पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिक येथील मराठी संमेलनात दादासाहेब साहेब फाळके चित्रनगरीच्या दालनाचे उद्घाटन.

इमेज
नाशिक येथे विश्व मराठी संमेलन सुरु आहे. या विश्व मराठी संमेलनात विविध प्रकाशकांसह काही शासकीय कार्यालयांचे दालने देखील उभारण्यात आले आहे. यामध्ये मुंबई गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी)चे दालन देखील उभारण्यात आले आहे. या दालनाचे उद्घाटन मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या दालनास भेट देण्याचे आवाहन केले आहे.     दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी) च्या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे आणि साहित्यातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. किरण कुलकर्णी यांनी विश्व मराठी संमेलनाला भेट द्यायला येणाऱ्या साहित्यप्रेमी नागरिकांना दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या दालनास नक्की भेट द्या असे आवाहन केले. ते म्हणाले की, अतिशय सुंदर आणि आकर्षक असे दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) चे दालन बनवले आहे. विशेष म्हणजे इथे तरुण मुला - मुलींना कन्टेंट क्रिएशनची संधी दिली जाणार आहे. ...

अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित 'पप्पा सांगा कुणाचे...' माहितीपटाचे प्रदर्शन...

इमेज
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ यांच्या वतीने अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित 'पप्पा सांगा कुणाचे...' माहितीपटाचे विशेष प्रदर्शन शुक्रवारी लघु नाट्यगृह, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले होते.     यावेळी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अरुण सरनाईक यांची कन्या आणि माहितीपटाच्या निर्मात्या सविता सरनाईक नाईकनवरे, दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे, संकलक सौरभ नाईक, विशाखा देशपांडे, संहिता पाठारे तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर काटकर उपस्थित होत्या. महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच उपस्थितांशी संवादही साधला.    स्व. अरुण सरनाईक हे मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते व गायक होते. अरुण सरनाईक यांची मुलगी डॉ. सविता सरनाईक - नाईकनवरे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतींना...

'तलास' चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न...

इमेज
   मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'तलास' हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके काय दडलेय याची कल्पना शीर्षकावरून अजिबात येत नाही. याउलट चित्रपटाचे शीर्षक उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे. नुकतेच या चित्रपटातील धम्माल गाण्याचे प्रकाशन करण्यात आले आहे.    निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली 'तलास' या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'तलास'मध्ये प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यमय घडामोडींची गुंतागुंत आणि अखेरीस होणारी रहस्याची उकल प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारी आहे. उदय गणपत जाधव यांनी या चित्रपटाचे अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केले असून, कथा आणि पटकथालेखनही त्यांनीच केले आहे. संवादलेखनाची जबाबदारी रुपाली कुटे यांनी सांभाळली आहे. गीतकार विजय गाडेकर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीत दिग्दर्शनही त्यांची केले आहे. दादर क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ...

मराठी साहित्य आणि संस्कृतीचा स्वरमयी जागर! ‘मराठी भाषा गौरव दिनी’ उलगडणार ‘गौरव माय मराठीचा’.

इमेज
   मराठी ही केवळ आपल्या राज्याची अधिकृत भाषा नसून त्याला नुकताच ‘अभिजात भाषा’ हा बहुमान प्राप्त झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून, श्री गुरु एस. नायर यांच्या प्रॉडक्शनतर्फे ‘गौरव माय मराठीचा’ हे भव्य गीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे गुरु एस. नायर यांनीच या गीताचे दिग्दर्शनही केले आहे. मराठी भाषेचा सांगीतिक जागर गेल्या अनेक वर्षांपासून कला क्षेत्रात सक्रिय असलेले आणि अनेक नामवंत कलावंतांचे यशस्वी स्टेज शो आयोजित करणारे गुरु नायर यांनी मराठी भाषेच्या प्रेमापोटी या गीताची निर्मिती केली आहे. मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, विविधतेने नटलेली परंपरा आणि भाषेचा गौरव मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. हे गीत बालकलाकार कुमार आदित्य जी. नायर आणि कोरस यांनी गायले असून, मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे दर्शन यातून घडणार आहे. बालकलाकार आदित्यची भरारी गायक कुमार आदित्य जी. नायर याने अत्यंत कमी वयात आपल्या गायकीची मोहोर उमटवली आहे. त्याने ...

शासनाची कुठलीच योजना नसलेली..‘लाडकी विहीण योजना’ घेऊन येत आहेत...निर्मिती सावंत.

इमेज
    शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा उद्देश एकच भरपूर हशा आणि खळखळून हास्यविनोद. अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंट निर्मित ‘लाडकी विहीण योजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नाटाकाचे  लेखन प्रथमेश शिवलकर  यांनी केले असून  दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.       नावात ‘योजना’ असली तरी यात कुठलीही कागदपत्रं, अटी-शर्ती नाहीत; आहे फक्त खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण. कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही योजना प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करणार आहे. ‘ही कोणतीही शासकीय योजना नाही; ही पूर्णपणे रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी हे स्पष्ट केलं.    ...

'फुला'चित्रपटाचे खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच.

इमेज
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी  'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थितीत होती. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पै.अजित शिवाजी जाधव यांनी "फुला" या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.अभिषेक जावीर दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या समाधान ऐवळे यांनी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, अतुल लोखंडे यांनी कला दिग्दर्शन, राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वेशभूषा कोमल जा...

‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित.

इमेज
   झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून सोशल मीडियावर त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, भव्यदिव्य स्टारकास्ट असलेला हा कौटुंबिक चित्रपट मोठ्या पडद्यावर धमाल उडवण्यासाठी सज्ज झाला आहे.    एका घराच्या दारात रंगलेला गोंधळ, एका बाजूला पारंपरिक कुटुंब तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारी तरुण जोडी अशा भन्नाट आणि विनोदी प्रसंगाची झलक पोस्टरमधून पाहायला मिळते. पोस्टरमधील प्रत्येक पात्राची देहबोली आणि हावभाव कथेतला संघर्ष, नात्यांतील टक्कर आणि विनोदाची धमाल याची उत्सुकता वाढवतात.   एका बाजूला पारंपरिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे कुटुंब दार उघडण्याच्या तयारीत दिसते, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक तरुणाई दार बंद करण्याचा प्रयत्न करताना दिसते. या दाराच्या दोन्ही बाजूंना उभा असलेला संघर्ष म्हणजेच कथानकाचा गाभा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे...

आई-मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित .

इमेज
आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं... तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणाऱ्या  ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे मांडणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.    या ट्रेलर लाँच सोहळ्यात भारती आचरेकर यांच्यासाठी खास सरप्राईज होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘तिघी’च्या प्रदर्शनासाठी चित्रफितीच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या. तर गायिका प्रियंका बर्वे, शरयू दाते यांनी चित्रपटातील गाणी सादर केली. यावेळी नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, जिजीविषा काळे, जितेंद्र जोशी, शरयू दाते, प्रियंका बर्वे, निलेश मोहरीर, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आदी चित्रपटाच्या टीमसह अभिनेत्री गिरिजा ओकही उपस्थित होत्या.अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एका घरातल्या तीन स्त्रियांचं आयुष्य अधिक ठळकपणे उलगडताना दिसतं. आई आणि तिच...

अमोल कांगणे स्टुडिओसकडून "करणी" चित्रपटाच्या शूटिंगला पुणे येथे सुरुवात.

इमेज
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केलेले अमोल कागणे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. करणी असे या चित्रपटाचे नाव असून, उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन चित्रपट जाहीर करण्यात आला.     अमोल कांगणे यांनी त्यांच्या अमोल कांगणे स्टुडिओ  या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. हलाल, भोंगा, लेथ जोशी , सिंगल  , बेफाम  , कनिका, इमेल फिमेल, लॉकडाऊन लग्न अशा चित्रपटांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलं आहे. आता करणी या चित्रपटाची निर्मिती ते करत आहेत. "करणी" या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गोळे  आणि सुमित संघमित्रा करत आहेत.     "करणी" या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. अभिनेता अभिनय बेर्डे, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी, आशय कुलकर्णी, नितेश चव्हाण, सागर पाठक, आरव पाठक यांच्या या चित्रपटात प्रमुख भू...

दानशूर आदरणीय भागोजी शेठ कीर स्मारक लोकार्पण ...

इमेज
    आज नररत्नांच्या आमच्या रत्नागिरी शहराच्या वेशीवर साळवी स्टॉपच्या परिसरात दानशूर आदरणीय श्रीमंत भागोजी शेठ कीर यांच्या पवित्र स्मारकाचा लोकार्पण समारंभ सायंकाळी संपन्न होत आहे. राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या सामाजिक वरदहस्त दूरदृष्टीतून हे स्मारक उभे राहत आहे ही घटना इतिहासातील सुवर्णपान आहे. म्हणूनच मा. उदयजी सामंत आपले हार्दिक अभिनंदन! रत्नागिरी शहराच्या प्रारंभ वेशीवर काही वर्षांपूर्वी ‘स्वर्गीय भागोजीशेठ कीर प्रवेशद्वार’ ही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कमानसुद्धा पालकमंत्र्यांच्याच समाजदखल दृष्टीकोनातून उभी राहिली. या पवित्र स्मारकातून रत्नागिरी आणि महाराष्ट्रातल्या भविष्यातील पिढ्या नवा संदेश, नवी प्रेरणा घेतील. यातूनच परस्परांतील सामाजिक मैत्री आणि ऋणानुबंध वाढीला लागतील, अशी आपण खात्री बाळगूया. राष्ट्रपुरुषांच्या समाज शिल्पकारांच्या स्मारकांचा अभिमान बाळगताना त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवण्याची जबाबदारी ही तुम्हा-आम्हा सर्वांची आहे. दानशूर भागोजीशेठ कीर यांचे कार्य हे केवळ भंडारी ज्ञा...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली 'गोरेगाव चित्रनगरी'.

इमेज
    गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्मसिटी) येथे गुरुवारी यवतमाळ येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांनी भेट दिली. या महिलांना संपूर्ण चित्रनगरी फिरण्याची संधी मिळाली. आता पर्यंत दूरदर्शनच्या पडद्यावर ज्या मालिका, चित्रपट पाहिल्या त्याचे चित्रीकरण प्रत्यक्ष पाहताना महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. या महिलांचे चित्रनगरीचे सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी स्वागत केले.  यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे 'रसिकाश्रय' संस्था ही गेले २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी 'जीवाची मुंबई' हा आगळा वेगळा उपक्रम राबविला जातो. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम भागातील  पतीच्या निधनानंतर शेती आणि घराची जबाबदारी पेलणाऱ्या महिलांना मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीची सफर घडवून आणण्यात आली.     आजवर ज्या मालिका आणि चित्रपट केवळ दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिले होते, त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण कसे चालते, भव्य सेट कसे असतात आणि कलाकार प्रत्यक्षात कसे दि...

‘माया’च्या कथेला नवी उंची देणारे ‘मन गाईना सुरात’ गाणे प्रदर्शित.

इमेज
‘माया’ या चित्रपटातील ‘मन गाईना सुरात’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, ते संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहाण्याचा संदेश देणारे हे गाणे ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते.     ‘मन गाईना सुरात’ ह्या गाण्याचे सुंदर शब्द आणि सुरेल धून यामुळे हे गाणे प्रेक्षकांना भावत आहे. या गाण्यातील दृश्यांमध्येही प्रकाश, रंग आणि हसरे क्षण यांची सुंदर सांगड घालत प्रसन्न वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या गाण्याला अंजली मराठे हिचा सुरेल आवाज लाभला असून वैभव जोशी यांचे शब्द लाभले आहेत. तसेच पार्थ उमराणी यांचे भावपूर्ण संगीत या गाण्यात अधिकच रंगत आणते.     दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ ‘मन गाईना सुरात’ हे आमच्या चित्रपटातील खूप खास गाणे आहे. मनाचे विविध विभ्रम, संभ्रम दाखवणारे हे गाणे चित्रपटातील अव्यक्त भावना सुरेलपणे व्यक्त करते."    निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “ ‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा देईल. कथानकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येणारे हे गाणे चित्रपटाचा चित्रपटाच्या कथेला आकार देते. साधे,...

"ट्रायंगल"मराठीतील पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट.

इमेज
    हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आजवर अनेक स्पाय थ्रिलर चित्रपट झाले आहेत. मात्र, मराठी चित्रपटात असलेली स्पाय थ्रिलर चित्रपटांची उणीव आता भरून निघणार आहे. "ट्रायंगल" हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट ठरणार असून, अर्जून करे हा नवा चेहरा या चित्रपटातूुन प्रेक्षकांसमोर येणार आहे. देशभक्ती, निष्ठा आणि धाडसाची अनोखी गोष्ट या निमित्ताने मराठी भाषेतून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.  वैष्णवी फिल्म्सची निर्मिती असलेल्या "ट्रायंगल" या चित्रपटाची निर्मिती विकी सूर्यवंशी आणि सुखदेव आढाव यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शन विकी सूर्यवंशी यांनी केलं आहे. राजकीय आणि गुप्तधार्मिक जगतातील गुंतागुंत या चित्रपटात मांडण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली इंडियन ओशन सिक्युरिटी सिस्टिम डॉक्युमेंट्स चोरी करण्याचा प्रयत्न परदेशी संस्था करतात आणि सुरू होतो एक आंतरराष्ट्रीय खेळ... वेगवान कथा, उत्कृष्ट अॅक्शन सिक्वेन्स हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. तांत्रिक बाजूंव...

शिवजयंतीच्या उत्साहात ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’चे अर्धशतक साजरेदुहेरी जल्लोषात रंगला सोहळा.

इमेज
   मराठी माध्यम शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई करत अभिमानास्पद यश संपादन केले असून, या चित्रपटाने चित्रपटगृहात अभिमानाने ५० यशस्वी दिवस पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या टीमने हा अर्धशतकाचा आनंद साजरा करतानाच शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली आणि त्यामुळे हा सोहळा अक्षरशः दुहेरी जल्लोषात रंगला.    मुंबईतील एका चित्रपटगृहात हा सोहळा मोठ्या दणक्यात, जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर साकारलेल्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. घोड्यावरून ‘बालशिवरायां’चे आगमन होताच उपस्थितांमध्ये उत्साहाची प्रचंड लाट उसळली. तर शिवगर्जना ऐकताना प्रेक्षक स्तब्ध झाले, पुढच्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. घोषणांचा नाद, मराठी अस्मितेचा अभिमान आणि जल्लोषमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत हा विशेष सोहळा विद्यार्थी आणि प्रेक्षकांसोबत साजरा...

‘Rx 2025–26 तरंग’ : फार्मसी विद्यार्थ्यांचा त्रिदिवसीय महोत्सव येत्या २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ दरम्यान बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कालिना (मुंबई) येथे.

इमेज
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन – महाराष्ट्र राज्य शाखा स्टुडंट्स’ फोरम (IPA–MSB–SF) तर्फे आयोजित करण्यात येणारा राज्यातील सर्वात जुना व प्रतिष्ठित फार्मसी महोत्सव Rx 2025–26 यंदा नव्या संकल्पनेसोबत उत्साहात साजरा होणार आहे. महाराष्ट्रभरातील फार्मसी विद्यार्थ्यांचे अधिकृत राज्यस्तरीय प्रतिनिधित्व करणारी ही विद्यार्थी संघटना शैक्षणिक उत्कृष्टता, व्यावसायिक प्रगती आणि सामाजिक जबाबदारीची परंपरा या महोत्सवाद्वारे पुढे नेत आहे. हा त्रिदिवसीय महोत्सव २८ फेब्रुवारी, १ मार्च आणि २ मार्च २०२६ रोजी बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, कालिना (मुंबई) येथे आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या आवृत्तीची थीम आहे — “आरएक्स तरंग – Rx Tarang”. नवोन्मेष, सर्जनशीलता आणि सामूहिक ऊर्जेच्या लहरींचे प्रतीक असलेली ही संकल्पना सतत विकसित होत असलेल्या फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या गतिमान वृत्तीचे प्रतिनिधित्व करते. शिक्षण, नेतृत्व, संशोधन आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा अखंड प्रवाह या ‘तरंग’मधून अनुभवता येणार आहे.    गेल्या अनेक वर्षांत या महोत्सवाने सुमारे ४,००० ते ५,००० फार्मसी विद्यार्थी, प्राध...

प्रतिष्ठेचा ‘इंका अवॉर्ड्स’ १५ व १६ एप्रिल रोजी मुंबईत.

इमेज
इंडियन नॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड्स (INCA Awards) यांच्या पहिल्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा भव्य सोहळा १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबईत संपन्न होणार आहे.भारतामधील १२ प्रमुख चित्रपट उद्योगांना एका समान व्यासपीठावर आणणारा ‘इंका’ हा देशातील पहिला राष्ट्रीय चित्रपट अकॅडमी मंच आहे. भाषाभेद, प्रांतिक सीमारेषेच्या चौकटी ओलांडून, भारतीय सिनेमाची व्यापकता, वैविध्य आणि जागतिक स्तरावरील महत्त्व यांचा एकत्रित व समतोल सन्मान करण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण स्तुत्य उपक्रम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक एकात्मतेला संस्थात्मक स्वरूप देणारा हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.   ‘इंका’ची संकल्पना सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) आणि साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) संबंधित उपक्रमांचे संस्थापक व मार्गदर्शक यांच्या संकल्पनेतून साकारली असून, या उपक्रमाचे नेतृत्व विष्णू वर्धन इंदुरी करत आहेत. प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया (Producers Guild of India) हे या उपक्रमाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ‘इंका’ला संस्थात्मक विश्वासार्हता, व्यापक दृष्टी आणि जागति...

अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित 'पप्पा सांगा कुणाचे...' माहितीपटाचे विशेष प्रदर्शन.

इमेज
 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ आयोजित मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या 'पप्पा सांगा कुणाचे...' या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता लघु नाट्यगृह, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.     स्व. अरुण सरनाईक हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय, राजबिंडे आणि दिग्गज अभिनेते व गायक होते. १९६०-७० च्या दशकात 'रंगल्या रात्री अशा', 'मुंबईचा जावई', 'केला इशारा जाता जाता' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांतून त्यांनी अभिनय आणि गाण्यांचा ठसा उमटवला. त्यांना चार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देखील मिळाले होते.अरुण सरनाईक यांची मुलगी डॉ. सविता सरनाईक - नाईकनवरे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 'पप्पा सांगा कुणाचे...' या माहितीपटाची निर्मिती केली. हा माहितीपट जुन्या ...

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज.

इमेज
   भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, 'राजा शिवाजी' या द्विभाषिक (मराठी आणि हिंदी) चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आज शिवाजी जयंती दिनी प्रदर्शित करण्यात आले. इतिहास साक्षी आहे त्या अढळ निष्ठेचा आणि अजेय शौर्याचा. एक अशी गाथा, जी केवळ कथा नाही तर आहे ‘एक वचन, एक स्वराज्य, एक संपूर्ण राष्ट्राचा अभिमान’.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये अभिनेते-दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अत्यंत प्रभावशाली दिसत आहेत. त्यांच्या हातात फडकणारा भगवा ध्वज, चेहऱ्यावरील करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व महाराजांच्या शौर्याची प्रचिती देते. पोस्टरमधील सुवर्ण अक्षरातील चित्रपटाचे नाव आणि तेजस्वी प्रकाशयोजना या ऐतिहासिक गाथेच्या भव्यतेची साक्ष देते.    जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी...

बर्लिन येथेही व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले अभिवादन.

इमेज
चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्र,चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांच्या चित्रनगरी परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.    यावेळी महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, व्यवस्थापक ( कलागरे) संतोष खामकर, मुख्य सुरक्षा अधिकारी अनिल माने, फाळके यांचे कुटुंबातील सदस्य यांच्यासह चित्रनगरीचे अधिकारी-कर्मचारी, निर्माता महामंडळाचे पदाधिकारी, चित्रनगरीतील निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.    यावेळी हरित चित्रनगरी उपक्रमातर्गत चित्रनगरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण करून चित्रनगरी हरित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.    तसेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या अभ्यासदौऱ्यावर आहेत. बर्लिन येथे महामंडळाचा आकर्षक स्टॉल उभारण्यात आला असून त्याठिकाणी दादासाहेब फाळके यांच्या प्रतिम...

नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व अधिक गहिरे करणारा ‘माया’चा ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
नातेसंबंधांवर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आपलेसे वाटतात. कारण ते केवळ कथा सांगत नाहीत, तर आयुष्यात व्यक्त न केल्या गेलेल्या भावनांना शब्द देतात. अशाच भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या ‘माया’ या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.    ‘माया’चा ट्रेलर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो, माणूस खरोखरच एकटेपणाला घाबरतो की पोरकेपणाच्या भावनेला? नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या गैरसमजुती, मनात साचत जाणाऱ्या अढी आणि त्या अढीमुळे दुरावत जाणारी माणसं यांचा भावनिक प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आयुष्य पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता आणि समजूतदार संवाद यांची जाणीव करून देणारा हा ट्रेलर विचार करायला भाग पाडतो.चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका ट्रेलरमध्ये मध्यवर्ती ठरते. मुलीमध्ये रमलेला पण स्वतःच्या भावनांपासून काहीशी दूर गेलेली ही व्यक्तिरेखा मनाच्या खोल कप्प्यात डोकावते. मुक्ता बर्वेची व्यक्तिरेखा आयुष्याच्या वळणावर उभी राहून स्वतःचे प्रश्न शोधताना दिसते, तर विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांचे अनुभव...

सांस्कृतिक कलादर्पण च्या मराठी नाट्य महोत्सवाची अंतिम नाटकं जाहीर.

इमेज
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २८ व्या" सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्यातील मराठी व्यावसायिक नाटक विभागातील स्पर्धेतील एकूण २२ नाटकांमधून अंतिम ५ नाटकांची "निवड मराठी व्यावसायिक नाट्य महोत्सवात" जाहीर झाली आहेत.जाहीर झालेली नाटकं पुढील प्रमाणे आहेत.  सविता दामोदर परांजपे , फिल्टर कॉफी , ठरलंय Foreverr, गोष्ट तिच्या घटस्फोटाची,लागली पैज .वरील नाटकांचा महोत्सव दिनांक १० ते १३ मार्च दरम्यान संपन्न होणार आहे.    दिनांक १० मार्च रात्रौ ८ वा.सविता दामोदर परांजपे. ११ मार्च रात्रौ ८ वा. फिल्टर कॉफी     १२ मार्च रात्रौ ८ वा. ठरलंय Foreverr   १३ मार्च दुपारी ४ वा. गोष्ट तिच्या घटस्फोटाची  दिनांक १३ मार्च रात्रौ ८ वा. सविता दामोदर परांजपे.या वेळे नुसार सादर होणार आहेत. तसेच मराठी प्रायोगिक नाट्य स्पर्धेत पुढील नाटकं अंतिम स्पर्धेसाठी जाहीर झाली आहेत. महापूर , इतना सन्नाटा क्यू है भाई.कर्ण,स्वस्तिकाची ट्रॅजेडी , इथेच टाका तंबू,   ऊन पाऊस ,मराठी प्रायोगिक नाट्य महोत्सव दिनांक ९ मार्च रोजी सकाळी १० त...

दानशूर महामानव भागोजी शेठ कीर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त उरण येथे जनजागृती सभा संपन्न.

इमेज
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री. नवीनचंद्र  बांदिवडेकर, सचिव श्री.  प्रकाश कांबळी, खजिनदार सौ. शलाका पांजरी आणि सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अलका नाईक -मुंबई, यांनी उरण- बोरी गाव, ज्येष्ठालय, येथे भंडारी हितवर्धक समाज- उरण यांच्या संयुक्त विद्यमाने एक जनजागृती कार्यक्रम केला, ज्यामध्ये महामानव भागोजीशेठ कीर यांच्याबद्दल सविस्तर माहिती आणि रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दादर-मुंबई. येथे होणाऱ्या रथयात्रेसाठी सर्वांना हार्दिक आमंत्रण दिले. उरण येथील भंडारी समाजाने या रथयात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे महासंघाच्या अध्यक्षांनी सर्वांना आवाहन केले.याप्रसंगी  येथील स्थानिक भंडारी कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष- श्री. दिनेश हळदणकर, ‌सचिव श्री. स्वप्नील मयेकर, उपाध्यक्षा सौ.रेश्मा मयेकर, ‌श्री.मिलींद तळेकर आदींसह अनेक रसिक श्रोतेही उपस्थित होते. अध्यक्ष मा. श्री. हळदणकर यांचा सन्मान अ.भा.भं. महासंघाच्या वतीने डॉ. अलका नाईक यांनी केला. तसेच महासंघाच्या अध्यक्षांचे व मान्यवरांचे स्वागत सन्मान स्थानिक समितीने समस्त उर...

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित आणि कौटुंबिक महासोहळा रंगणार ३ एप्रिलला.

इमेज
आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा  एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद देतो. अशा सर्वच स्तरांतील, वयोगटातील आणि विविध भागांतील प्रेक्षकांना आवडेल, रुचेल आणि मनापासून भावेल अशीच गोष्ट असणारा ' सुपर डुपर ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  झी स्टुडिओजची प्रस्तुती, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स तथा सिद्धिविनायक प्रॉडक्शन्सची निर्मिती आणि समीर आशा पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या 'सुपर डुपर' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.     या टिझरमधून चित्रपटातील एकाहून एक सरस कलाकारांची झलक बघायला मिळाली आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आणि मुख्य नायक नायिकेच्या भूमिकेत असलेले ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले अशी भलीमोठी स्टारकास्ट यामध्ये झळकणार आहे. कौटुंबिक महासोहळा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प...

मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर.

इमेज
   प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्सच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार आकर्षण जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या हटके आणि गंमतीदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे आणि भन्नाट टायमिंगमुळे चित्रपटातील विनोदाची रंगत आणखीनच वाढणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या बोनस टिझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रमोशन दरम्यान अशा प्रकारे बोनस टिझर येणे हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.    चित्रपटातील ‘भाऊ तिर्री तिर्री’ या मजेशीर आणि भन्नाट ट्यूनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्यूनवर उलगडणारे प्रसंग, पात्रांमधील नोकझोक आणि एकामागोमाग येणाऱ्या गंमतीशीर घटनांमुळे संपूर्ण चित्रपटात हलकाफुलका, एंटरटेनिंग माहोल तयार होतो. विशेषतः बाबा खत्रीच्या एंट्रीनंतर घडणाऱ्या विनोदी सीनमुळे कथेला वेगळाच ट्विस्ट मिळणार आहे.    संजय नार्वेकर या चित्रपटात पाहुणे कलाकार असून यांच्या येण्याने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील...

नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला.

इमेज
नात्यांच्या सूक्ष्म छटा आणि अंतर्मनातील भावविश्व हळुवारपणे उलगडणाऱ्या आगामी ‘माया’ या चित्रपटाचे बहुप्रतीक्षित शीर्षक गीत आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मनाच्या गाठी, आठवणींची ओल आणि जिव्हाळ्याच्या नात्यांमधून उमटणारी भावनिक ऊब या सगळ्यांना स्पर्श करणारा हा अनुभव चित्रपटाच्या आशयाला सुरेल आणि अर्थपूर्ण रूप देताना दिसतो.गाण्याची धून शांत, हळवी आणि मनात रेंगाळणारी आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्याची भावछटा प्रेक्षकांना एका अंतर्मुख प्रवासावर घेऊन जाते. जिथे आठवणी, नात्यांची ऊब आणि भावनिक स्वीकार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. या शीर्षक गीताला गायक पार्थ उमराणी यांनी भावपूर्ण आवाज दिला असून, या गाण्याला संगीत ही त्यांनीच दिले आहे. साधेपणातून व्यक्त होणारी संवेदनशीलता ही या गाण्याची खासियत ठरते. वैभव जोशी यांच्या शब्दांमधून माणसाला माणसाशी जोडून ठेवणारी माया अत्यंत सुंदर पद्धतीने व्यक्त होते.    दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ चित्रपटाचा आशय ज्या भावविश्वाभोवती फिरतो, त्याची पहिली अनुभूती प्रेक्षकांना शीर्षक गीतातून मिळावी, अशी आमची इच्छा होती. ‘माया’ या ...

नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’.

इमेज
   फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हवेत एक वेगळीच हुरहूर जाणवू लागते. प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस  १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून समोर येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देणं, नात्याला नवी सुरुवात देणं किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाची ऊब निर्माण करणाऱ्यांसाठी हा दिवस खास ठरतो. अभिनेत्री नम्रता गायकवाड  यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ‘काहीतरी वेगळे’ करणार आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचे आणि अभिनेता तुषार कावळे याचे काही रोमँटिक  फोटोज पहायला मिळतायेत.  हे दोघे एकमेकांना डेट  करतायेत का? अशा चर्चाना उधाण आलं आहे तर या  दोघांचं एक  ‘काहीतरी वेगळे’ हे नवं, फ्रेश सोलो गाणं ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या मूहूर्तावर रसिकांच्या भेटीला येत आहे.    हे गाणं केवळ एका जोडप्याची कथा सांगत नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांचा आरसा ठरतं. आपण खरंच क्षण जगतोय… क...

‘जब्राट’ आनंद देणारा चित्रपट - निर्माती, दिग्दर्शिका प्रगती कोळगे.

इमेज
   मनोरंजनाबरोबरच सशक्त आशयाची सांगड घालत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती मराठी निर्माते-दिग्दर्शक सातत्याने प्रेक्षकांसमोर आणत असतात. अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी निर्मात्या-दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पाऊल टाकत ‘जब्राट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. परदेशात वास्तव्यास असूनही मराठी भाषा, संस्कृती आणि मातीशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली आहे. येत्या २० फेब्रुवारीला तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   ‘जब्राट’ हा चित्रपट आजच्या तरुणाईची कथा मांडतो. बेधुंदपणे जगत असताना समोर उभ्या असणाऱ्या प्रश्नांना तितक्याच सक्षमपणे सामोरं जाणाऱ्या तरुणाईचा दृष्टिकोन या चित्रपटात पहायला मिळतो. ‘जब्राट’ संगीतमय आणि रंगतदार चित्रपट असून मैत्रीच्या भावविश्वाला स्पर्श करणारी सशक्त कथा यात मांडण्यात आली आहे.     दिग्दर्शिका प्रगती कोळगे सांगतात की, ‘तुम्ही जर उत्तम देण्याचा प्रयत्न केलात तर त्याला प्रतिसाद ही उत्तमच मिळतो. या विश्वासानेच ‘पल्याडवासी’ य...

उमेश - प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग.

इमेज
   नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहाता आला नाही, त्यांना आता ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर पाहाता येईल.नात्यांमधील समज, मतभेद, विश्वास आणि जिव्हाळा या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळतो. आधुनिक काळातील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहाणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे. ओटीटीवर आल्यानंतर नव्या प्रेक्षकवर्गाकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून तो सध्या चर्चेत आहे.प्रिया बापट आणि उमेश कामत या रिअल लाईफ कपलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे आणि या चित्रपटातही त्यांच्या नात्यातील गोड-तिखट प्रसंगांनी प्रेक्षकांना भावनिक केले आहे. त्यांच्या सोबत गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने चित्रपट अधिक प्रभावी झाला आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात,...

'सखे गं साजणी'च्या कुल पोस्टरची चर्चा, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकरची मुख्य भूमिका.

इमेज
    मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं बदलणं नाही, तर नाती अधिक घट्ट होण्याचा, आयुष्य नव्याने जगायला शिकविण्याचा अनुभव असतो. आणि हाच अनुभव मोठ्या पडद्यावर आणणारा 'सखे गं साजणी' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट तीन मित्रांच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. आणि या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे.      'सखे गं साजणी' या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील तीन लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर हे तीन कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. पोस्टरवरील तिघांचा कुल अंदाज आताच्या तरुणाईची उत्सुकता वाढविणारा आहे. निरभ्र आकाशाकडे पाहत स्वछंदी जगण्याचा आनंद लुटण्याचा केविलवाणा प्रयत्न या तिघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे. पोस्टरवरून ही तिघांची मैत्री अर्थात वेगळी आहे हे स्पष्ट करतंय.अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब स्टुडिओ’ हाऊस मार्फत हा चित्रपट ...

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५+ देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती.

इमेज
   GMBF ग्लोबल (गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाबिझ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचा नववा अध्याय दुबई येथे मोठ्या यशस्वीपणे पार पडला. या परिषदेत २५ हून अधिक देशांतील ८०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय व्यापार व सीमापार व्यावसायिक सहकार्याचे जागतिक केंद्र म्हणून दुबईचे महत्त्व यानिमित्ताने अधिक दृढ झाले.    ही दोन दिवसीय परिषद ३१ जानेवारी रोजी अल हब्तूर पोलो क्लब येथे सुरू होऊन १ फेब्रुवारी रोजी अटलांटिस – द पाम येथे समारोपाने पूर्ण झाली. भारत, यूएई, जीसीसी, मेना प्रदेश, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, रोमानिया तसेच दक्षिण-पूर्व आशियातील उद्योजक, एमएसएमई प्रतिनिधी, गुंतवणूकदार, धोरणकर्ते, व्यावसायिक आणि विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. “Contacts to Contracts” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून प्रत्यक्ष व्यावसायिक परिणाम साधणे, हाच परिषदेचा मुख्य उद्देश होता.    उद्घाटन सत्र, प्रमुख भाषणे, विविध उद्योगांवरील सादरीकरणे आणि परिसंवादांमध्ये भारत–यूएई व्यापार ...

चित्रनगरीत शूट अ शॉर्ट' कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न.....

इमेज
     महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने  आयोजित केलेली शूट अ शॉर्ट' ही लघुपट निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.  महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.     या कार्यशाळेत केवळ मुंबईतीलच नव्हे तर अकोला, पुणे, नागपूर आणि अमरावतीसारख्या दूरवरच्या जिल्ह्यातील ५० चित्रपटप्रेमींनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांसह जेष्ठांचाही विशेष सहभाग होता. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कार्यशाळा आयोजनाचा चित्रनगरीचा हा पहिलाच प्रयत्न तुफान यशस्वी ठरला असून कार्यशाळेची सांगता करताना भविष्यात अधिकाधिक तांत्रिक कौशल्याधारित उपक्रम राबविण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रशांत साजणीकर यांनी सांगितले.

मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत पुनीत इस्सर.

इमेज
    ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ कथा नाही, तर शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्कंठावर्धक अध्याय आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.      ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तिरेखेत झळकणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अनुभवी आणि भारदस्त अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ राजकीय सत्तेचे प्रतीक नसून, रणनीती, कूटनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.    महाभारत मालिकेतील दुर्योधनासह अनेक संस्मरणीय भूमिकांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या भूमिकेतून इतिहासातील ...