पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट सांगणारा "गेट टुगेदर" आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर!

इमेज
पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या "गेट टुगेदर" हा चित्रपट नुकताच २६ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांना नॉस्टालजिक करुन गेला. वय वाढत पण आठवणी कायम राहतात या आशयवार हा सिनेमा भाष्य करतो.  रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या चित्तपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या ३० जून पासून आता आपल्याला  अ‍ॅमेझॉन प्राइमवर बघता येणार आहे.  सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती  समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. या गाण्यांना समाजमाध्यमांतून उत्तम प्रतिसादही लाभत आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम  शाळा, कॉलेजमध्ये गवसतं. प...

'मुसाफिरा,' आनंद पंडित आणि पुष्कर जोग घेऊन येत आहेत मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास

इमेज
      आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ' 'व्हिक्टोरिया' या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गूझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनच्या 'मुसाफिरा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर जोग 'मुसाफिरा'च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.          मैत्री हा विषय बॉक्स ऑफिसवर नेहमीच यशस्वी ठरला आहे. 'मुसाफिरा' हा चित्रपटही मैत्रीवर बेतलेला असून मैत्रीची  नवीन परिभाषा यात अनुभवायला मिळणार आहे. या बिग बजेट मराठी चित्रपटाची खासियत म्हणजे स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरणार आहे.         'मुसाफिरा'बद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, '' ...

२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’.

इमेज
आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे.आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग असणार आहे.     या ‘आणीबाणी’चा जनतेला कोणताही त्रास न होता, फक्त आणि फक्त मनोरंजनाचा दिलखुलास आनंद अनुभवायला मिळणार आहे. कारण ही मनोरंजनाची ‘आणीबाणी’ असणार आहे. दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’साठी पुढाकार घेतला आहे. 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर बरंच काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ स...

संतोष-सोनालीची 'डेटभेट'..;चित्रपटाच्या नव्या पोस्टरनं वेधलं लक्ष.

इमेज
अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत  'डेट भेट' या आगामी चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले       सोनाली कुलकर्णी , हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'डेट भेट'  १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे .      'डेट भेट' चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे . पटकथा व संवाद लेखन अश्विनी शेंडे यांनी केले आहे. प्रदीप खानविलकर हे सिनेमॅटोग्राफर आहेत.'डेट भेट' ची निर्मिती शिवांशु पांडे , हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल ,प्रशांत शर्मा , हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते प्रशांत शेळके हे आहेत .सिनेमाचे संगीत 'व्हिडिओ पॅलेस' या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे तर चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन फ़िल्मअस्त्रा स्टुडिओज करत आहेत .

पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी संपन्न झाला ‘अल्ट्रा झकास’च्या "ढ लेकाचा" चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा!

इमेज
सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास “ढ लेकाचा” या  चित्रपटातून येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर येणार आहे.  आज या सिनेमाचं पोस्टर पंढरपुरातील प्रसिद्ध विठ्ठलाच्या मंदिरात प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. अत्यंत निरागस भाव असलेलं हे लोभस पोस्टर पाहताच चित्रपटाच्या कथाविश्वाची कल्पना येते. पोस्टरवरील नवोदित बाल कलाकार आयुष उलागड्डे त्याच्या चेहर्यावरील विलक्षण भावमुद्राभिनय पाहून रसिक प्रेक्षकांना “ढ लेकाचा” चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. आषाडीच्या अगदी दोन दिवस अगोदर 'ढ लेकाचा' हा चित्रपट अल्ट्रा झकास या ओटीटीवर  प्रदर्शित होणार असल्याने संपूर्ण वारकरी संप्...

"जागतिक युद्ध निरर्थक"! 'प्रतिबिंब नाट्य उत्सवा'मध्ये मकरंद देशपांडे यांनी मांडले परखड मत.

इमेज
प्लॅनेट मराठीने दि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए)सोबत असोसिएट होऊन 'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३' राबवला होता. यावेळी 'प्रतिबिंब'च्या माध्यमातून अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमध्ये या नामवंतानी  ‘एनसीपीए’शी जोडल्या गेलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, काही गंमतीदार किस्से, आपापली मतं, खळबळजनक खुलासे केले. आता 'प्रतिबिंब'चा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात थिएटर, हिंदी, मराठी चित्रपट अशा विविध माध्यमांवर आपला एक वेगळा ठसा उमटवणारे नामवंत अभिनेते मकरंद देशपांडे सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांनी 'सैनिक' या त्यांच्या एक तासाच्या  मोनोलॉगविषयी तसेच अनेक वादग्रस्त विषयांवर भाष्य केलंय. हा भाग प्रेक्षकांना बुधवारपासून म्हणजेच २१ जूनपासून प्लॅनेट मराठीच्या ओटीटीवर पाहता येणार आहे.  'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३' मध्ये मकरंद देशपांडे लिखित, दिग्दर्शित,अभिनित 'सैनिक' या जागतिक युद्धावर बेतलेल्या एकांकिकेचा प्रिमिअरही आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने निवेदक श्रवण यांनी मकरंद द...

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील पहिला हिरो,'बापमाणूस'

इमेज
आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूजबम्प्स् एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन यांचा 'बापमाणूस' हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी आपल्या भेटीस येत आहे. नुकतंच 'फादर्स डे' रोजी या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं. वडील- मुलीच्या नात्यातील प्रेमळ बंध या चित्रपटातील कथेत गुंफण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात वडीलांची भूमिका साकारली आहे तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार आहे.  'बापमाणूस' या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश फुलपगारे यांचे आहे.  आनंद पंडित,रुपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे तर वैशल शाह,राहुल दुबे चित्रपटाचे सह-निर्माते आहे. पुष्कर जोग,किया इंगळे व्यतिरिक्त अनुषा दांडेकर,कुशल बद्रिके,शुभांगी गोखले यांनीही 'बापमाणूस'चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा इमिआरा हिची आहे. सोपान पुरंदरे चित्रपटाचे छायाचित्रकार आहेत तर चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी रवी झिंगाडे यांनी सांभाळली आहे. वडील आणि मुलीमधील नातं नेहमीच खूप भावूक राहिलं आहे. प्र...

अजितदादांच्या हस्ते ‘आठवणी’चे पोस्टर लॉन्च.

इमेज
आगामी ‘आठवणी’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार आणि खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील आणि आमदार दिलीप वळसे-पाटील हे उपस्थित होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने अजितदादा व इतर मान्यवरांची भेट घेतली. यावेळी अजितदादांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या व भविष्यात असे उत्तमोत्तम चित्रपट येवोत अशी इच्छा व्यक्त केली.  सिद्धांत अशोक सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरवरून त्याची प्रगल्भता लक्षात येते. दोन पिढ्यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकथेची गोष्ट पत्रावाटे उलगडून दाखवणारी ही कथा आहे. त्यामुळे आजची तरूणाई आणि वयस्कर असे सगळेच या चित्रपटाच्या आठवणीत रमून जातील. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या पोस्टरवर झळकत आहेत, तर त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर दिसत आहेत. याशिवाय अभिनेता निनाद सावंत साहाय्यक भूमिकेत दिसेल. नात्यांची गुंतागुंत, एकमेकांवर असलेलं निर्व्याज प्र...

स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा 'सुभेदार'

इमेज
शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा शूरवीर योद्ध्यांनी आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरित केले आहे.  “आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच" म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार‘ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद... त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘सुभेदार’! सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्य...

'सद्गुरू एंटरटेनमेंट', दीपलक्ष्मी निर्मित' 'दिल मलंगी' रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न!मुंबईतील विविध आलिशान लोकेशन्सवर चित्रीकरणास प्रारंभ!

इमेज
एका विलक्षण कथा कल्पनेवरील  ' दिल मलंगी '  या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले ,  सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या  'सदगुरु एंटरटेनमेंट', दीपलक्ष्मी निर्मित'  संस्थेद्वारे करण्यात येत असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल परब करीत आहे. त्यांनी  ' सून माझी भाग्याची ', ' छावणी ', ' चंद्री ', ' पहिली भेट '  या चित्रपटांसह अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या  ' दिल मलंगी '  या महत्वाकांक्षी चित्रपटाचा मुहूर्त मुंबई ,  मढ येथील  ' शनाया '  या आलिशान ठिकाणी नुकताच करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेता चिन्मय उद्गीरकर ,  अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर ,  मीरा जोशी ,  संजीव सत्यविजय धुरी ,  नारायण जाधव ,  विनम्र भाबल ,  निर्माते रमाकांत गोविंद भोसले ,  सौ. दीपा रमाकांत भोसले ,  प्रमोद मुरकुटे ,  दिग्दर्शक सुनिल परब यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हो...

जिओ स्टुडिओजची पहिली मराठी वेबसिरीज "एका काळेचे मणी" प्रदर्शनास सज्ज.

इमेज
मी वसंतराव आणि गोदावरी चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता जिओ स्टुडिओज् त्यांची पहिली ओटीटी कौटुंबिक कॉमेडी वेबसिरीज "एका काळेचे मणी" प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यानिमित्ताने जिओ स्टुडिओज आणि महेश मांजरेकर एकत्र आले असून यात प्रशांत दामले, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, हृता दुर्गुळे, पौर्णिमा मनोहर, रुतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर अशा धम्माल कलाकारांची फौज प्रेक्षकांना पोट धरून हसवायला सज्ज झाली आहे. ही गोष्ट आहे मध्यमवर्गीय काळे कुटुंबाची ज्यात एक बाप आहे, जो घरचा मुख्य म्हणून आपली प्रतिमा जपण्यासाठी धडपडत आहे, एक आई जिचे जग तिच्या मुलांच्या लग्नाभोवती फिरतेय, एक प्राणीप्रेमी मुलगी जिला पाळीव प्राणी आणि त्यांच्यासाठी कपड्यांचा ब्रँड तयार करायचा आहे, एक मुलगा जो डॉक्टर असून जो आयरर्लंडमधून पीएचडी करत आहे. आणि अशा ह्या आगळ्या वेगळ्या कुटुंबाचे शेजारी ही तितकेच विचित्र आहेत बर का.. असे शेजारी ज्यांना आपल्या मुलीचं लग्न काळे कुटुंबात करून द्यायचं आहे.     भन्नाट विनोदाने नटलेली, जबरदस्त डायलॉग बाजी असलेली ही वेबसिरीज येत्या २६जून रोजी जिओ सिनेमावर रीलीज होत आ...

पेंटर इलस्ट्रेटर रवी परांजपे यांच्या चित्रकृतींचं सिंहावलोकनी प्रदर्शन.

इमेज
पेंटर इलस्ट्रेटर रवी परांजपे यांच्या चित्रकृतींचं सिंहावलोकनी प्रदर्शन (Retrospective exhibition) मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरणार आहे. या प्रदर्शनात रवी परांजपे यांच्या अप्रतिम पेंटींग्ज बरोबर, त्यांचा १९५८ ते २०२२ असा प्रदीर्घ कलाप्रवास त्यांच्या व्यावसायिक बोधचित्र (commercial illustrations), स्केचेस, सरावाची चित्र, थंबनेल्स यामधून उलगडणार आहे. कला रसिक आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एका देखण्या कालानुभूतीची अपूर्व संधी ठरणार आहे. स्थळ : जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई. कालावधी : २० जून ते २६ जून, २०२३ वेळ : सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.००

चित्रपट बाईपण भारी देवाच्या प्रमोशन दरम्यान @sukanyamoneofficial आणि @shilpanavalkar यांची पिंपरी मेट्रो स्टेशनवर धमाल!

इमेज
चित्रपट बाईपण भारी देवाच्या प्रमोशन दरम्यान @sukanyamoneofficial आणि @shilpanavalkar यांची पिंपरी मेट्रो स्टेशनवर धमाल! 'बाईपण भारी देवा' ३० जूनपासून चित्रपटगृहात!  #BaipanBhariDeva #BBD30June  A film by @kedarshindems  @officialjiostudios

दिव्याला मिळाली 'विठूराया'ची साथ.

इमेज
अभिनेत्री दिव्या पुगांवकर सध्या 'विठ्ठल माझा सोबती' असं म्हणत विठूरायाच्या आराधनेत रमली आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर  नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी 'विठ्ठल माझा सोबती'  या चित्रपटात विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका सोज्वळ मुलीच्या भूमिकेत ती आपल्याला दिसणार आहे.  फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून संदीप मनोहर नवरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटाच्या निमित्ताने वारी न अनुभवता येणाऱ्या रसिकांना या चित्रपटाच्या रूपाने वारीचा सोहळा आणि लाडक्या विठूरायाच्या दर्शनाचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. 'आषाढी एकादशी'चं औचित्य साधून २३ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रत्येक विठ्ठल भक्तांसाठी आनंदवारी असेल.    दिव्या सांगते, ‘विठ्ठलाला मानणारी ही व्यक्तिरेखा असून ‘विठ्ठल’ तिचा 'सोबती'  बनून तिला कशाप्रकारे मदत करतो, हे दाखवता...

प्रेमकथेच्या ‘आठवणी’ पत्रातून उलगडणार !दोन पिढ्यांच्या प्रेमाचा टीजर आउट.

इमेज
             बदलत्या काळानुसार संवादाची माध्यमे बदलत जातात, मात्र प्रेम तसेच राहते .दोन पिढ्यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकथेची गोष्ट पत्रावाटे उलगडून दाखवणारा सिद्धांत सावंत लिखित-दिग्दर्शित ‘आठवणी’ ह्या  सिनेमाचा टीजर नुकताच आपल्या भेटीला आला आहे .ह्यातून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्यासह प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर , निनाद सावंत हे तीन आश्वासक चेहरे दिसत आहेत.प्रेमाच्या विषयाला एका वेगळ्या भावनिकतेने साद घालायला दिद्गर्शक यशस्वी झाल्याचे दिसून येते आहे.            मराठीत आजकाल कौटुंबिक सिनेमे येत नाहीत असे  म्हणणाऱ्या  प्रेक्षकंसासाठी का सिनेमा मूड चेन्जर ठरणार आहे . प्रेमातील भावनांचे केलेले तरल  चित्रण हि ह्या सिनेमाची जमेची बाजू आहे . उत्तमोत्तम फ्रेम आणि आजचा काळ आणि जुना काळ प्रभावीपणे मांडण्याचे  काम सिनेमॅटोग्राफर ध्रुव देसाई ह्यांनी उत्तमपणे केल्याचे दिसून येते . शिवाय उत्तम कविता,समर्पक संगीत आदी गोष्टींनी संपन्न असा सि...

सलग तिसऱ्या आठवड्यात "बटरफ्लाय" चित्रपटाची यशस्वी घौड़दौड़.

इमेज
कुठलीही मोठी कंपनी कुठलाही मोठा निर्माता कुठलाही स्टुडिओ पाठीशी नसताना, एक साधी सरळ सोपी गोष्ट अगदी साध्या सरळ पद्धतीने, मराठीचा स्वाद कायम ठेवून, सगळ्यांना आवडेल, अख्ख कुटुंब पाहू शकेल अशा पद्धतीचा सिनेमा जर तयार केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला तर प्रेक्षक प्रेक्षागृहात येतात. सर्व समीक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी अनेक दिग्गज मंडळींनी या सिनेमाचं कौतुकच केलं! "आवर्जून बघावा असा हा सिनेमा,खूप वर्षांनी असा सिनेमा मराठीत आला, आम्ही परत परत पाहणार,प्रत्येक बाईने प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक कुटुंबाने पाहायलाच हवा असा हा चित्रपट, आजच्या धकाधकीमधे आणि भपकेबाज गोष्टीं चालू असताना हा चित्रपट तुम्हाला सुखावून जातो, तुम्हाला सगळी बक्षीसं मिळायला हवी , प्रत्येकाला आपला वाटेल आपल्याशी रिलेट होईल आपणच आपलीच गोष्ट पाहतोय असं वाटेल" अशा विविध पद्धतीच्या सकारात्मक प्रतिक्रिया या चित्रपटाला मिळाल्या आणि मिळत आहेत. मराठी चित्रपटांच्या गर्दीत इंग्रजी चित्रपटांच्या लाटेत आणि अतिशय मोठ्या अशा हिंदी चित्रपटांच्या तोडीला हा चित्रपट उभा राहिला.आज तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये ह्या...

आदिपुरूष' मध्ये प्रभासच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता कृष्णा कोटियन.

इमेज
      मनोज बाजपेयीसह 'बंदा' चित्रपटात हालीच आपल्या प्रदर्शनांचा उल्लेखणीय सोहळा साजरा करणारे अभिनेता कृष्णा कोटियन, 'आदिपुरुष' आणि 'द ट्रायल' या येथील आगामी रिलीझसह एक हॅट-ट्रिकची आनंदित घोषणा करीत आहे. 'गांधी vs गोडसे एक युद्ध' चित्रपटात मौलाना अब्दुल कलाम आजादची भूमिका निभवल्यानंतर, कृष्णा कथारंगातील अभिनयाची विश्वात्मक यात्रा ५१ वर्षांच्या वयात 'दरबार' या चित्रपटात रजनीकांतांसह त्यांच्या डेब्यूसह सुरु झाली. त्यांच्या विविध प्रदर्शनांच्या आकर्षक प्रकल्पांमध्ये साक्षात्कार केला जाऊ शकतो, जसे की 'दृश्यम २', 'फिजिक्सवाला', 'क्रिमिनल जस्टिस ३', 'रॉकेट बॉयज', 'मसाबा मसाबा', इतर.        आपल्या उत्साहभरी भावना कृष्णाने व्यक्त केली , "सिर्फ एक बंदा काफी है, माझे ऑनलाइन प्रदर्शन आणि आगमनारी चित्रपटांची रिलीज, 'आदिपुरुष' आणि 'द ट्रायल' एक अद्वितीय हॅट-ट्रिक म्हणून ओळखली जात आहे. माझं खूप आभार आहे की प्रयत्नांना ईश्वराची कृपा आहे, जी माझ्या जीवनाच्या ह्या पडद्यात, अंतिमतः फळदायी परिण...

मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांचे वितरण, सोबतच यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाचे हि लोकार्पण.

इमेज
    महाराष्ट्र ही नाट्य पंढरी आहे. मराठी रंगभूमी  महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. त्यामुळे राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारावी यासाठी एकाच छताखाली व्यवस्था व्हावी, यासाठी मध्यवर्ती अशी यंत्रणा तयार केली जाईल. त्यासाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली, निधीची व्यवस्था जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.  अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या गोविंद देवल बल्लाळ पुरस्कारांचे वितरण तसेच नूतनीकरण झालेल्या यशंवतराव चव्हाण नाट्य संकुलाचे लोकार्पण समारंभात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहूल शेवाळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अजित भुरे, शशी प्रभू, सतिश लटके, नरेश गडेकर, गिरीष गांधी, भाऊसाहेब भोईर, विजय चौगुले आदी उपस्थित ह...

सौरभ बनला ‘फौजी’.

इमेज
आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सौरभ गोखले यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि जाहिरात विश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजवरच्या आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा जपत रसिकांना मनमुराद आनंद देणारा हा अभिनेता आता एका जिगरबाज सैनिकाच्या ‘रफ अँड टफ’ भूमिकेत दिसणार आहे. कमांडोच्या वेशातील सौरभचा नवा लूक नुकताच समोर आला आहे. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटामध्ये एका निडर सैनिकाची भूमिका तो साकारत आहे. मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम येडे निर्मित आणि दिग्दर्शित ‘फौजी’ देशाचा प्राण, ‘आन बान शान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   ‘फौजी’ सिनेमाच्या निमित्ताने मला सैनिकाची भूमिका साकारायला मिळाली असून त्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग सध्या मी घेत आहे. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकाची भूमिका साकारणं हे माझ्यातील अभिनेत्यासाठी आनंददायी तितकेच आव्हानात्मक आहे, असं सौरभ सांगतो.        अभिनेता सौरभ गोखले यांच्यासोबत प्राजक्ता गायकवाड, नागेश भोसले,  शहाबाज खान, अरुण नलावडे, कल्याणी चौधरी, संजय खापरे, अश्विनी कासार, सुनील गोडब...

दिग्गज अभिनेते अशोक सराफांनी केला 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच.

इमेज
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते श्री. अशोक सराफ यांच्या हस्ते 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. या ट्रेलर लॉंच सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे, स्टारकास्ट रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,दीपा परब चौधरी,शिल्पा नवलकर,सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई - पियूष सह सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. पारंपरिक मंगळागौर नृत्याचा आनंद कलाकार आणि मिडिया यांनी घेतला. खेळी मेळीच्या वातावरणात बाईपण भारी देवाचा ट्रेलर लाँच सोहळा जोरदार पार पडला. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ट्रेलरलाही खूप भारी प्रतिक्रिया मिळत आहेत. जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा  तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात केलेली धमाल, अनुभवायला! ट्रेलर लिंक -https://bit.ly/BaipanBhariDevaTrailer जिओ स्टुडिओज प...

आंतरराष्ट्रीय मंचावर आपली छाप सोडणारे भारतीय कलाकार !

इमेज
इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या शैली ने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे. अली फझल, निम्रत कौर, अपेक्षा पोरवाल आणि हुमा कुरेशी हे भारतीय कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाची चमक दाखवत आहेत. अष्टपैलुत्व आणि बॉलीवूडच्या सीमेपलीकडे जाऊन स्वतः ला त्यांनी जागतिक पातळीवर सिद्ध केलं आहे. या प्रतिभावान व्यक्तींनी त्यांच्या अपवादात्मक आणि समृद्ध कामगिरीने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. जागतिक मनोरंजन इंडस्ट्रीत त्यांनी सगळ्यांची मन जिंकली आहेत. अली फजल: या अभिनेत्याने स्वतःच्या अभिनयाने जगभरात कौतुक मिळवलं आहे. विविध भूमिका साकारून नेहमीच तो प्रेक्षकांच्या मनात राहिला आहे. अली फझलने जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची जादू दाखवून नेहमीच तो चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटीश-अमेरिकन चित्रपट “व्हिक्टोरिया आणि अब्दुल” मधील भूमिकेसाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनोखं स्थान मिळालं आहे. जिथे त्याने अकादमी पुरस्कार विजेते डेम जुडी डेंचसोबत काम केले. त्याचा अष्टपैलुत्व अभिनयाने  आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने तो आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट करतो आहे.  ...

अभिनेत्री अंकिता लोखंडे ने तिच्या घरा बद्दल लिहिली खास पोस्ट.

इमेज
घर हे नेहमीच सगळ्यांसाठी खास जागा असते. प्रत्येकाला त्याचं घर हे तितकच खास असत फक्त चार भिंती नसून अनेक भावना आणि माणसाची लगबग असलेली ही खास जागा असते. नुकतंच अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या या खास घरातलं एक वर्ष साजर केलं. अंकिताने तिच्या सोशल मीडिया वर तिच्या नवऱ्या सोबत फोटो शेअर केला आणि खास कॅप्शन दिले, “आमच्या आनंदी जागे मधल खास एक वर्ष ! ✨वेळ हा अगदीच पटकन निघून जातो.  मला अजूनही आठवतंय  जेव्हा तू आमच्यासाठी हे घर विकत घेतलंस तेव्हा तू किती उत्साही आणि आनंदी होतास कारण हे आमचे मुंबईतील पहिले घर होते. आणि शेवटी ज्या दिवशी आम्ही शिफ्ट झालो आहाहा!! किती सुंदर आणि संस्मरणीय होता तो दिवस. ते 10-06-22 होते आणि काल आम्ही आमच्या आनंदी जागेचे एक वर्ष पूर्ण केले ✨ संपूर्ण वर्ष !!! खूप भावना आणि खूप सुंदर भावना आणि खूप प्रेम आणि आठवणी असलेला हा रोलर कोस्टर आहे.. जेव्हा मी आमचे घर पाहते तेव्हा मला खूप कृतज्ञ वाटते... म्हणून धन्यवाद मला आमचे घर दिल्याबद्दल ज्याला आम्ही आमचे आनंदी ठिकाण म्हणतो !  प्रिय घर 🏠” https://www.instagram.com/p/ CtWUdEHL8PX/ ...

सिद्धांत सावंत दिग्दर्शित ‘आठवणी’ होणार ७ जुलैला सर्वत्र प्रदर्शित!

इमेज
कौटुंबिक आणि भावनिक चित्रपटांना मराठी प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम देत आले आहेत. यामुळेच दिग्दर्शक सिद्धांत सावंत आपल्यासमोर असाच एक खास चित्रपट घेऊन सज्ज आहेत. ‘आठवणी’ असे या चित्रपटाचे नाव असून आज (ता. १३) त्याचे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरवरून असं लक्षात येतंय की, मराठी प्रेक्षकांसाठी अनेक दिवसांनंतर असा भावनिक आणि नात्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट येत आहे.  सिद्धांत सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरवरून त्याची प्रगल्भता लक्षात येते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या पोस्टरवर झळकत आहेत, तर त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर दिसत आहेत. याशिवाय अभिनेता निनाद सावंत साहाय्यक भूमिकेत दिसेल. नात्यांची गुंतागुंत, एकमेकांवर असलेलं निर्व्याज प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रती असलेली ओढ या पोस्टरमधून दिसून येते. त्यामुळे या चित्रपटाचे कथानक नक्की काय असेल हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट ७ जुलैला महाराष्ट्र...

‘मंगाजी’ की कहानी पुरी फिल्मी है.

इमेज
सर्वसामान्यांमधील असामान्य प्रतिभा जगासमोर आणण्याची किमया समाजमाध्यमांमध्ये आहे. काही सेकंदं किंवा मिनिटांच्या व्हिडिओमधून लक्ष वेधून घेणारी मंडळी सोशल मीडियावर दिसतात. समाजमाध्यमे जसजशी लोकप्रिय होऊ लागली तसतसे अनेकजण आपल्या कलागुणांचे सादरीकरण समाजमाध्यमांवरून करू लागले. आज अनेक ‘इन्फ्लुएन्सर्स’ सोशल माध्यमातून आपली कला दाखवत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या यादीत ‘मंगाजी’ म्हणजेच  नाशिकच्या मंगेश काकड या तरुणाने अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.   शेतकरी कुटुंबातून आलेल्या मंगेशला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मराठीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयातून प्ररेणा घेत वेगवगळ्या मिमिक्रीने सगळ्यांची दाद मिळवणाऱ्या मंगेशला आपण कला क्षेत्रात पाऊल टाकू याची कल्पना नव्हती. मध्यमवर्गीय कुटुंब त्यामुळे शिक्षणाला महत्त्व होत. शिक्षण पूर्ण करताना सवड मिळेल तशी आपल्या  अभिनयाची आवड तो जपत  होता. अभ्यास आणि नाटक असा प्रवास करताना मुंबईत येऊन स्वतः:ची ओळख निर्माण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मंगेश यांनी काही काळ नामांकित क...

नाट्य परिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल सुरू होणार.... १४ जूनला कार्यक्रम.

इमेज
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीने पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच संपन्न झालेल्या दोन्ही सभांमध्ये अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले नाट्यसंकुल पुन्हा चालू व्हावे अशी मागणी अनेक सभासदांची व रसिकांची होती. यास परिषदेचे तहहयात विश्वस्त श्री. शरद पवार, विश्वस्त उदय सामंत, शशी प्रभू यांनी संमती दिली आणि नवनिर्वाचित नियामक मंडळाने संकुल दुरूस्त करून रसिकांसाठी व नाट्य कलावंतांसाठी खुले करावे असा ठराव केला व नाट्य संकुलाच्या दुरुस्तीचे कामकाज जोमाने सुरू झाले आणि येत्या दि. १४ जूनला नाट्यसंकुल सुरू होईल यासाठी युध्दपातळीवर दुरूस्तीचे कामकाज सुरू आहे. अशी माहिती अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.या दुरूस्तीच्या कामकाजासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत. नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य उभे राहून कामकाज करून घेत आहेत.यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल पूर्वीप्रमाणे सुरू होऊन येथे नाटक, संगीत कार्यक्रम, सभा व स...

फूल टू मनोरंजन करणारे बालनाट्य “मंकी इन द हाऊस”१७ जून पासून रंगभूमीवर .

इमेज
मराठी बालरंगभूमीला मोठी परंपरा आहे. बालनाट्य म्हटले की गमती जमती ,  गिमिक्स हे आलेच. बाल प्रेक्षकांचे मनोरंजन करता करता नाटकांच्या द्वारे त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बाल रंगभूमीचे उद्दिष्ट असते. मुलांच्या कल्पनाविश्वातील विषय ,  त्यांना रुचतील अशा रीतीने सूत्रबद्ध आणि घटनाप्रधान कथानकात मांडल्यास उत्तम बालनाट्य आकाराला येते. अद्भुतरम्यता ,  वास्तवता ,  नवीन गोष्टींची माहिती यांचे स्वागत मुले सारख्याच तीव्रतेने करतात. साईराज प्रॉडक्शन निर्मित ,  ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित “मंकी इन दी हाउस” हे नवीन विनोदी बालनाट्य शनिवार दि. १७ जून ,  २०२३ रोजी रंगभूमीवर येत आहे.  “ माय फ्रेंड गोरिला” आणि “चमत्कार” या बालनाट्याच्या यशानंतर निर्माते – दिग्दर्शक ऋषिकेश घोसाळकर यांनी “मंकी इन दी हाउस” हे बालनाट्य रंगभूमीवर आणले आहे. “मंकी इन दी हाउस” या नाटकाच्या विषयातच विनोद दडला आहे. एक माकड चुकून एका सुशिक्षित डॉक्टराच्या घरात शिरते आणि त्याला वाचवण्यासाठी घरातील काही सदस्य जो प्रयत्न करतात ,  ते या विनोदी बालनाट्यात पाहायला मिळणार आहे....

भक्तिरसात तल्लीन करणारा 'विठ्ठल माझा सोबती'आषाढी एकादशीच्या निमित्ताने २३ जूनपासून महाराष्ट्रातील भाविकांच्या भेटीस.

इमेज
'विठू माऊली तू, माऊली जगाची..' गात-गुणगुणत मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीस येत असतात. रात्रंदिन अविरत टाळ-मृदुंगाच्या तालावर तुळशी वृंदावन आणि पालखी नाचवत भक्तिरसात तल्लीन; विठ्ठलाच्या एका भेटीसाठी आसुसलेली, ही भक्तमंडळी असं प्रसन्न चित्र सध्या आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतंय. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे विठू नामाचा गजर करणारा 'विठ्ठल माझा सोबती' हा चित्रपट भाविकांच्या भेटीस आला आहे. फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून हा चित्रपट येत्या २३ जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  *विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा ।* *विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥* तुकाराम गाथे मधील या अभंगाचा साक्षात्कार घडवणारा 'विठ्ठल माझा सोबती' हा चित्रपट पांडुरंगाच्या एका निस्सीम भक्तावर आधारित आहे. ही कथा एका श्रीमंत कुटुंबात घडते. जिथे पैसा आहे पण नात्यांत गोडवा नाही. अशातच ...

हर सर्कल आणि कल्की नेट-झिरो स्थायी कवरशूटसाठी एकत्र आले.

इमेज
हर सर्कलच्या द्वितीय स्थायीता कवरशूटमध्ये मातृभूमीला एक नवीन दृष्टिकोण देणारे आधुनिक जीवन, प्रौद्योगिकी आणि स्थायीता कसे सहकार्य करू शकतात हे सारांशित केले आहे. ,महिलांसाठी एक-स्टॉप सामग्री आणि सामाजिक नेटवर्किंगचे स्थान हर सर्कल, स्थायी मीडिया प्रक्रियांमध्ये एक आविष्कार साधले आहे. त्यांच्या स्थायीता कवर 2.0मध्ये जून महिन्यात अभिनेत्री आणि स्थायीता प्रचारक कल्कि स्थान आहे. या शूटमध्ये हर सर्कलची गोष्ट विचारली जाणारी असलेली हे महिलांना उच्चता देण्याचे व प्रेरणा देण्याचे त्यांचे अभिप्राय दर्शविते, ज्यामुळे महिलांना सुरक्षित जागा मिळवायला होईल, ज्याचा मूळ विचार "जास्तीत जास्त प्रभावासाठी किमान वापरा" आहे. वर्ल्ड एनवायरनमेंट  दिनाच्या आसपास रिलीजच्या कालावधीत हा स्थायीता कवरशूट दर्शविते की आधुनिकता, प्रौद्योगिकी आणि स्थायीता कसे सहकार्य करू शकतात. हर सर्कलसोबतील एक्सक्लूसिव इंटरव्यूत कल्कीने आपले ग्रीन पेअरंटिंग आणि मनःसामर्थ्यपूर्ण जीवनाबद्दलचे मत विभागले आहे. कल्कीने त्याच्या न्यूनतमवादी आणि कार्बन फुटप्रिंट कमी करण्याच्या विविध प्रक्रियांद्वारे त्याची मजबूत विश्वा...

"गुलाम बेगम बादशाह" १२ जूनला वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर!

इमेज
अल्ट्रा झकास(Ultra Jhakaas) ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट गुलाम बेगम बादशाह. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाला आहे. गुलाम बेगम बादशाह चित्रपटाची कथा 3 मित्रांच्या विक्रम (भरत जाधव), समीर (संजय नार्वेकर) आणि लोरा (नेहा पेंडसे) यांच्याभोवती फिरते. लोरा स्ट्रगलिंग आणि नवीन अभिनेत्री  असते तर विक्रम पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो आणि समीर हा नामांकित वृत्तपत्राचा पत्रकार असतो.  परिस्थिती बिकट असल्यामुळे या तिघांनाही चांगले पैसे कमवायचे असतात. आर्थिक भार कमी करण्यासाठी तिघेही विविध मार्ग शोधणं सुरू करतात. तथापि, कथेत पुजारीच्या येण्याने अनपेक्षित ट्विस्ट येतो. तो खरोखर पुजारी आहे की एक रहस्यमय अनोळखी व्यक्ती? विक्रम, समीर, लोराच्या आयुष्यात नक्की काय उलथापालथ होते? तिघांना पैसे कमवण्यासाठी मार्ग मिळतो की नाही? मार्ग शोधता...

आयशा आणि कृष्णा श्रॉफचे यांचे फिटनेस साम्राज्य !

इमेज
आयशा आणि कृष्णा श्रॉफ यांनी त्यांच्या फिटनेस बद्दल सगळ्यांना माहीत आहे. मार्शल आर्ट्सच्या प्रेमाचे रूपांतर यशस्वी त्यांनी व्यवसायात केले. त्यांच्या चिकाटीने आणि व्यवसायाच्या उत्साहाने MMA मॅट्रिक्स एक फिटनेस उपक्रम तयार केला ज्याने देशभरातील फिटनेस चाहत्यांना प्रेरित केलं आहे. आयशा आणि कृष्णा श्रॉफ यांचा प्रवास फिटनेस आणि मार्शल आर्ट्सच्या समर्पणाने सुरू झाला. लोकांनी निरोगी राहण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या फिटनेस उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी एक खास जागा तयार केली आहे. त्यांच्या मार्शल आर्ट्सचे अत्याधुनिक सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षणासह फिटनेसमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी MMA मॅट्रिक्सची स्थापना केली. आयशा आणि कृष्णा यांनी दर्जेदार प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करून अत्याधुनिक सुविधा उच्च व्यावसायिक प्रशिक्षक आणि अद्वितीय कार्यक्रमांसह फिटनेस हे साम्राज्य विकसित केले आहे. MMA मॅट्रिक्स सर्व क्षमता स्तरांसाठी ब्राझिलियन जिउ-जित्सू, मुए थाई आणि बॉक्सिंगमध्ये फिटनेस क्लास तयार केले आहेत.  आयशा आणि कृष्णा श्रॉफ यांची फिटनेसची कामगिरी MM...

मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा 'रामशेज' रुपेरी पडद्यावर.

इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापनेच्या या अग्निकुंडात त्यांच्या असंख्य शिलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाची पाने चाळताना अनेक शूर मावळ्यांनी गाजवलेले पराक्रम आपण वाचलेले आहेत. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापलं नाही तर त्यासाठी प्राणपणाने लढणारे, जीवाला जीव देणाऱ्या एकनिष्ठ सहकाऱ्यांची पिढी तयार केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही मंडळी प्रखर निष्ठेने मोगली सत्तेशी झुंजत राहिली. त्यांच्या तेजस्वी पराक्रमाची दुर्लक्षित गाथा म्हणजे नाशिक नजीकच्या 'रामशेज' किल्ल्याची लढाई.  ३५० व्या शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत 'आलमंड्स क्रिएशन्स प्रोडक्शन'ने 'रामशेज' या भव्यदिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड'च्या यशानंतर आणि 'मुरारबाजी' चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरु असतानाच निर्माते अजय आरेकर आणि अनिरूद्ध आरेकर आपल्या 'आलमंड्स क्रिएशन्स'द्वारा 'रामशेज' ही चौथी कलाकृती शिवप्रेमीं...

तृषांत इंगळे च्या "उलगुलान" या नवीन सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा.

इमेज
गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या तृशांत इंगळे दिग्दर्शित "झॉलीवूड" या चित्रपटातून   झाडीपट्टी रंगभूमीची चांगलीच चर्चा रंगली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन, तांत्रिक बाजू, अभिनय अशा अनेक कारणांमुळे ह्या चित्रपटाला चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची कौतुकाची थाप मिळवली होती. देश विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात सुद्धा ह्या चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. चित्रपट क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्म फेअर पुरस्कार "झॉलीवूड" चित्रपटासाठी  तृषांत इंगळेंला मिळाला आणि पुन्हा एकदा चित्रपटाची गुणवत्ता सिद्ध झाली. गेल्या वर्षी ५ जूनला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या "झॉलीवुड" या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतेच एक वर्ष झाले आणि याच विशेष दिवसाला तृषांत इंगळेंनी आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली ज्याच नाव आहे  "उलगुलान". तृषांत इंगळे म्हणाला "उलगुलान" चा अर्थ क्रांती असून हा चित्रपट भारतातल्या आदिवासी समाजावरती भाष्य करणारा आहे. या चित्रपटात महाराष्ट...