नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रत्नाकर पिळणकर यांचा "ज्योत से ज्योत जगाते चलो" २९ डिसेंबर रोजी रात्रौ ८ वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे.
रत्नाकर पिळणकर यांच्या "प्रतिष्ठा", निर्मितीच्या वतीने, गुरुवार दिनांक २९ डिसेंबर रोजी रात्रौ ८ वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे एक सामाजिक जागृतीची संकल्पना घेऊन "ज्योत से ज्योत जगाते चलो" या शीर्षकाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे ज्या कार्यक्रमात हिंदी सिनेमातील लोकप्रिय प्रार्थना, भक्तीगीते, संस्कार गीते, देशभक्तीपर गाणी आणि संदेश गीते सादर केली जाणार आहेत.
"ज्योत से ज्योत जगाते चलो" या कार्यक्रमाचा उद्देश विश्वशांतीसाठी आणि देश बांधवांच्या सुरक्षेसाठी सामूहिक चिंतन असे असणार आहे. ही अभिनव संकल्पना रत्नाकर पिळणकर यांची असून प्रज्ञा देसाई, सेजल मराठे, डॉ.अंजली धामण-गावकर तसेच नितीन डिस्कळकर, जयंत पिंगुळकर आणि किरण शेंबेकर ही गाणी सादर करणार आहेत. वाद्यवृंद संयोजन प्रसाद पाथरे,दीपेश गवाणकर यांचे असून, प्रवेश मूल्य रुपये १०० ऐच्छिक स्वरूपाचे आहे. तसेच विनामूल्य प्रवेशही दिला जाणार आहे.
सन्मानिकांसाठी ईच्छुकांनी,९६१९२८७८४८ या मोबाईलवर संपर्क साधावा. अधिकाधिक रसिकांनी हा कार्यक्रम पाहून जुन्या वर्षाला निरोप व नव्या 2023 सालाचे स्वागत करावे तसेच, वसुधैव कुटुम्बकम या ब्रीद वाक्याला जागावे, असे कलाकारांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment