पोस्ट्स

प्रेमळ नातेसंबंधांची उकल आणि हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर.

इमेज
मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्याफुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे विरुद्ध स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत आणि ते काही कारणास्तव समोरासमोर येतात. त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज आणि हास्याचा धडाका! या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनय क्षेत्रातील अनुभवी तसेच तरुण कलाकारांची मजबूत फळी. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे व वैभव मांगले अशा ताकदीच्या कलाकारांनी सजलेले हे नाटक रंगभूमीवर नक्कीच धमाल घडवणार आहे. नाटकातील गंमतीजंमती, घरगुती प्रसंग आणि प्रत्येक पात्रामागची वेगळी भावनात्मक बाजू प्रेक्षकांना हसवत लोटपोट अनुभव देईल.  रत्नाकर मतकरींच्या लेखनाची सहजसुंदर शैली आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. भूमिका, प्रवेश क्रिएशन्स, असंम्य थिएटर्स निर्मित व रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ या ...

कलाकाराला रसिकांच्या ऋदयापर्यंत पोहचता आलं पाहिजे! मराठी रंगभूमीदिनी रंगकर्मी डॉ.वासुदेव विष्णूपूरीकर यांचे प्रतिपादन.

इमेज
कोणत्याही कलावंताला रसिकाच्या ऋदयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे,तरच अभिनयात तो श्रेष्ठ ठरतो,असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.वासूदेव विष्णूपुरीकर यांनी येथे ज्येष्ठ रंगकर्मिच्या सन्मान सोहळ्यात बोलताना केले.बुधवारी मराठी रंगभूमीदिन श्री.विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने प्रभादेवी‌च्या रविद्रमंदिरमध्ये मोठ्या आदराने पार पडला.या प्रसंगी नाट्यकलेसाठी आयुष्य वाहिलेल्या सहा गुणीकलाकारांचा सन्मान सोहळा पार पडला.   समारंभाला ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक विश्वास सोहनी,अभिनेते डॉ. वासुदेव विष्णुपुरीकर,ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल,दिग्दर्शक राम सारंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संस्थेचे‌ निर्माते दत्ता मोरे अध्यक्षस्थानी होते. डॉ.वासुदेव विष्णुपुरीकर सत्कार मूर्तीचा गुणगौरव करताना पुढे म्हणाले,नाटकात आयुष्य झोकून देणा-या या कलावंतांच्या योगदानाला नाट्यक्षेत्रात तोड नाही.प्रसिध्द सिनेदिग्दर्शक विश्वास सोहनी म्हणाले,कलाकाराला क‌लेशिवाय जागता येत नाही. ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल म्हणाले,राज्य नाट्यस्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांकाने आपली नाटके आणणारे निर्मिते दत्ता मोरे आपले‌ यश‌ सांघिक...

भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर -‘व्ही. शांताराम’ लवकरच मोठ्या पडद्यावर.

इमेज
   भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे.    ‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक विचारांपर्यंत, ‘अमृतमंथन’च्या तांत्रिक क्रांतीपासून ‘नागरिक’च्या वास्तववादी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय चित्रपटाला नवी दिशा दिली. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, सर्जनशील ध्यास आणि जग बदलण्याच्या अढळ विश्वासाची उज्ज्वल परंपराच. आता त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर येत आहे. जे व्हिज्युअली ग्रँड, इमोशनली पॉवरफुल आणि सिनेमॅटिकली आय...

'मॅजिक' चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत.

इमेज
आजवर अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षात 'मॅजिक' करणार आहे. मॅजिक या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत असून, १ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.    तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी "मॅजिक" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांनी छायांकन तर मंदार चोळकर वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत दिले आहे. दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुप...

मुंबई सायक्लोथॉन 2025’ — मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी समर्पित मुंबईची सर्वात मोठी सायक्लोथॉन.

इमेज
   लोहा फाउंडेशनच्या वतीने, फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली राईड टू एमपॉवर – मुंबई सायक्लोथॉन 2025 आज सकाळी एमएमआरडीए ग्राउंड्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे 6,000 हून अधिक सायकलस्वारांच्या भव्य उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यक्रमात प्रथमच सायकल चालवणारे, सायकलिंगप्रेमी, कुटुंबीय तसेच परा-खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी एकजुटीचा सशक्त संदेश दिला. बॉलिवूड अभिनेता व फिटनेस आयकॉन सुनील शेट्टी, ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ, श्री कृष्णा प्रकाश (IPS), ADG फोर्स वन, प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन आणि अभिनेत्री महिमा चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवून या सायक्लोथॉनची सुरुवात केली, ज्यामुळे मानसिक आरोग्यास समर्पित या भव्य सामुदायिक राइडला प्रेरणादायी प्रारंभ मिळाला.     देशात, विशेषतः तरुणांमध्ये, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये मोठी वाढ होत असताना राईड टू एमपॉवर – मुंबई सायक्लोथॉन सारख्या जनउपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती साध्य केली जात आ...

'रिदम ऑन फायर': नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम.

इमेज
  नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शिवमनी वर्ल्ड एंटरटेनमेंट' निर्मित आणि मानसी टाकणे यांची पहिली निर्मिती असलेला हा कार्यक्रम रंगभूमीवर नृत्य, प्रकाश आणि ध्वनी यांच्या समन्वयाने एक वेगळा प्रयोग सादर करणार आहे. डान्सिकलचा आगळावेगळा अनुभव आणि कलाकारांचे मनोगत या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने सादर होणार आहे आणि यात केवळ तीन कलाकार नृत्य सादर करणार आहेत. 'शिवमनी वर्ल्ड एंटरटेनमेंट' निर्मित आणि मानसी टाकणे यांची पहिली निर्मिती असलेला हा कार्यक्रम रंगभूमीवर नृत्य, प्रकाश आणि ध्वनी यांच्या समन्वयाने एक वेगळा प्रयोग सादर करणार आहे.शिवानी कथले यांनी सांगितले, "रिदम ऑन फायर डान्स शो खूप वेगळा आहे. यांची संकल्पना वेगळी आहे. असा शो आतापर्यंत पाहण्यात आला नसेल. या कार्यक्रमाची 'वर्ल्ड टूर' करण्याचं आमच्या संपूर्ण टीमचं स्वप्न आहे."   ‘रिदम ऑन फायर’ मध्ये लाईट्स आणि साऊंड या घटकांचे महत्व खूप मोठे आहे ...

येत्या महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’.

इमेज
    सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी विणलेला चित्रपट येत्या महिला दिनी म्हणजेच ६ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई-मुलींच्या नात्यात दडलेल्या न सांगितलेल्या भावना, आठवणी आणि काही अंतर्मुख करणाऱ्या क्षणांवर आधारित ही कथा आहे. महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून स्त्रीमनाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळणार आहे. ‘तिघींच्या जगण्यातलं चौथं पान’ उलगडत असताना या तिघींमधलं नातं, त्यांचे आयुष्याकडे पाहाण्याचे दृष्टिकोन आणि बदलत्या काळातली भावनिक चढ-उतार यांचा सुंदर वेध दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासह नेहा पेंडसे बायस व सोनाली कुलकर्णी या चित्रपटात दिसणार आहेत.  दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “‘तिघी’ हा आई-मुलींच्या नात्याचा चित्रपट असून त्यांच्या आतल्या आवाजांचा प्रवास आहे. आपण ज्या भावना दैनंदिन आयुष्यात व्यक्त करू शकत नाही, त्या सगळ्या या कथेतून उलगडतात. येत्या महिला दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रे...