पोस्ट्स

‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध.

इमेज
बाप लेकीचं नातं सगळ्यांपेक्षा वेगळं आणि खास असतं. लेकीच्या प्रत्येक स्वप्नामागे खंबीरपणे उभा राहणारा बाबा आणि बाबांच्या प्रेमात आपलं संपूर्ण विश्व पाहणारी लेक अशाच  एका  नात्यातला प्रेम, माया आणि भावनांचा सुंदर कोलाज आता ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.   अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री गौरी इंगवले यांच्या अभिनयातून साकारलेलं प्रभाकर आणि लक्ष्मीचं नातं ‘दशमी’ चित्रपटाच्या कथेला भावनिक खोली देणार आहे. बाप-लेकीच्या या हळव्या नात्याची कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्शून जाणारी आहे. केएनके बॉक्स प्रस्तुत 'दशमी' मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.    स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून मुलगी लक्ष्मीने डॉक्टर व्हावं, यासाठी तो बाप आयुष्यभर कष्ट करतो. लक्ष्मीही वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत, त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न स्वतःचं मानून जगणारी संवेदनशील मेडिकल स्टुडंट आहे.     याविषयी मकरंद अनासपुरे सांगतात,‘प्रभाकर’ या भूमिक...

प्रत्येक मृत्यूमागे एक अदृश्य सावली : ‘मृत्यूचक्र’चे नवे पोस्टर प्रदर्शित..

इमेज
जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य मानले जाते. भारतीय तत्त्वज्ञानात मृत्यू हा शेवट नसून एका चक्राचा भाग असल्याची संकल्पना प्राचीन काळापासून मांडली जाते. कर्मानुसार जन्म-मृत्यूची पुनरावृत्ती होत राहते आणि या चक्रातून मुक्ती मिळवणे म्हणजे मोक्ष, अशी धारणा आहे. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक कृतीचा परिणाम त्याच्यावर किंवा त्याच्या पुढील प्रवासावर होत असतो, असेही मानले जाते. ‘मृत्यूचक्र’ या संकल्पनेत त्यामुळे केवळ मृत्यूची भीती नसून कर्म, नियती, पुनर्जन्म, अदृश्य शक्ती आणि मानवी अस्तित्वाचे गूढ असे अनेक पदर दडलेले आहेत. याच गूढ आणि तात्त्विक संकल्पनेला भय, रहस्य आणि मानवी भावविश्वाची जोड देत ‘मृत्यूचक्र’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. श्री महादेव फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर निर्मित ‘मृत्यूचक्र’ या आगामी चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. ‘मृत्यूचक्र’चे दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कड...

‘चित्रनगरीत विविध उपक्रमांचे मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते लोकार्पण.

इमेज
दादासाहेब फाळके चित्रनगरी ही केवळ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे ठिकाण नसून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीची कर्मभूमी आहे. कलाकारांसाठी अधिक सुविधा, तंत्रज्ञांसाठी नव्या संधी आणि युवा पिढीसाठी आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित  ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत विविध लोकसेवा व सांस्कृतिक उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला फिल्मसिटी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकर, एनजीएमएच्या संचालक  निधी चौधरी त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.     यावेळी चित्रनगरीतील स्टुडिओ क्रमांक एकचे मंत्री ॲड शेलार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांना चित्रीकरण व निर्मितीसाठी अधिक सुविधा मिळणार असून चित्रनगरीला आधुनिक निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण...

रहस्य, अध्यात्म अन् ॲक्शनचा थरार‘देवघर ऑन रेंट’चा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न...

इमेज
अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांची अनोखी सांगड घालणारा ‘देवघर ऑन रेंट’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटात रहस्य आणि थरारासोबत भावनिक पदरही पाहायला मिळणार असून, ‘देवघर’ आणि ‘रेंट’ या दोन शब्दांमागे दडलेले गूढ नेमके काय, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची थरारक झलक पाहायला मिळत आहे. ‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.  आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि  राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित ‘देवघर ऑन रेंट’ची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शनाची धुरा स्वरूप सावंत यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा-पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या गूढ वातावरणाची जाणीव होते. अर्थपूर्ण संवाद उत्सुकता वाढवतात. पोलीस तपास, संशयास्पद घटना, संघर्ष आ...

‘चित्रनगरीच्या राजा’ची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न.

इमेज
 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चित्रनगरीच्या राजा’ गणेशोत्सवाची आज, सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेने उत्साहात सुरुवात झाली.  भक्तिमय वातावरणात ‘चित्रनगरीच्या राजा’चे जल्लोषात आगमन झाले. यावेळी चित्रनगरीतील कलाकार, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वांनी एकत्र येत गणरायाची आरती करून बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.    राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव विशेष उत्साहात साजरा केला जात आहे. पारंपरिक उत्सवी कला आणि परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागतिक रील स्पर्धा, मराठी गणपती स्तोत्राचे अनावरण, पाककला स्पर्धा, रील मार्गदर्शन शिबिर, वैद्यकीय चाचणी शिबिर, दिव्यांग ऑर्केस्ट्रा, हळदीकुंकू कार्यक्रम, ‘चित्रांगण कट्टा’ तसेच कलाकार, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी वैयक्तिक वित्त व्...

जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेतून कलेचा जागर....विजेत्यांना लाखोंची पारितोषिके.

 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे.  राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार तसेच सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले असून  १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात येणार आहे.     या स्पर्धेत ‘जागतिक सर्वोत्तम रील’ ठरणाऱ्या स्पर्धकाला १ लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेच...

‘चित्रनगरीच्या राजा’चा जल्लोषात स्वागत होणार; यंदाचे ३३ वे वर्ष.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने यंदाही ‘चित्रनगरीच्या राजा’चा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात येणार आहे. सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणरायाची प्राणप्रतिष्ठा होणार असून, शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी विसर्जनाने या उत्सवाची सांगता होईल. यंदा चित्रनगरीच्या राजाचा हा ३३ वा गणेशोत्सव आहे.    राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान स्टुडिओ क्रमांक १, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव, मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध विभागांतील उल्लेखनीय गावांचे दर्शन तसेच चित्रपटांचे गाव असलेल्या चित्रनगरीतील उपक्रमांचे चित्रण देखाव्यातून करण्यात आले आहे. संपूर्ण देखाव्यातून गणरायाच्या विविध रूपांचे पारंपारिक दर्शन घडते. संपूर्ण देखावा पर्यावरण पूरक असून पूजामूर्ती शेतातल्या माती पासून बनलेली बीजमूर्ती आहे. तसेच उत्सवमूर्ती महापालिकेच्या नियमानुसार पुनर्वापरासाठी देण्याच्या दृष्टीने मागील वर्ष...

चित्रपटाच्या यशासोबत कलाकार-तंत्रज्ञांच्या सुख-समाधानासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं.

इमेज
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त एका अनोख्या आणि भावनिक क्षणाने पार पडला. शुभारंभाच्या प्रसंगी दिग्पाल लांजेकर यांनी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणं घालत चित्रपटाच्या यशासोबतच ‘दर्याभवानी’शी जोडलेल्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि टीम सदस्याच्या सुख-समाधानासाठी मनापासून प्रार्थना केली. या गाऱ्हाण्यात चित्रपटाच्या निर्मितीसाठी पडद्यामागे आणि पडद्यावर मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानण्यात आले. संपूर्ण टीमच्या कल्याणासाठी केलेल्या या प्रार्थनेमुळे ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त केवळ चित्रपटाच्या शुभारंभाचा सोहळा न राहता, एकजूट, कृतज्ञता आणि आपुलकीचा सुंदर क्षण ठरला. ‘दर्याभवानी’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी सागरी धोरणाला आणि मराठी आरमाराच्या अद्वितीय पराक्रमाला मोठ्या पडद्यावर साकार करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या भव्य ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करताना दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या संपूर्ण टीमलाच या शुभारंभाच्या केंद्रस्थानी ठेवत केलेली प्रार्थना विशेष लक्षवेधी ठरली.  ...

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना'.

इमेज
गणरायाच्या भक्तीत तल्लीन करणारी आणि उत्सवी वातावरणाला सुरेल रंग देणारी ‘आली मोठी शहाणी’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘गणेश वंदना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बाप्पाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करणाऱ्या या गाण्यात भक्तिरसासोबतच उत्सवाचा आनंद आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं. चित्रपटाच्या टीझरमध्ये एका चिमुकलीची ‘मोठं व्हायचंय’ ही निरागस इच्छा आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तिने बाप्पाकडे घातलेलं साकडं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या गणेश वंदनेतूनही चित्रपटाच्या कथेशी जोडलेला बाप्पाचा धागा अधोरेखित होतो. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले अभय जोधपूरकर यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला भक्तिरसाची अनुभूती मिळते. पंकज पडघन यांच्या संगीत रचनेतून गाण्याचा उत्सवी बाज खुलतो, तर गुरु ठाकूर यांच्या शब्दांमधून बाप्पाप्रतीची श्रद्धा आणि भक्तिभाव प्रभावीपणे व्यक्त होतो.    संगीत दिग्दर्शक पंकज पडघन म्हणतात, ‘’ ‘गणेश वंदना’ हे गाणं तयार करताना भक्तिभाव आणि उत्सवाचा आनंद यांचा सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न केला. बाप्पाशी जोडलेली श्रद्धा आणि ‘आली मोठी शहाणी’ च्या कथेतील भा...

शाब्दिक हिंसा का वाढतेयं? - सुजय डहाके‘तुझ्या आयला’चा ट्रेलर प्रदर्शित.

इमेज
दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शकीय शैलीची छाप असलेला ‘तुझ्या आयला’ हा आगामी मराठी चित्रपट विषयाच्या धाडसामुळे आणि आशयाच्या वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटलेल्या ‘शाळा’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या आशयघन चित्रपटांमधून संवेदनशील विषयांना प्रभावीपणे पडद्यावर मांडणाऱ्या सुजय डहाके यांनी यावेळी समाजात नकळत रूजलेल्या एका गंभीर प्रश्नाला केंद्रस्थानी आणले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘तुझ्या आयला’ हे शीर्षक पहिल्यांदा ऐकतानाच अनेकांच्या भुवया उंचावतात. मात्र, या शीर्षकामागे भाषेचा, संस्कारांचा आणि शब्दांच्या परिणामांचा विचार करायला लावणारी संकल्पना दडलेली आहे. ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’ ही चित्रपटाची हटके टॅगलाइनही त्याच्या मध्यवर्ती विषयाकडे सूचकपणे निर्देश करते. शाब्दिक हिंसा आपल्या दैनंदिन व्यवहाराचा भाग कशी बनली आहे आणि त्याचा व्यक्तीच्या मानसिकतेवर, विशेषतः बालमनावर, कसा परिणाम होऊ शकतो, याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. दिग्दर्शक सुजय डहाके यांनी या विषयाकडे केवळ म...

‘छबिला’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.

इमेज
 मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. या पुरस्कारांमध्ये ‘छबिला’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला, तर ‘घरत गणपती’ द्वितीय स्थानी तर ‘नाच गं घुमा’ तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला.   या सोहळ्यात विविध गटातील महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. भारतीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार, संगीत दिग्दर्शक व गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ पटकथालेखक, अभिनेते व निर्माते सलीम खान यांच्या वतीने त्यांच्या पत्नी हेलन यांनी राज क...

पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणाबैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर.

इमेज
शेतकऱ्याच्या जीवनात बैलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीच्या कामात शेतकऱ्याचा खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घालून, सजवून त्यांची पूजा केली जाते. शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, कष्ट आणि मातीशी असलेली नाळ या परंपरेतून अधोरेखित होते. याच भावनिक नात्याला केंद्रस्थानी ठेवत पोळ्याचा मुहूर्त साधून एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!’ या आशयाच्या टॅगलाइनसह ‘जोडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फायनल ड्राफ्ट फिल्म प्रॉडक्शन आणि फेबलफॉक्स मीडिया प्रॉडक्शन यांच्या निर्मितीचा ‘जोडी’ हा चित्रपट ज्ञानेश्वर शांताराम जाधव यांनी लिहिला असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेसोबत प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरने या कलाकृतीची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टरमध्ये हिरवाईने नटलेल्या शेतातून बैलजोडी नांगर ओढत पुढे जाताना दिसते. त्याच दृश्याच्या पार्श्वभूमीवर आकाश...

दोन Gen Z च्या नजरेतून उलगडणार आजच्या पिढीची गोष्ट; ‘मॅगझिन’चा फर्स्ट लुक प्रदर्शित.

इमेज
आजची Gen Z पिढी जगभर फिरते, स्वतःची ओळख घडवते, नव्या शक्यता शोधते, पण या सगळ्या प्रवासात एक प्रश्न कायम तिच्यासोबत असतो; “आपलं खरं घर नेमकं कुठे आहे?” याच भावनेला एका समकालीन आणि तरुण दृष्टिकोनातून पडद्यावर मांडणारा आगामी मराठी चित्रपट ‘मॅगझिन’ येत्या २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Gen Z च्या बदलत्या विश्वाची झलक दाखवणाऱ्या या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. वेगळं आणि उत्सुकता निर्माण करणारं शीर्षक, त्याला साजेसं दृश्यविश्व आणि तरुणाईशी थेट संवाद साधणारी मांडणी यामुळे ‘मॅगझिन’ने प्रदर्शनापूर्वीच लक्ष वेधून घेतलं आहे.    ‘मॅगझिन’ ही केवळ Gen Z ची गोष्ट नाही; तर Gen Z ला समजून घेण्याचा आणि तिच्या माध्यमातून जुन्या-नव्या पिढ्यांमधला संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. आजची तरुण पिढी आपल्या करिअरच्या, नात्यांच्या आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा निवडत असताना ‘घर’, ‘आपली माणसं’ आणि ‘आपली मुळं’ यांच्याशी तिचं नातं नेमकं कसं बदलतं, याचा भावनिक वेध चित्रपट घेणार असल्याचे संकेत मिळतात. सोशल मीडिया, सतत बदलणारी जीवनशैली आणि स्वतः...

विचार आणि अविचाराच्या उंबरठ्यावरची गोष्ट मांडणाऱ्या ‘देवघर ऑन रेंट’चा टिझर प्रदर्शित...

इमेज
आध्यात्म, गूढरहस्य आणि थरारक ॲक्शनचा अनोखा मिलाफ साधणाऱ्या ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शीर्षक जाहीर झाल्यापासूनच आपल्या हटके विषयामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टिझरनेही प्रेक्षकांची उत्कंठा चांगलीच वाढवली आहे. टिझरमध्ये दाटून आलेले गूढ वातावरण, रहस्याच्या छायेत सुरू असलेला पोलिसांचा तपास, अंगावर काटा आणणाऱ्या रक्तरंजित घटनांचे संकेत आणि देवाच्या दाराशी येऊन थांबणारे अनाकलनीय कथानक यांची प्रभावी झलक पाहायला मिळते. ‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदूर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. बहुचर्चित आगामी 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी 'देवघर ऑन रेंट'चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा-पट...

६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ९ सप्टेंबरला,विशेष योगदान पुरस्कारांचे होणार वितरण.

 महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आयोजनाने होणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासोबतच चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे.    या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.    राज्य...

दही हंडीतील मटका फोडायला बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी ‘शांताबाई’च्या खास मराठमोळ्या अंदाजात.

इमेज
दहीहंडीच्या उत्साहात आता बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी देखील मराठमोळ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटातील बहुचर्चित ‘शांताबाई’ हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या गाण्यात सनी लिओनीचा भन्नाट मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. ‘शांताबाई’च्या तालावर मंगेश देसाई, सयाजी शिंदे आणि प्रणवराव राणे यांच्यासह कलाकारांचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार असून, गाण्याची जोशपूर्ण लय आणि उत्साही नृत्य हे या गाण्याचे खास आकर्षण आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मटका फोडण्याचा उत्साह आणि ‘शांताबाई’चा झकास अंदाज यामुळे हे गाणे सणाच्या वातावरणात रंगत आणणारे ठरणार आहे. या धमाकेदार गाण्याचे संगीत, गीत आणि गायन संजय लोंढे यांनी केले आहे. गाण्याचा पूर्ण व्हिडिओ SKR Music and Movies या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला असून, हे गाणे सर्व प्रमुख संगीत आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ‘द महाराष्ट्र फाईल्स’* मध्ये उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली या...

'तुझ्या आयला'मधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारं 'बागड बागड...' गाणे प्रदर्शित.

इमेज
नेहमी प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या चित्रपटांद्वारे विविधांगी विषय रसिकांसमोर सादर करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांचे दिग्दर्शन तसेच पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत निर्मिती या चित्रपटाला लाभली आहे. या चित्रपटातील 'बागड बागड...' हे महत्त्वपूर्ण गाणे रसिक दरबारी सादर झाले आहे. अर्थपूर्ण शब्दरचना, सुमधूर संगीत, लयबद्ध चाल आणि मनाला भिडणारे सूर यांचा संगम या गाण्यात जाणवतो. 'तुझ्या आयला' हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथेला गती प्रदान करण्यासाठी गाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. नुकतेच प्रदर्शित झालेले 'तुझ्या आयला' या चित्रपटातील 'बागड बागड...' हे गाणेही कथानकात अतिशय महत्त्वाच्या वळणावर येते. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायलेले 'बागड बागड...' हे गाणे गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून आकाराला आले आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे संगीतकार वरुण लिखते यांनी या गाण्याला संगीतसाज चढवला आहे. 'बागड बागड...' हे गाणे झ...

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’,‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत.

इमेज
रिक्षाच्या मागे दिसणारी ‘बुरी नजरवाले.. तेरा मुँह काला’ ही ओळ प्रत्येकाने वाचली असेल…पण ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये हीच ओळ जेव्हा भन्नाट ठेक्यावर ऐकू येते, तेव्हा पावलं आपोआप थिरकायला लागतात! देसी शब्दांचा तडका, नशा चढवणारा ठेका, नकाश अझीझचा जोशपूर्ण आवाज आणि सुरेश पंडित यांचं दमदार संगीत यामुळे हे गाणं ‘दशमी’चं खास आकर्षण ठरणार आहे.  ‘दुनियेवर राज करेल दिलवाला, बुरी नजरवाले..तेरा मुँह काला’ हे गाणं चित्रपटाला एक वेगळीच एनर्जी देणार असून, या गाण्यात अभिनेत्री गौरी इंगवले, राज कुंदन, अभिनेते मकरंद अनासपुरे, विजय निकम या गाण्यावर भन्नाट ठेका धरताना दिसणार आहेत. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला भाग पाडणार आहे. वैभव देशमुख यांनी हे गाणं लिहिलं आहे. ‘दशमी’ चित्रपटातील गीते ‘व्हिडिओ पॅलेस’ने प्रकाशित केली आहेत.   रिक्षांवरच्या भन्नाट लिखाणाला सिनेमाच्या पडद्यावर नवा रंग देणारं हे गाणं प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या विषयांमुळे चर्चेत असलेला ‘दशमी’आता एका हटके गाण्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. केएनके बॉ...

अभिनेता रजत बेदींची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री.

इमेज
मराठी सिनेमांकडे हिंदी कलाकारांचा वाढता ओढा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय हिंदी कलाकाराचं नाव जोडलं जाणार आहे. हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास केलेले अभिनेता रजत बेदी आता मराठी सिनेमाशी जोडले गेले आहेत. रजत बेदी हे आगामी मराठी चित्रपट ‘बंधू’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बेदी कुटुंबाचा मराठी चित्रपटसृष्टीशी नवा ऋणानुबंध जुळला आहे.  हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बेदी कुटुंबाचा समृद्ध वारसा आता मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचे पुत्र आणि ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, पटकथाकार व दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचे नातू रजत बेदी मराठी चित्रपटसृष्टीत नवे पर्व सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘मधुमती’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, देवदास’, ‘एक चादर मैली सी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या लेखनातून राजिंदर सिंह बेदी यांनी हिंदी सिनेमाला समृद्ध केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर नरेंद्...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव "नाट्य परिषद करंडक"

इमेज
 रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' भव्य राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी देखील 'नाट्य परिषद करंडक' रूपात आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे. मागील वर्षी हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. मागील वर्षी २५८ एकांकिका या महोत्सवात सादर झाल्या, अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री यांनी गावोगावी जाऊन हे शिबिर घेतले. यामुळे अंतिम फेरीतील एकांकिका दर्जेदार झाल्या आणि यातून मागील वर्षी नाट्य परिषद करंडक स्पर्...