पोस्ट्स

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ.. "अस्मिता-अभिमान-परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध"

इमेज
     शुक्रवार दि. ३० जानेवारी २६ रोजी  अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ पुरस्कृत भागोजीशेठ स्मृती समितीच्या माध्यमातून माहिम स्थित कोकण नगर येथे दि. १५ फेब्रुवारी २६ महाशिवरात्री दिनी भागोजीशेठ कीर जयंतीनिमित्त सभेचे आयोजन केले होते. सभेत भागोजीशेठ कीर यांच्या जीवनपटपर उपस्थितांबरोबर संवाद व जयंती निमित्त कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली.सभेत लालबागच्या राजाचे मूर्तिकार सन्मा. श्री. संतोष कांबळी यांच्या हस्ते भागोजीशेठ कीर यांच्या जीवनावर आधारित पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या सभेस प्रमुख पाहुणे या नात्याने समाजसेवक सन्मा. श्री. वीरेंद्रजी तांडेल, कोकण नगरच्या अध्यक्षा सन्मा. श्रीम. उषाताई उ. बांदिवडेकर,महासंघाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकरजी, महासंघाचे सरचिटणीस श्री. प्रकाशजी कांबळी, समितीचे अध्यक्ष किशोरजी केळसकर, कोकण नगरचे सभासद व  इतर मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन - २०२६ व चित्रकर्मी महाउत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली नियोजित पहिली बैठक.

इमेज
अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन २०२६ व चित्रकर्मी महा-उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पहिली पूर्वतयारी बैठक दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस महाराष्ट्रभरातील चित्रकर्मी, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व विविध घटकांचा उत्स्फूर्त व उल्लेखनीय प्रतिसाद लाभला.    संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व उपस्थितांनी एकजुटीने सहभाग नोंदवत, “हे संमेलन प्रत्येक चित्रकर्मीचं आहे” ही भावना ठामपणे व्यक्त केली. आगामी काळात हे संमेलन मराठी चित्रपट व्यवसायाला नवी दिशा, नवी ऊर्जा व व्यावसायिक बळ देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.    या बैठकीच्या निमित्ताने संपूर्ण मराठी चित्रपट परिवार एकत्र येण्याची सकारात्मक नांदी दिसून आली असून, भविष्यात एकत्रितपणे, समर्थपणे मराठी चित्रपटाचा समृद्ध वारसा पुढे नेला जाईल, असा आश्वासक चित्र स्पष्टपणे उभा राहिला आहे.  आयोजन -अखिल भारतीय मराठी चित्रपट संमेलन नियोजन समिती 2026.

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर.

इमेज
   ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.    'पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजांची आणि अनपेक्षित वळणांची धमाल सांगणार आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या कथेचा  केंद्रबिंदू आहे. या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडाली, याची उत्तरं चित्रपट पाह...

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

इमेज
विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत  पहायला मिळणार आहेत. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार्‍या ‘केस नं. ७३’ या चित्रपटात एसपी संजय देशमुख ही जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेते शैलेश दातार साकारणार आहेत.   एसपी म्हणून संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याच्या पूर्ण सेवाकाळात एकही गुन्हा आजवर अनसॉल्व्ह राहिलेला नाही. प्रामाणिकपणा, कर्तृत्व आणि सरळ स्वभावामुळे संजय गावात लोकप्रिय आहे. मात्र, ऐन निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्याकडे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला येतो. ही केस सोडवण्याचे प्रचंड दडपण त्यांच्यावर आहे. धागेदोरे मिळत नाहीत आणि प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसोटीचा ठरतो. धाडस, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारी ही भूमिका कथानकाला वेगळी कलाटणी देणारी असणार आहे.    लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित  ‘केस नं. ७३’  हा मराठी चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपट...

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात.

इमेज
शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.   महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणा...

“चित्रपट कसा बनवावा” या विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन.

इमेज
  महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII), पुणे यांच्या सहकार्याने “चित्रपट कसा बनवावा” या विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यशाळा दिनांक २ फेब्रुवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दादासाहेब फाळके चित्रनगरी, चित्रांगण सभागृह येथे दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.   या कार्यशाळेसाठी सहभागींसाठी रु. ३,५००/- (अक्षरी रुपये तीन हजार पाचशे फक्त) इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) येथील प्राध्यापक डॉ. मिलिंद दामले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क :सुमेध आढाव मोबाईल : ८६५२२१५४०१

नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित.

इमेज
   नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवारपणे पाहाणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील हालचाली टिपणाऱ्या कथा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’सारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणाऱ्या आदित्य इंगळे यांचा ‘माया’ हा नवा चित्रपट आता त्याच भावविश्वाचा पुढचा टप्पा ठरत असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दिसून येतं. या टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.     टीझरमधून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. माणूस खरंतर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. ‘माया’चा टीझर हा भाव अतिशय हळुवारपणे उलगडतो. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून तयार होणारे मनोव्यापार आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचं जाणवतं.   चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहाण्याचा वेगळा, समजूतदार दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेग...