त्यातील आव्हाने हा सध्या अत्यंत कळीचा मुद्दा ठरू पाहतोय. प्रामाणिक कष्टानंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा बळावलेली असते. अशावेळी मनोधैर्य उंचावण्याची  आणि अमूल्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हा विषय केंद्रस्थानी ठेऊन  दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी 'मुसंडी'  या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा  परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा अमुक एक ‘पॅटर्न’ नसतो. तीव्र इच्छाशक्ती, ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत करण्याची तयारी, मिळालेल्या अपयशामुळे खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभं राहून कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण असतील तर यशाची  'मुसंडी' मारता येऊ शकते हे दाखवणारा सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत आणि गोवर्धन दोलताडे लिखित व निर्मित 'मुसंडी'   हा  चित्रपट ५ मे २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात प्रमुख  भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळ

ईशा-ओंकारची मोठ्या स्क्रिनवर कमाल, ‘सरला...’चा टिझर रिलीज.

Image
‘सरला एक कोटी’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडेच रंगात असताना, प्रेक्षकांना प्रतिक्षा होती, ती म्हणजे टिझरची! त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच आज टिझर रिलीज झालाय आणि तो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरला एक कोटी’ हा चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाचा विषय काय असेल, ओंकार आणि ईशा कोणत्या रूपात आपल्याला बघायला मिळतील याची प्रेक्षक वाट बघत होते, आज ती प्रतिक्षा संपली आहे. पत्त्यांचा गॅम्बलर असलेला भिका (ओंकार भोजने) आणि सौंदर्याची खाण असलेली सरला (ईशा केसकर) यांचं नवीनच लग्न झालंय. आपल्या सासूसोबत (छाया कदम) आणि नवऱ्यासोबत राहणाऱ्या सरलावर गावातल्या लोकांची वाईट नजर आहे. अशात गरीब घरातला आणि पत्त्यांचा नाद असलेला भिका थेट बायकोलाच म्हणजे, सरलाला पत्त्याच्या डावावर लावणार का, अन् पुढे काय गेम सुरू होणार... हे बघण्यासाठी थिएटरातच जावं लागेल! टिझरमध्ये कलाकारांची मोठी फौज दिसतेय कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा, अभिजीत चव्हाण, विजय निकम, यशपाल सरताप हे कलाकार टिझरमध्ये वेगवे

झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'धोंडी-चंप्या - एक प्रेमकथा'ला पुरस्कार .

Image
रांची येथे झालेल्या पाचव्या झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'धोंडी-चंप्या - एक प्रेमकथा'चे निर्माता सुनील जैन यांना 'बेस्ट रिजनल फिल्म मेकर' या या पुरस्काराने गौरवण्यात आले. धोंडी आणि चंप्याची अनोखी प्रेमकहाणी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे असून या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.  पुरस्कार मिळाल्याबद्द्ल  निर्माता सुनील जैन म्हणतात, '' हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा आहे. पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे असणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. त्यामुळेच या पुरस्काराचे मानकरी होता आले. त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. गावातील दोन मोठे प्रस्थ ज्यांच्यात वैमनस्य आहे आणि त्यांचेच पाळीव प्राणी जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात, हे प्रेम जुळवून आणताना या शत्रूंची मुलेही एकम

ओजस जोशी यांचं ‘शोधूया’ गाणं प्रकाशित......

Image
गाण्यातून झळकणारा उत्साह ताल धरायला भाग पाडतो तसाच मनातील भाव-भावनांचा सूर ही गाण्यातच सापडतो. आशेचा असाच सूर घेऊन गायक डॉ. ओजस जोशी ‘शोधूया’ हे  नवं गाणं घेऊन आले आहेत. या गाण्याच्या माध्यमातून एक छानशी संगीत मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या हस्ते हे गाणं नुकतेच प्रकाशित करण्यात आले. 'शोधूया शोधूया आनंदाच्या वाटा' असे बोल असणारं हे गाणं नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येकाला उभारी देणारं असेल. या गाण्याचा अनोखा अंदाज आजच्या तरुणाईसाठी विशेष ठरेल, असा विश्वास गायक डॉ. ओजस जोशी व्यक्त करतात. ‘मनोरंजनाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम होणं गरजेचं आहे. ते काम डॉ. ओजस जोशी हा युवा गायक आपल्या गाण्यांतून सातत्याने करत आहे. आपल्याकडे अशा अनेक समस्या आहेत, ज्याविषयी उघडपणे बोललं जात नाही, असे विषय मनोरंजनाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात, ओजस ते सातत्याने करतो आहे. ही  नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत संगीतकार सलील कुलकर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तरुणाईला दिशा देण्याचा ओजसचा हा प्रयत्न स्तुत्य असून भविष्यात अजून चांगली गाणी तो करेल असा मल

'वेड लावलय' गीत लवकरच येत आहे ... आपल्या भेटीला.....

Image
वेड चा स्वॅग आता अजून दमदार कारण  वेड लावायला आता सलमान भाऊ येत आहेत ... रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाची उत्स्कुता प्रचंड वाढली आहे . या चित्रपटातील  ' वेड तुझा 'आणि  ' बेसुरी' या दोन्ही गीतांना रसिकांनी डोक्यावर घेतले आणि आता 'वेड लावलय'  हे गीत लवकरच प्रदर्शित होत आहे . अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गीते संगीतबद्ध केली आहेत .  मुंबई फिल्म कंपनीने  "देश म्यूजिक”  म्युझिक लेबल द्वारे संगीत प्रकाशित केले आहे .

‘सुर्या’ चित्रपटाचा धमाकेदार संगीत अनावरण सोहळा.

Image
समाजातील विघातक प्रवृत्ती जेव्हा वरचढ ठरते तेव्हा, त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी एक नायक पुढे यावा लागतो. नैतिकतेचा बुरखा चढवून काही समाजकंटक चुकीच्या गोष्टी घडवून आणत असतात. त्यांच्या या कृत्याविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुर्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक ‘सुर्या’ कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी दाखविणारा ‘सुर्या’ हा मराठी चित्रपट ६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित ‘सुर्या’  या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. ‘सुर्या‘ चित्रपटाच्या माध्यमातून मी कथानायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पदार्पणातच असा अॅक्शनने भरलेला चित्रपट मिळाल्यामुळे माझे पदार्पण दमदार होणार आहे यापेक्षा दुसरी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही’ असा आनंद प्रसाद मंगेश यांनी व्

19 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता.

Image
यंदाच्या 19 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात इराणच्या 'ओपन सिजन' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२२ चा १९ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव १२ ते १८ डिसेंबर २०२२ या सप्ताहात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडला.          महोत्सवाचा सांगता समारंभ 'पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव श्रीमती. विद्या वाघमारे' यांच्या उपस्थितीत पार पडला.  या महोत्सवात इराण, श्रीलंका, मलेशिया, युनायटेड स्टेट्स, बांगलादेश, मराठी, बंगाली, आसामी, कोंकणी, गुजराती, पंजाबी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधील आणि देशांमधून  मोठ्या प्रमाणात फिचर आणि शॉर्ट फिल्म च्या इंट्री आल्या होत्या. त्यामधून निवडक ३५ फिचर फिल्म आणि ३० लघुपटांचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात आले.         या महोत्सवात  लघुपटांपैकी इराणच्या 'ओपन सिजन'  या मोहम्मद हसानी दिग्दर्शित लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द्वितीय पारितोषिक मयुर धामापुरकर दिग्दर्शित 'मोगरा' या मराठी लघुपटाला

भोजनेची सरला कोण? गुपित उलगडलं...

Image
सरला एक कोटी... या नावातच वेगळेपण आहे. नावावरून हा चित्रपट काय असेल, कसा असेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही... या चित्रपटाचं नावंच इतकं भन्नाट आहे तर, यातील कलाकार किती हटके असतील? नुकतंच या चित्रपटातील मुख्य कलाकार ओंकार भोजनेचं पोस्टर रिलीज झालं आणि क्षणात सगळीकडे व्हायरल झालं. यानंतर चित्रपटाच्या नावावरून त्यातली सरला नक्की कोण असे प्रश्न विचारले जात होते, वेगवेगळे अंदाज बांधले जात होते, अशातच आज सरला कोण आहे हे गुपित उलगडलंय... ‘देवा ब्राह्मणाच्या साक्षीने साता जन्माचे वचन दिलंय’ अशी टॅगलाईन असलेलं सरलाचं पोस्टर आज सर्वांसमोर आलंय आणि ही सरला म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री ईशा केसकर आहे. कायम बबली, क्यूट गर्लवाल्या भूमिका साकारणारी ईशा या चित्रपटात ग्रामीण बाजातील लूकमध्ये दिसत आहे. गावाकडच्या स्वयंपाकघरात एका करारनाम्यावर पाठमोरी बसलेली सरला या पोस्टरमध्ये दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर काहीसे गूढ भाव आहेत. सरला कोण आहे हे कोडं उलगडलं असलं तरी चित्रपटाचा विषय अजूनही गुपितच आहे. तर अजून एक विशेष असं की या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या नावाखाली ‘सत्य घटनांवरून प्रेरीत’

◽ सुमित्रा भावे एक समांतर प्रवास या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन.

Image
१९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात माहिती पटाद्वारे चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या आठवणींना दिला उजाळा. निर्माते आणि दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांच्या 'सुमित्रा भावे एक समांतर प्रवास' या माहितीपटाचं  प्रदर्शन १९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात करण्यात आले. या माहितीपटात  आंतरराष्ट्रीय कीर्ती च्या चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीचा कार्यकाळ आपल्याला पाहायला मिळतो. दिग्दर्शनामधल्या बारीक सारीक महत्त्वाच्या गोष्टी, अभ्यास आणि त्यांच्या चित्रपट विषयक जाणिवांचे   दर्शन आपल्याला या माहिती पटाद्वारे नव्याने उलगडताना दिसून येतात. सुमित्रा भावे यांच्या समांतर चित्रपट चळवळीतील प्रयत्नांची साक्ष हा माहितीपट आपल्याला नक्कीच देतो. त्यांची शिस्त आणि इतरांना दिलेल्या शिकवणींचा परिणामकारी  सकारात्मक प्रभाव नेहमीच त्याचे सहकारी आणि विद्यार्थांमधे दिसून येतो.  सुमित्रा भावे यांच्या मराठी कलाकृतींचे  कन्नड  दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, चित्रपट अभ्यासक आणि समीक्षक प्रा. एन. मनू चक्रवर्ती यांच्यासह अनेकांनी क

१३ जानेवारीला २०२३,प्रदर्शित होणार 'वाळवी'.....

Image
झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. 'दिसतं तसं नसतं' अशी टॅगलाईन असलेल्या 'वाळवी' या चित्रपटाचे एक भन्नाट टिझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असून नवीन वर्षात म्हणजेच येत्या १३ जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या टीझरमध्ये दिग्दर्शक परेश मोकाशी आपल्या चित्रपटात अभिनय करण्यासाठी कलाकारांना  विचारणा करताना दिसत असून विचारणा करण्यात आलेल्या प्रत्येक कलाकाराची व्यक्तिरेखा ही त्याच्या सिनेसृष्टीतील 'इमेज'पेक्षा वेगळी दिसत आहे. त्यामुळे आता स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे, शिवानी सुर्वे आपल्याला नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत आणि ही 'वाळवी' नेमकी कशाला लागली आहे, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इतक्या कुतूहलजनक आणि अनोख्या पद्धतीने चित्रपटाची घोषणा होणारा मराठीतील हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षक 'वाळवी

वास्तवाची दाहकता सांगणारा सिनेमा ‘हेल्लारो’ आशियायी चित्रपट महोत्सवात .

Image
१९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात दरवर्षी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील आणि भाषांमधील उत्तम दर्जाचे चित्रपट रसिकांना पाहण्यासाठी निवडले जातात. यंदाच्या ५ गुजराती चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. या मधे राष्ट्रीय पारितोषिक मिळालेली  अभिषेक शाह दिग्दर्शित 'हेल्लारो' चा समावेश आहे. तसेच 'धाड' (दिग्दर्शक - परेश नाईक), 'रेवा' (दिग्दर्शक - राहूल भोले व विनीत कनोजिया), २१ एम यु टिफीन (दिग्दर्शक - विजयगीरी बावा) या चित्रपटांचा  आणि 'आ छे मारू गाम' ( दिग्दर्शक - गोपी देसाई) या लघुपटाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे._ 'हेल्लारो' हा सिनेमा स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक मागासलेपणाची गोष्ट सांगतो. ‘हेल्लारो’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘मोठी लाट’ असा होतो. १९७५ सालच्या कच्छ भागातील समरपुरा नावाच्या गावाची ही गोष्ट आहे. वाळवंटातल्या या छोट्या वस्तीतल्या स्त्रियांच्या आंतरिक घुसमटीमागचं कारण अर्थातच पुरुषसत्ताक मानसिकता आहे. या काळात देवी म्हणून स्त्रीची पूजा करणाऱ्या पुरुषांची तथाकथित मर्दानगी मात्र स्त्रियांवर अत्याचार

'साथ सोबत' चित्रपटाचा उत्कंठावर्धक पहिली झलक प्रदर्शित.

Image
'साथ सोबत' या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या 'साथ सोबत'च्या टिझरला नेटकऱ्यांकडून अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी 'साथ सोबत' या चित्रपटात काहीसं वेगळं कथानक सादर केल्याची जाणीव टिझर पाहिल्यावर होते. हा नवा कोरा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या 'साथ सोबत' या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखनही रमेश मोरे यांनीच केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी हे वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहेत. 'साथ सोबत'च्या टिझरची आपली काही वैशिष्ट्ये आहेत. नायकाच्या मुखातील केवळ एक संवाद उत्सुकता वाढवणारा आहे. 'साथ सोबत'च्या रूपात तांत्रिकदृष्ट्या सक्षम चित्रपट पहायला मिळणार असल्याची चाहूल टिझर पाहिल्यावर लागते. यातील नयनरम्य निसर्ग म