नाशिक येथील मराठी संमेलनात दादासाहेब साहेब फाळके चित्रनगरीच्या दालनाचे उद्घाटन.
नाशिक येथे विश्व मराठी संमेलन सुरु आहे. या विश्व मराठी संमेलनात विविध प्रकाशकांसह काही शासकीय कार्यालयांचे दालने देखील उभारण्यात आले आहे. यामध्ये मुंबई गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी)चे दालन देखील उभारण्यात आले आहे. या दालनाचे उद्घाटन मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या दालनास भेट देण्याचे आवाहन केले आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी) च्या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे आणि साहित्यातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. किरण कुलकर्णी यांनी विश्व मराठी संमेलनाला भेट द्यायला येणाऱ्या साहित्यप्रेमी नागरिकांना दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या दालनास नक्की भेट द्या असे आवाहन केले. ते म्हणाले की, अतिशय सुंदर आणि आकर्षक असे दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) चे दालन बनवले आहे. विशेष म्हणजे इथे तरुण मुला - मुलींना कन्टेंट क्रिएशनची संधी दिली जाणार आहे. याठिकाणी त्यांनी आपला कन्टेंट क्रिएट करावा तो कंन्टेंट कॅमेऱ्यासमोर सादर करावा आणि आपली फिल्म स्वत: तयार करावी. फिल्म तयार करण्याची वेगवेगळी अंग काय आहेत याची माहिती सर्वांना कळेल असा यामगाचा हेतू आहे. त्यामुळे सर्व नाशिककरांना आणि विश्व मराठी संमेलनाला जे जे साहित्यप्रेमी यांनी फिल्मसिटीच्या या दालनाला निश्चित भेट द्यावी आणि या दालनाचा आनंद घ्यावा या स्टॉलच्या माध्यमातून जी माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न फिल्म सिटी करते आहे त्याला प्रतिसाद द्यावा असे आवाहन मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा