“आता थांबायचं नाय”च्या शूटिंगदरम्यान आशुतोष गोवारीकर यांना आश्चर्याचा धक्का.
झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांच्या संयुक्त निर्मितीतील आता थांबायचं नाय हा आगामी मराठी चित्रपट अनेक अविस्मरणीय क्षणांनी समृद्ध झाला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर यांना अनपेक्षितरित्या एक आश्चर्याचा धक्का बसला.
“शिवराज वायचळ फक्त एक लेखक आणि दिग्दर्शक आहे असं मला वाटलं होतं. मात्र शूटिंग संपता संपता मला असं समजलं की तो एक उत्कृष्ट अभिनेता देखील आहे… आणि मी अक्षरशः थक्क झालो. शिवराज वायचळ स्वतः एक चित्रकार , लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक असल्यामुळे त्याच्या कामात विषयचा अभ्यास आणि सिनेमावरची पकड दिसून आली. त्यानंतर मला त्याच्यावर अधिक विश्वास वाटायला लागला आणि अर्थात चित्रपट पाहून मला असं वाटत की त्यांनी तो विश्वास आज सार्थ ठरवला आहे ,” अशी भावना आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली.
शिवराज वायचळ दिग्दर्शित आता थांबायचं नाय ही सामान्य माणसांच्या जिद्दीची, स्वप्नांच्या पाठपुराव्याची आणि संघर्षातून उभारलेल्या जीवनगाथेची प्रेरणादायी कथा सांगते. संघर्ष, स्वप्नं आणि माणुसकीच्या भावनांना एकत्र गुंफणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार आहे.
या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, पर्ण पेठे, ओम भुतकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, श्रीकांत यादव, प्रवीण कुमार डाळिंबकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे.
आता थांबायचं नाय चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजत आहेत आणि सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट अनुभवण्याची प्रचंड उत्सुकता वाढली आहे.
‘आता थांबायचं नाय’ येत आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! प्रत्येक मराठी कुटुंबाने या मनोरंजक आणि प्रेरणादायी प्रवासाचा आनंद घ्या!
चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे! लवकरात लवकर तिकीट बुक करा !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा